मांग मांग वादक मांग (रूसेल १९१६) एकूण लोकसंख्या भारत : सुमारे २७,००,००० (२०१८) लोकसंख्येचे प्रदेश प्रमुख : महाराष्ट्र इतर : मध्य प्रदेश • कर्नाटक • आंध्र प्रदेश • तेलंगाणा • गुजरात • छत्तीसगड भाषा मुख्यः- मराठी , हिंदी धर्म हिंदू धर्म , बौद्ध धर्म व ख्रिश्चन धर्म [१] संबंधित वांशिक लोकसमूह मराठी लोक मांग किंवा मातंग हा भारतातील एक अनुसूचित जातीत समाविष्ट असलेला समुह आहे. या जातीसमुहाला मध्ययुगीन कालात बहिष्कृत ( अस्पृश्य ) मानले गेले होते. या जातसमुहाची माणसे प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात राहतात. २०११ मध्ये, महाराष्ट्रात मातंगांची लोकसंख्या सुमारे २५ लाख आहे. मातंग जातीला भारतीय राज्यघटनेने अनुसूचित जातीत समाविष्ट केलेले आहे. भारतातील ११ राज्यात मातंग समुदायाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ठ केले आहे. [२] [३] इतिहास शिवाजी महाराजांचा काळ ते स्वातंत्र्यपूर्व काळ मातंग समाज हा मुळचा रांगडा, आक्रम...
Comments
Post a Comment