उत्तर द्या
4
फॉलो करा
विनंती करा
आणखी

पुढील उत्तर हे मी माझ्या इतिहासाच्या अभ्यासावर देत आहे ते असे की फक्त महाराष्ट्रच नव्हे तर अख्या भारतात शोधून क्वचितच आपल्याला एखादा अपवादात्मक प्रदेश आढळेल ज्याने भाऊबंदकी अनुभवलेली नाही .

  • महाराष्ट्रात माझ्या माहिती प्रमाणे भाऊबंदकी चा पहिला दाखला येतो वाकाटक शासकांचा , विदर्भाच्या नंदिवर्धन चा पराक्रमी राजा प्रवरसेन वारला त्यावेळी त्याच्या ४ मुलांपैकी पहिला मुलगा गौतमीपुत्र वारला होता त्यामुळे त्याचा मुलगा रुद्रसेन राजा झाला पण त्याचे चुलते त्याच्या विरोधात गेले व त्यांपैकी एक सर्वसेन याने वत्सगुल्म ला दुसरे राज्य स्थापले ज्याने वाकटकांचे राज्य व सामर्थ्य दुभागले .
  • पुढचे उदाहरण म्हणजे देवगिरीकर यादव राजा रामचंद्रदेव , त्याच्या वडिलांनी कृष्णदेवरायानी आपल्या मुलाऐवजी भाऊ महादेवरायाला राज्य दिले जे पुढे त्याचा मुलगा आमण ला मिळाले पण त्यावेळी रामचंद्रदेवने दरबारी मंत्र्यांच्या मदतीने चुलत भावाला हरवून राज्य बळकावले .
  • ह्या भाऊबंदकीला छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य देखील अपवाद नव्हते , महाराज गेल्यावर संभाजी महाराजांना डावलून काही मंत्री व राणी सोयराबाईंनी राजाराम महाराजांचे मंचकारोहण केले होते पण नंतर सरनौबत हंबीरराव मोहित्यांसारख्या स्वराज्यनिष्ठ व्यक्तिंमुळे संभाजी महाराज छत्रपती बनले .
  • दुर्दैवाने इतिहासाची पुनरावृत्ती लवकरच १७०७ मध्ये संभाजी महाराजांचे चिरंजीव शाहू महाराज व राजाराम महाराजांची पत्नी राणी ताराबाई यांच्यातील सत्तासंघर्षाच्या रुपात झाली व परिणाम झाले ते असे की छत्रपतींच्या पुण्यभूमीचे सातारा व कोल्हापुरात वारणा नदीच्या काठी विभाजन झाले व अनेक राजकारणं , कारस्थानं जन्माला यायला सुरुवात झाली .
  • इतिहासाच पुढचं विडंबन तर असं की ज्या मुलासाठी ताराबाईंनी स्वराज्याचे २ तुकडे केले ते राज्य त्यांच्या मुलाच्या दुसऱ्या शिवाजी राजांच्याही पथ्यावर पडलं नाही , ताराबाईंचा सावत्र मुलगा म्हणजे राजसबाईंचा मुलगा दुसरा संभाजी याने सावत्र भावास बाजूला सारून स्वतःला राज्याभिषेक करवून कोल्हापूरचे छत्रपती घोषित केले .
  • आता ह्या सगळ्या उदाहरणांनंतर पेशवाई तरी कशी यात मागे राहील , पेशवे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेबांनंतर त्यांचे बंधू रघुनाथराव उर्फ राघोबादादांनी आपल्या पुतण्यास श्रीमंत माधवरावांस हटवून कैक वेळा पेशवेपद हस्तगत करण्याचा प्रयत्न केला ज्यासाठी त्यांनी अनेक कारस्थानं रचलीत व वेळी निजमासारख्या शत्रूचीही मदत घेतली माधवरावांच्या हयातीत यश आले नाही तेव्हा पुढील पेशवे व दुसरे पुतणे नारायणरावास ठार करून शेवटी त्यांने ते पद मिळवले .
  • अश्याच भाऊबंदकी ने प्रमोद महाजनांचाही घात झाला .
  • हल्लीचे शिवसेना व मनसे मध्ये भाऊबंदकी ने झालेल्या विभाजनासही आपण बघतच आहोत , जर आज राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र असते तर कदाचित शिवसेना जास्त बळकट असती .

ह्या सर्व कारणांमुळेच आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रालाही भाऊबंदकी चा शाप आहे .

61
8
टिप्पण्या समाविष्ट करण्यास मनाई आहे

फक्त महाराष्ट्रच नव्हे तर अख्या भारतात शोधून क्वचितच आपल्याला एखादा अपवादात्मक प्रदेश आढळेल ज्याने भाऊबंदकी अनुभवलेली नाही .

3
प्रत्युत्तर द्या
·

हा सगळ्या जिवंत प्राण्यांचा स्वभाव असतो. महाराष्ट्र किंवा संपूर्ण मानवजाती यास अपवाद नाहीत. महाराष्ट्राची उदाहरणे आपल्याला जास्त माहिती आहेत येवढेच.

2
प्रत्युत्तर द्या

शिवसेना, मनसे?

7
प्रत्युत्तर द्या

होय अगदी बरोबर , ते पण एक उत्तम उदाहरण ठरेल .

6
प्रत्युत्तर द्या

खुप सुंदर विस्तृत केल्या बद्दल आभार!!!

3
प्रत्युत्तर द्या
·

होय. आणि याचे प्रमाण मराठवाड्यात जास्तच आहे.

2
प्रत्युत्तर द्या

जस्ट फॉर इन्फॉर्मेशन, त्या वेळचे वत्सगुल्म म्हणजेच आजचं वाशिम जिल्हा.

1
प्रत्युत्तर द्या

होय बरोबर व नंदिवर्धन म्हणजे नागपूर जवळचे नगरधन दोन्ही विदर्भातच पण दोन टोकं .

2
प्रत्युत्तर द्या

फक्त मराठी नाही तर सगळ्या भारतात किंबहुना आशिया खंडात हीच परंपरा आहे. बिहार भागात समुद्रगुप्ताच्या कालखंडात हेच झालं. मुघल साम्राज्यात हेच करून औरंगजेब सत्तेवर आला. त्याच्या मुलांनी हेच प्रकार करून मुघल ताकद विफल केली ज्याचा मराठ्यांनी फायदा उठवला. कालच इंग्रजी कोरा वर पॉल डेन लिंग अर ह्यांकडून वाचण्यातआलं की भाऊबंदकी आणि दगाबाजी सोडली तर चीनी राष्ट्रात फक्त खाणे हे एकमेव सार्वजनिक ऐक्याचं उदाहरण आहे. त्यामुळे मराठी लोकांना काही खास शाप वगैरे नसून एकंदरीत आशियाई मनोवृत्तीचे उदाहरण म्हणता येईल.

सर्व मोठ्या लोकसंख्येच्या प्रदेशात हाच प्रकार असतो. दावेदार उदंड त्यामुळे भांडणे पण उदंड. जेव्हा व्यक्ती किंवा वंशाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रकारण होते तेव्हाच त्याची सबळ परंपरा होते. आणि हे खालीलपैकी एका कारणाने होते

  1. धार्मिक (धर्म सगळ्यात वर - कोणाही राजापेक्षा) उदा. कृसेडर साम्राज्ये, इस्लामी साम्राज्ये, होली रोमन एम्पायर, श्रींची इच्छा वगैरे,
  2. मतवादासाठी ( साम्यवाद वगैरे ) रशिया , माओवादी चीन, वगैरे.
  3. समाजव्यवस्था वादा साठी ( रिपब्लिकन वाद वगैरे) - अमेरिका, रोमन रिपब्लिक, आधुनिक भारत वगैरे.

त्यामुळे सध्याच्या युगात एका व्यक्ती किंवा वंशाला अवास्तव महत्त्व ना देता एका संघटित समाज भावनेला सर्वोच्च महत्त्व दिलं तरच भाऊबंदकी बंद होणार.

महाराष्ट्र हे लोकसंख्या आणि भाषा प्रामुख्याच्या दृष्टीने जर्मनी येवढे आहे. त्यामुळे एक संघटित प्रयत्न केला तर आपण तेवढ्याच दर्जाला पोहोचू शकतो.

Comments

Popular posts from this blog

महार

चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला. म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!☝

मांग