शेती पुरक इतर व्यवसाय

शेती पुरक इतर व्यवसाय

गुरांच्या जाती आणि निवड

1) दुभत्या जाती

सहिवाल : मुख्यतः पंजाब, हरियाना, उत्तरप्रदेश, दिल्ली, बिहार आणि मध्यप्रदेशात आढळतात. दूध उत्पन्न – खेडेगावात:१३५०किलो- व्यापारक्षम दुग्ध व्यवसायात: २१०० किलो पहिल्या वेताचे वय - ३२ ते ३६ महिने दोन वेतांमधील अंतर – १५ महिने


 

गिर :मुख्यतः दक्षिण काठीयावाडच्या गिर जगंलां मध्ये आढळतात. दूध उत्पन्न – खेडेगावात : ९०० किलो क्ग्स – व्यापारक्षम दुग्ध व्यवसायात: १६०० किलो


 

थारपारकर :मुख्यतः जोधपुर, कच्छ आणि जेसलमेरमध्ये आढळतात. दूध उत्पन्न – खेडेगावात :१६६० किलो – व्यापारक्षम दुग्ध व्यवसायात: २५०० किलो


 

कॅरन फ्राई जातीची गाय : राजस्थानमधील थरपक्कर जातीची गाय उष्ण आणि दमट हवामानातही सशक्त राहू शकते. पण ही जात दुधासाठी मात्र सर्वसाधारण अशीच समजली जाते. या थरपक्कर जातीचा आणि होस्टन फ्रिशिअन जातीच्या कृत्रिम संकर करून कॅरन फ्राई या नव्या संकरीत गायीचा विकास करण्यात आला आहे.


 

  • रीत गायीची वैशिष्ट्ये : ह्या जातींच्या गाईंच्या अंगावर, कपाळावर आणि शेपटीच्या गोंड्यावर काळे-पांढरे ठिपके डाग असतात. आचळे गडद रंगाची असतात व दुधाच्या शिरा ठळकपणे दिसतात.
  • कॅरन फ्राई जात स्वभावाने अतिशय शांत असतात. गोर्ह्यां पेक्षा गाय लवकर वयात येते व वयाच्या साधारण 32-34 व्या महिन्यामध्ये गाभण राहू शकते. गर्भार काळ 280 दिवसांचा असू शकतो. पहिल्यांदा वासरू दिल्यानंतर पुन्हा 3-4 महिन्यांतच या गायी पुन्हा गाभण राहू शकतात. त्यामुळे स्थानिक जातींच्या तुलनेने हे ही संकरीत जात फायदेशीर पडते. कारण स्थानिक जातीच्या गाई पुन्हा गाभण राहण्यासाठी 5-6 महिने जावे लागतात.

2) दुधाचे उत्पन्न

कॅरन फ्राई जातीची गाय वर्षाकाठी सुमारे तीन ते साडेतीन हजार लिटर्स दूध देतात. एका प्रयोगात या जातीच्या गायीने साधारणतः तीन हजार सातशे लिटर्स दूध दिल्याची नोंद आहे. ह्या दुधामधील स्निग्धांश-फॅटचे प्रमाण 4.2 टक्के आहे व लॅक्टेशन दूध देण्याचा कालावधी तीनशे वीस दिवसांचा आहे.
  • भरपूर हिरवा चारा व इतर संतुलित आहार मिळाल्यास ह्या जातीच्या गायी समाधानी राहतात आणि दिवसाला साधारण पंधरा ते वीस लिटर दूध देतात. वासराच्या जन्मानंतरच्या तीन चार महिन्यांत दुधाचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे दिवसाला पंचवीस ते पस्तीस लिटरपर्यंत जाते.
  • दूध देण्याची क्षमता जास्त असल्यामुळे या गायीच्या आचळांची काळजी घ्यावी लागते. त्यांना जंतुसंसर्ग (मॅस्टिटिस) होऊ नये व त्यांच्या दुधामधील विशिष्ट खनिजांचे प्रमाण कमी होऊ नये यासाठी वेळीच लक्ष द्यावे लागते. त्यामुळे लगेच उपायही करता येतात.

  • याबाबतची अधिक माहिती खालील पत्त्यावर मिळू शकते. 

    विभाग प्रमुख, 
    दुग्धपशूसंवर्धन विभाग, 
    राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल, हरयाना, 132001, दुरध्वनी - 0184-2259092. किंवा 
    डेअरी कॅटल ब्रीडिंग डिव्हिजन, नॅशनल डेअरी रिसर्च इंस्टिट्यूट, कर्नाल, हरियाणा- 132001. दूरभाष: 0184-2259092. 

    लाल सिंधी :मुख्यतः पंजाब, हरियाना, कनार्टक, तामिळनाडु, केरळ आणि ओरिसामध्ये आहेत.दूध उत्पन्न – खेडेगावात:११०० किलो – व्यापारक्षम दुग्ध व्यवसायात: १९०० किलो 

    3) दुभत्या आणि भाकड जाती

    ओंगल :मुख्यतः आंध्रप्रदेशच्या नेल्लोर, कृष्णा, गोदावरी आणि गुंटूर जिल्हयात आढळतात.


  • दुध उत्पन्न –१५०० किलो बैलगाडी ओढण्यासाठी आणि नांगरणीसाठी सक्षम आसतात.

  •  

    हरियाना :मुख्यतः हरियानाच्या करनाल, हिसार आणि गुडगाव जिल्हयात , दिल्ली आणि पश्चिम मध्यप्रदेशात आढळतात . दूध उत्पन्न –११४० -४५०० किलो. बैल वाहतुकीच्या आणि नांगरणीसाठी उपयुक्त.


     

    कांकरेज :मुख्यतः गुजरातमध्ये आढळतात.दूध उत्पन्न – खेडेगावात:१३०० किलो – व्यापारक्षम दुग्ध व्यवसायात : ३६०० किलो. पहिल्या वेताचे वय-३६ ते ४२ महिने दोन वेतांमधील अंतर– १५ ते १६ महिने. बैल वेगवान, चपळ आणि भक्कम. नांगरणी आणि वाहतुकीसाठी उपयुक्त.


     

    देवनि :मुख्यतः आंध्रप्रदेशच्या ईशान्य आणि पश्चिम भागात आढळतात.गायी भरपुर दुभत्या आणि बैलकामासाठी उपयुक्त आहेत.


     


    4) भाकड जाती

    अमृतमहाल :मुख्यतः कनार्टक मध्ये आढळतात. नांगरणी आणि वाहतुकीसाठी चांगले.


     

    हल्लिकार :मुख्यतः कनार्टकच्या टुमकुर, हासन आणि म्हैसुर जिल्हयात आढळतात


     

    खिल्लार


     

    कांगायम :मुख्यतः तामिळनाडुच्या कोईंबतुर, इरोड, नमक्कल, करूर आणि दिंडीगुल जिल्हयात आढळतात.नांगरणी आणि वाहतुकीसाठी उपयुक्त. या जाती काटक असतात.


     


    5) विदेशी दुभत्या जाती

    जर्सी :पहिल्या वेताचे वय: २६ ते ३० महिने, दोन वेतांमधील अंतर – १३ ते १४ महिने,दूध उत्पन्न – ५०००-८००० किलो,दुधाचे उत्पन्न सुमारे २० लिटर आणि संकरित गायी दररोज ८ ते १० लिटर दूध देतात. भारतात या जातींना उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते.


     

    होलस्टिन फि्रजियन : मूळ जात हाँलडची आहे. दूध उत्पन्न - ७२०० ते ९००० किलो, विदेशी दुधाळ जातीमध्ये दूध उत्पन्नात ही सर्वोत्तम आहे. दररोज सरासरी ही २५ लिटर दूध देवू शकते आणि संकरित होलस्टिन फि्रजियन गायी १० ते १५ लिटर दूध देवू शकतात.सागरी किनारपट्टी आणि पठार भाग यांना अनुकूल आहे.


     


    6) म्हशींच्या जाती

    मुर्रहा :मुख्यतः हरियाना, दिल्ली आणि पंजाब राज्यात आढळतात, दूध उत्पन्न – १५६० किलो दररोज सरासरी ८ ते १० लिटर दूध देवू शकते याशिवाय संकरित मुर्रहा ६ ते ८ लिटर दूध देवू शकते.या जातींना सागरी किनारपट्टी आणि किंचीत थंड हवामान चांगले मानवते.


     

    सुर्ती : गुजरात १७०० – २५०० किलो


     

    जाफराबादी : गुजरातचा काठीयावाड जिल्हा, १८००-२७०० किलो


     

    नागपुरी : महाराष्ट्राचे नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्हे.दूध उत्पन्न – १०३० ते १५०० किलो


    दुभत्या जाती निवडीची सामान्य पद्धत


    7) दुभत्या गायींची निवड

    बाजारात गुरांची किंवा वासरांची निवड ही एक कला आहे. एक उत्तम गवळी आपला कळप कळपातील पैदाशीने ऊभा करतो. खालील मार्गदर्शक सूचना दुभत्या गायींच्या निवडीसाठी उपयुक्त आहेत.


  • जनावर खरेदी करतांना विशेषतः त्याची जात आणि दुग्ध क्षमतेवर निवडावे.
  • पुर्ववृत पत्रक किंवा वंशावळ तक्ता जे उच्च व्यवस्थापित दुग्ध शाळेत जोपासली जातात त्यावरून जनावरांचा इतिहास मिळतो.
  • दुधाचे सर्वाधिक उत्तपन्न हे पहिल्या पांच वेतांमध्ये मिळते. म्हणून निवड करतांना पहिल्या किंवा दुस-या वेतांची गुरे निवडावी आणि वेतांच्या एक महिन्यानंतरची असावी.
  • गायींचे लागोपाठ दोन वेळा दोहन करावे. त्याची सरासरी जनावराच्या दूध उत्पादनाचा पुसट अंदाज दर्शविते.
  • गाय शांत आणि कोणालाही दोहन करु देणारी असावी.
  • शक्यतो आक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात गुरे खरेदी करावी.
  • दुधाचे सर्वाधिक उत्पादन वेताच्या ९० दिवसांनंतर मिळते.

  • 8) उत्पादनक्षम गायींच्या जातींची लक्षणे

  • शांत स्वभावासोबत सुडौल बांधा, शक्तिवान, शरीराची नेटकी बांधणी आणि चांगली आकर्षक चाल असावी.
  • जनावराच्या शरीराचा आकार पाचरीसारखा(मागील बाजुस रूंद आणि पु़ढे निमुळता) असावी.
  • जनावराचे डोळे चमकदार आणि मान बारीक असावी.
  • कास पोटाला व्यवस्थित घट्ट चिकटलेली असावी.
  • कासेच्या त्वचेवर शिरांचे चांगले जाळे असावे.
  • कासेचे चारही कप्पे पूर्ण विकसीत असावे तसेच सडांची ठेवण नेटकी असावी.

  • 9) व्यापारक्षम दुग्ध व्यवसायात जातींची निवड - सूचना

  • भारतीय परिस्थीतीमध्ये व्यापारक्षम दुग्ध शाळेमध्ये किमान २० गुरं (१० गायी, १० म्हशीं) असणे आवश्यक आहे. ही संख्या सहज १०० गुरांपर्यंत जाऊ शकते. १०० गुरं ५०:५० किंवा ४०:६० च्या प्रमाणात. यानंतर तुम्हाला भांडवल आणि बाजारक्षमतेनुसार पुढील व्यवसायवृद्धिचा विचार करावा लागेल.
  • आरोग्यभिमुख मध्यमवर्गिय भारतिय कुटुंब कमी स्निग्ध पदार्थ असलेले दूध पिण्यासाठी पसंत करतात. गुरांच्या मिश्र जाती दुग्ध शाळेत असणे अधिक चांगले. (संकरित, गायी आणि म्हशीं एकाच आश्रयाखाली वेगळ्या दावणीला)
  • तुमच्या नजिकच्या बाजारपेठेची पूर्ण माहिती घ्या, जेथे विक्रीचा विचार आहे. तुम्ही वेगवेगळ्या दोन्ही प्रकारच्या जनावरांचे दूध एकत्रित किंवा मागणीनुसार विकू शकतात. हाँटेल आणि काही सामान्य ग्राहक (३०% पर्यंत) म्हशींचे दूध पसंत करतात. दवाखाने आणि इतर ठिकाणी गायींचे दूध लागते.

  • 10) दुग्ध शाळेसाठी गायीं/म्हशींची निवड

  • चांगल्या प्रतिच्या गायी बाजारात उपलब्ध आहेत आणि किंमत सुमारे रू.१२०० ते रू.१५०० प्रति लिटर प्रति दिन दूध उत्पादन. (उदा. १० लिटर दूध प्रति दिन गायीची किंमत रू.१२, ००० ते रू.१५, ००० असेल).
  • उत्तम व्यवस्थापनात १३ ते १४ महिन्याच्या अंतरात गाय हमखास एक वासरू देते.
  • गायी स्वभावाने शांत आणि हाताळण्यासाठी सोयींच्या असतात. अधिक दूध देणा-या संकरित जातींना (होलस्टिन आणि जर्सि संकर) भारतीय हवामान पोषक आहे.
  • गायींच्या दुधामध्ये स्निग्ध पदार्थ ३ ते ५.५ टक्के असते जे म्हशींच्या दुधापेक्षा कमी आहे.

  • 11) म्हशी

  • भारतात आपल्याकडे चांगल्या म्हशींच्या जाती (उदा.मुर्हा आणि मेहसाना) व्यापारक्षम दुग्ध शाळेसाठी उपयुक्त आहेत.
  • म्हशीं दुधामध्ये गायींपेक्षा अधिक स्निग्ध पदार्थ असतात म्हणून त्याला लोणी आणि तुपासाठी अधिक मागणी असते. म्हशींचे दूध चहा आणि इतर भारतीय पेयांमध्ये अधिक वापरले जाते.
  • म्हशीं तंतुमय पिकांच्या ताटांवरसुद्धा जगवल्या जावू शकतात, म्हणून चा-याचा खर्च कमी होतो.
  • म्हशीं उशिरा वयांत येतात आणि त्यांचे दोन वेतांमधील अंतर १६ ते १८ महिने असते. म्हशीं नर पाडसाची बाजारात कमी किंमत येते.
  • म्हशींना थंडाव्याची गरज असते.(उदा. पाण्याचे टाके किंवा तुषार पंखे)
  • संकरीत जनावरांसाठीचा निवारा

    संकरित जनावरांसाठी निवारा हा वयोगटानुसार असावा. निवारा करताना खालील गोष्टींचा विचार करून तो तयार करावा.

    वयोगटानुसार निवारा तक्‍ता

    वयोगट

    मांगराचीजागा(मी.)

    उभे राहण्याचे किंवाव्यापले जाणारे क्षेत्र(चौमी.)

    मोकळीजागा (चौमी.)

    ४-६ महिने

    0.2-0.3

    0.8-1.0

    3.0-4.0

    ६-१२ महिने

    0.3-0.4

    1.2-1.6

    5.0-6.0

    १-२ वर्षे

    0.4-0.5

    1.6-1.8

    6.0-8.0

    गाई

    0.8-1.0

    1.8-2.0

    11.0-12.0

    गर्भार गाई

    1.0-1.2

    8.5-10.0

    15.0-20.0

    बैल*

    1.0-1.2

    9.0-11.0

    20.0-22.0

    वासरांचे संगोपन/व्यवस्थापन

    • सुरुवातीचे संगोपन
    • वासरांना खायला घालणे
    • वासरांचे विशेष खाणे उर्फ काफ मिक्स्चर
    • वासरासाठी रफेज म्हणजे कोंज्यासारखे पाचक अन्न
    • दुस-या गाईच्या दुधावर वाढवणे
    • काफ स्टार्टरवर वाढवणे
    • दुधाला पर्यायी अन्नावर वासरे वाढवणे
    • पाण्याचे महत्त्व
    • सोडवल्यानंतर
    • वासराची वाढ
    • गोठ्यात पुरेशी जागा करा
    • निरोगी ठेवा

    1) सुरुवातीचे संगोपन

  • वासरू जन्माला आल्याबरोबर लगेचच त्याच्या नाकातोंडामधील चिकट पदार्थ दूर करावा.
  • साधारणपणे गाय आपल्या नव्याने जन्मलेल्या वासराला चाटून साफ करतेच. त्यामुळे वासराची कातडी कोरडी आणि साफ होतेच शिवाय त्याचा श्वास आणि रक्ताभिसरण व्यवस्थित सुरू होते. हवा थंड असताना किंवा गाईने वासराला न चाटल्यास कोरड्या कापडाने वासराचे अंग पुसा तसेच त्याची छाती दाबून कृत्रिम श्वासोच्छवास द्या. त्याच्या शरीरापासून साधारण २ ते ५ सेंमी अंतरावर नाळ बांधा आणि लिगॅचरच्या खाली १ सेंमीवर तोडा. तेथे टिंक्चर आयोडिन किंवा बोरिक ऍसिड किंवा इतर कोणतेही प्रतिजैवक औषध (ऍँटिबायोटिक) लावा. गोठ्यातली सर्व ओली कापडे इ. काढून टाकून तो अतिशय स्वच्छ आणि कोरडा करा. वासराचे वजन नोंदून ठेवा.
  • गाईची आचळे शक्यतो क्लोरिनच्या द्रावणाने धुवून कोरडी करा.
  • गाईला येणारे पहिले (चिकाचे) दूध (कोलोस्ट्रम) वासराला पिऊ द्या.
  • जन्माला आल्यानंतरच्या पहिल्या तासात वासरू स्वतःच्या पायांवर उभे राहून पिण्याचा प्रयत्न करू शकते. परंतु एखादे वासरू कमजोर असल्यास त्याला उभे राहण्यासाठी मदत करा.

  • 2) वासरांना खायला घालणे

    वासराचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे अन्न म्हणजे आईचे पहिले उर्फ चिकाचे दूध. जन्मानंतरचे पहिले ३ ते ७ दिवस त्यास आईकडून हे पोषणयुक्त चिकाचे दूध मिळते. त्यामध्ये जंतुसंसर्गाशी सामना करणारी रोगप्रतिकारक द्रव्ये (ऍँटिबॉडीज) तसेच पोषण कमी पडल्यास ते भरून काढणारे पदार्थदेखील असतात. वासराला चिकाचे दूध अवश्य पिऊ द्या.

    या दूधाशिवाय पहिले ३ ते ४ आठवडे वासराला दूधदेखील मिळाले पाहिजे. त्यानंतर मात्र ते झाडपाल्यामधील स्टार्च आणि साखर पचवू शकते. ह्या दिवसांत दूध दिल्याने त्यास पोषक द्रव्ये मिळत राहतात हे खरे परंतु असे करणे महाग पडत असल्यास धान्य देऊ शकता. सर्व पातळ पदार्थांचे तापमान वातावरणीय किंवा शारीरिक तापमानाएवढे असू द्या

    वासरांना खाणे देण्यासाठी भांडी वापरली असल्यास ती स्वच्छ करा. सर्व साहित्य कोरड्या व स्वच्छ ठिकाणी ठेवा.

    आपण वासराला खायला काय देता ह्यानुसार खायला घालण्याची पद्धत बदलेल. साधारणपणे खालील पद्धती वापरल्या जातात

  • पूर्ण दूध देणे
  • स्निग्धांश काढलेले (स्किम्ड) दूध देणे
  • दुधाशिवाय इतर पातळ पदार्थ देणे – उदा. ताजे ताक, गोड दह्याचे पाणी, पेज इ.
  • दुधाच्या पर्यायी पदार्थावर वाढवणे
  • वासरांसाठीच्या खास मिश्रणावर (काफ स्टार्टर्स) वाढवणे
  • आईशिवाय दुसऱ्या गाईचे (नर्स काऊ) दूध देणे
  • साधारण ५० किलो वजनाच्या वासराला पहिल्या तीन महिन्यांमध्ये लागणाऱ्या पोषणमूल्यांची गरज याप्रमाणे असते
  • - कोरडे पदार्थ (ड्राय मॅटर डीएम)1.43kg
    - कच्ची प्रथिने315g
    - पचण्याजोगी एकूण पोषकद्रव्ये (टीडीएन)1.60kg
  • हे लक्षात ठेवा की टीडीएन ची गरज डीएम पेक्षा जास्त असते कारण त्याच्या आहारात फॅट्सचे प्रमाण जास्त असते. १५ दिवसांचे वासरू गवत खाण्याचा प्रयत्न करते. ते दरदिवशी सुमारे अर्धा किलोग्राम गवत खाते. तिसर्यात महिन्यात हेच प्रमाण ५.० किलोग्रामपर्यंत जाते.
  • ह्या दिवसांत, हिरव्या चारयाऐवजी, चांगल्या प्रतीचे १-२ किलोग्राम वाळवलेले गवत देता येईल. वय १५ दिवस असताना ०.५ किलोग्राम तर ३ महिन्याच्या वासराला १.५ किलोग्राम द्यावे.
  • तिसर्याव आठवड्यानंतर, पूर्ण दुधाचे प्रमाण कमी पडत असल्यास, त्याजागी स्किम्ड दूध, ताक अथवा दुधाऐवजी इतर काही पातळ पदार्थ द्यावा.

  • 3) वासरांचे विशेष खाणे उर्फ काफ मिक्स्चर

  • काफ मिक्स्चरमध्ये दूध किंवा इतर पातळ पदार्थांवर वाढणार्या् वासरासाठी पूरक पोषकद्रव्ये असतात. ह्यात मुख्यतः मका किंवा ओट्ससारखी धान्ये असतात.
  • ह्या मिश्रणात बार्ली, गहू किंवा ज्वारीसारखी धान्येही वापरता येतात उसापासून मिळणार्याम मोलासेसचेही प्रमाण ह्यामध्ये १०% पर्यंत ठेवता येते.
  • दर्जेदार मिश्रखाद्यात ८०% टीडीएन आणि २२% सीपी असते.

  • 4) वासरासाठी रफेज म्हणजे कोंज्यासारखे पाचक अन्न

  • वासराचा कोठा साफ ठेवण्यासाठी पानांपासून किंवा शेंगा देणार्याी वनस्पतीपासून बनवलेले व बारीक केलेले वाळवलेले गवत उत्तम. दोन आठवड्यांनेतर हे दिलेले चालते. थोडे गवत मिळलेला कडबादेखील अतिशय उपयोगी असतो.
  • सूर्यप्रकाशात वाळवलेल्या छान हिरव्या रंगाच्या गवतापासून अ तसेच ड आणि बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्वे मिळतात.
  • ६ महिन्यांचे वासरू सुमारे १.५ to २.२५ किलोग्राम कडबा खाते. वयानुसार अर्थातच खाण्याचे प्रमाण वाढते.
  • ह्याशिवाय, ६ ते ८ आठवडे वयानंतर, चांगल्या रीतीने साठवलेला ओला चारा (सायलेज) थोड्या प्रमाणात दिला तरी चालतो. मात्र ओला चारा लवकर सुरू केल्याने वासराच्या अंगावर खटे (स्कोअर्स) पडतात.
  • वासरू ४ ते ६ महिन्यांचे होईपर्यंत शक्यतो ओला चारा देऊ नये.
  • लक्षात ठेवा की मका तसेच ज्वारीचा ओला चारा बरेचदा दिला जात असला तरी त्यामध्ये फारशी प्रथिने नसतात आणि ड जीवनसत्वाचे प्रमाणही अगदी कमी असते

  • 5) दुस-या गाईच्या दुधावर वाढवणे

  • वासराला काही कारणाने त्याच्या आईचे दूध मिळू शकत नसल्यास कमी फॅटचे पण भरपूर दूध देणारया गाईचे दूध अशा २ ते ४ वासरांना, अगदी पहिल्या आठवड्यापासून, देता ये
  • कोरड्या चार्या्सोबत इतरही कोरडे अन्न देता येते. अशी वासरे दुसर्या ते तिसर्याड महिन्यापासून बाहेरच्या दुधावर वाढवता येतात.

  • कांजी किंवा पेजेवर (ग्रुएल) वासरे वाढवणे


    हा काफ-स्टार्टरचाच पातळ प्रकार आहे. मात्र हा दुधाला पर्याय नाही. चौथ्या आठवड्यापासून वासराच्या अन्नातील दुधाचे प्रमाण कमी करून पेज वाढवली जाते.


    6) काफ स्टार्टरवर वाढवणे

    ह्या पद्धतीत वासरांना प्रथम पूर्ण दुधावर वाढवतात. नंतर त्यांना कोरडे अन्नपदार्थ व चारा खाण्यास शिकवले जाते. ती ७ ते १० आठवड्यांची झाल्यावर त्यांना दुधापासून पूर्णपणे दूर ठेवले जाते.

    7) दुधाला पर्यायी अन्नावर वासरे वाढवणे

    एक लक्षात ठेवा की वासराला पोषणमूल्ये मिळण्याच्या दृष्टीने दुधाला पर्याय असू शकत नाही. मात्र दूध किंवा तशा इतर पातळ पदार्थांचा तुटवडा असल्यास पर्यायी अन्न द्यावे लागेल.


    ज्या दराने आपण वासराला पूर्ण दूध द्याल त्याच दराने हे पर्यायी अन्न द्या – त्याच्या वजनाच्या १०% ह्याप्रमाणे. ह्या पर्यायी अन्नातील एकूण घन पदार्थ पातळ पदार्थाच्या १० ते १२% ठेवा.

    बाहेरचे दूध देणे

  • वासरू गाईपासून सोडवणे हे कार्यक्षम दुग्धशाळा व्यवस्थापनाचे एक अविभाज्य अंग आहे. ह्यामुळे एकसमान व्यवस्थापन करता येते आणि प्रत्येक वासराला योग्य त्या प्रमाणात दूध मिळण्याची खात्री राहते. तसेच एखाद्या वासराने अति दूध पिणे किंवा दूध वाया जाणेही टाळता येते.
  • अवलंब केलेल्या व्यवस्थापनाच्या पद्धतीनुसार वासरू सोडवण्याचे काम त्याच्या जन्मापासूनच किंवा ३, ८ ते १२, अथवा २४ आठवड्यांनीदेखील करता येते. शेतावरील किंवा गोठ्यातील प्रत्यक्ष परिस्थितीनुसार ही सोडवणूक १२ व्या आठवड्यातही करता येईल. मात्र नर वासरे (बैल) आईजवळ ६ महिन्यांपर्यंत देखील ठेवली जातात.
  • मोठ्या कळपामध्ये वासराची सोडवणूक जन्मानंतर लगेचच करणे चांगले.
  • जन्मानंतर लगेचच सोडवल्याने पर्यायी अन्न आणि काफ मील्स लवकर सुरू करता येतात ज्यायोगे गाईचे दूध आपण पिण्यासाठी वापरू शकतो.

  • 8) पाण्याचे महत्त्व

    नेहमी ताजे व स्वच्छ पाणी मिळेल असे पहा. वासराने एका वेळी जास्त पाणी पिऊ नये ह्यासाठी पाण्याचे भांडे वेगळे तसेच दुधाच्या भांड्यापासून लांबवर ठेवा.


    9) सोडवल्यानंतर

    सोडवल्यानंतरच्या ३ महिन्यांत काफ स्टार्टरचे प्रमाण हळूहळू वाढवत न्या. चांगल्या दर्जाचा कडबा वासरांना हवा तेवढा मिळाला पाहिजे. जास्त ओलावा असलेले पदार्थ (म्हणजे हिरवे गवत किंवा उत्कृष्ट चारा) वासराला आपण त्याच्या वजनाच्या ३ टक्क्यांपर्यंत देऊ शकता. अर्थात जास्त खाणे देऊ नका कारण त्याने शरीरात एकंदर पोषणमूल्ये कमी जातात.


    10) वासराची वाढ

    वासराची वाढ आपणांस हव्या त्या वेगाने होत आहे ना हे पाहण्यासाठी त्याचे वाढते वजन तपासा. 
  • वासरांना पहिल्या तीन महिन्यात दिले जाणारे अन्न फार महत्त्वाचे असते.
  • ह्या दिवसांत चुकीचे अन्नपाणी मिळाल्यास २५-३०% वासरे मरू शकतात.
  • गाभण गाईस, विण्याआधीच्या २-३ महिन्यांत दर्जेदार चारा व पोषकद्रव्ये पुरवा
  • जन्माचे वेळी वासराचे वजन साधारणपणे २०-२५ किलोग्राम असते.
  • वासराला चांगले खायला घाला, त्याला जंत होत नाहीत हे पहा. ह्याने त्याचे वजन दरमहा १०-१५ किलोग्राम वाढेल.

  • 11) गोठ्यात पुरेशी जागा करा

    सोडणणुकीचे दिवस येईपर्यंत प्रत्येक वासरू स्वतंत्र खणात ठेवा. म्हणजे दूध पिताना ती एकमेकांना त्रास देणार नाहीत तसेच सांसर्गिक रोग पसरणार नाहीत. प्रत्येक खण स्वच्छ, कोरडा ठेवा आणि त्यामध्ये हवा खेळू द्या. मात्र वासरांच्या अंगावर थेट गार हवा येऊ देऊ नका.


    वासरांना झोपण्यासाठी गवताची किंवा भुश्याची गादी पुरवा. गोठा बाहेर मोकळ्यावर असल्यास त्यावर छप्पर द्या तसेच कडक उन्हामुळे आतील हवा तापणार नाही हे पहा. पाऊस आणि गार वारा अडवण्याची व्यवस्था करा. गोठ्याची पूर्वेकडची बाजू मोकळी असल्यास सकाळचे ऊन आत येते शिवाय नंतरच्या कडक उन्हापासून संरक्षण मिळते. तसेच आपल्याकडे पाऊसदेखील फारच क्वचित पूर्वेकडून पडत असल्याने तोही प्रश्न आपोआप सुटतो.


    12) वासरे निरोगी ठेवा

    सुरूवातीपासूनच वसरांची तब्येत चांगली असणे आवश्यक आहे म्हणजे नंतर मृत्यू, आजारपण, रोगराईचा फैलाव अशांसारख्या समस्या उद्भवत नाहीत. वासरांवर नियमित नजर ठेवा, त्यांना योग्य रीतीने योग्य तेच खायला द्या आणि मुख्य म्हणजे स्वच्छता राखा.

    गुरांमधील वंध्यत्व व उपचार

    • वंध्यत्वाची कारणे
    • लैंगिक चक्र
    • वंध्यत्व टाळण्यासाठी टिपा

    गुरांमधील वंध्यत्व हे भारतातील दुग्धशेती आणि दुग्ध उद्योगाच्यात मोठ्या आर्थिक हानिचे कारण आहे. वांझ प्राण्यांना पोसणे हे एक आर्थिक ओझे असते आणि अनेक देशांमध्ये अशी जनावरे कत्तलखान्यात पाठवली जातात.


    गुरांमध्ये, सुमारे १०-३० टक्के गुरे व्यंधत्व किंवा प्रजननाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त असतात. चांगला प्रजनन दर गाठण्यासाठी किंवा पाडसांचा उच्च दर गाठण्यासाठी नर आणि मादी, दोघाही प्राण्यांना चांगला आहार दिला पाहिजे आणि आजारांपासून मुक्त ठेवले पाहिजे.

    1) वंध्यत्वाची कारणे

    वंध्यत्वाची कारणे अनेक आहेत आणि ती गुंतागुंतीची असू शकतात. वंध्यत्व किंवा गर्भार राहण्यास आणि पाडसाला जन्म देण्यास असमर्थता यामागे कुपोषण, जंतुसंसर्ग, जन्मजात दोष, व्यवस्थापकीय चुका आणि मादीमधील अंडाशय किंवा संप्रेरकांमधील असमतोल ही कारणे असू शकतात.


    2) लैंगिक चक्र

    गाई आणि म्हशींचे लैंगिक चक्र (ऑयस्ट्रस) १८-२१ दिवसांतून एकदा १८-२४ तासांसाठी असते. मात्र म्हशींमध्ये हे चक्र जाणवून येत नाही त्यामुळे शेतक-यांसमोर मोठी समस्या उभी राहते. शेतक-यांनी प्राण्यांचे पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत ४-५ वेळा जवळून निरीक्षण करावे. कमी उष्णरता गेल्यामुळे व्यंधत्वाची पातळी वाढू शकते. चक्रामध्ये असणार्या प्राण्यांमध्ये दृश्य चिन्हे ओळखण्यासाठी बर्‍यापैकी कौशल्याची गरज असते. जे शेतकरी उत्तम नोंदी ठेवतात आणि प्राण्यांचे निरीक्षण करण्यात अधिक वेळ घालवतात त्यांना चांगले परिणाम प्राप्त होतात.


    3) वंध्यत्व टाळण्यासाठी टिपा

  • ऑयस्ट्रस कालावधीच्यात दरम्यान प्रजनन करावे.
  • त्या प्राण्यांमध्ये ऑयस्ट्रस दिसत नाही किंवा चक्र येत नाही त्यांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करावेत.
  • पोटातील जंतांपासून संसर्गाच्या बचावासाठी व प्राण्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी ६ महिन्यांतून एकदा डिवर्मिंग करावे. नियमित डिवर्मिंगमध्ये लहानशी गुंतवणूक केल्याने दुग्धोत्पादनात मोठा फायदा होऊ शकतो.
  • गुरांना उर्जा, प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वांच्या पुरवण्या असणारा संतुलित आहार द्यावा. यामुळे गर्भार राहण्याचा दर, निरोगी प्रसूती, सुरक्षित जन्म, कमी जंतुसंसर्ग आणि निरोगी पाडस होणे यांत मदत होते.
  • लहान मादी पाडसांची योग्य पोषण देऊन काळजी घेतल्यास त्यांना वेळेवारी पौगंडावस्था गाठता येते आणि त्यांचे वजन ही २३०-२५० कि.ग्रा. चे आदर्श प्रमाण गाठू शकते जे प्रजननासाठी आणि योग्य गर्भारपणासाठी आवश्यक असते.
  • गर्भावस्थेमध्ये पुरेशा प्रमाणात हिरवा चारा खायला घातल्याने नवजात पाडसांमधील अंधपणा टाळता येतो आणि जन्मानंतर नाळ सांभाळून ठेवता येते.
  • नैसर्गिक सेवेमध्ये जन्मजात दोष आणि संसर्ग टाळण्यासाठी बैलाचा प्रजनन इतिहास खूप महत्त्वाचा असतो.
  • गाईंची प्रसूती स्वच्छ जागेमध्ये केल्याने गर्भाशयाचे संसर्ग मोठ्या प्रमाणात टाळता येतात.
  • गर्भरोपणानंतर ६०-९० दिवसांनी प्राण्यांना गर्भारपणाच्या निश्चितीसाठी प्रशिक्षित पशुवैद्याद्वारा तपासावे.
  • गर्भधारणा होते तेव्हां मादी अॅधनेस्ट्रस (नियमित ऑयस्ट्रस चक्रे न येणे) च्या कालावधीमध्ये प्रवेश करते. गाईसाठी गर्भावस्था कालावधी सुमारे २८५ दिवस तर म्हशींसाठी ३०० दिवस असतो.
  • गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात अनियंत्रित ताण आणि वाहतूक टाळावी.
  • अधिक चांगले पोषण देण्यासाठी आणि प्रसूतीसाठी नेहमीच्या घोळक्यापासून दूर ठेवले जाऊ शकते.
  • गर्भार प्राण्यांना त्यांच्या प्रसूतीपूर्वी दोन महिने त्यांचे दूध निथळू द्यावे आणि त्यांना पुरेसे पोषण व व्यायाम द्यावा. यामुळे आईचे आरोग्य सुधारण्यास, जन्माच्या वेळीच्या सामान्य वजनासह पाडसाचा जन्म होण्यास, आजाराचे प्रमाण कमी होण्यास आणि लैंगिक चक्र पुन्हा लवकर सुरु होण्यास मदत होते.
  • बचतपूर्ण आणि नफादायक दुग्धशेतीसाठी दरवर्षी एक पाडस हा दर गाठण्यासाठी प्रसूतीनंतर चार महिने ते १२० दिवसांच्या आत प्रजनन सुरु करावे.
  • जनावरांचा तोंड व पायाचा रोग

    • तोंड व पायाचा रोग
    • लक्षणे काय असतात ?
    • हा रोग कसा पसरतो ?
    • उत्तर-परिणाम काय आहेत?
    • उपचार
    • लसीकरणाचा वेळापत्रक-तक्‍ता

    1) तोंड व पायाचा रोग

    तोंड व पायाचा रोग (एफएमडी) हा गुरेढोरे जसे मेंढ्या, शेळ्या आणि डुकरे यांच्‍यासारख्‍या खुरे असलेल्‍या जनावरांमध्‍ये (दुभागलेला पाय) सर्वांत जास्‍त संसर्गजन्‍य असलेला रोग आहे. हा रोग भारतामध्‍ये स्‍थानिक विशेष आहे आणि रोगट जनावरांचे उत्‍पाद दुस-या देशांमध्‍ये निर्यात करण्‍यावर प्रतिबंध असल्‍यामुळे त्यामूळे उत्‍पादकतेमध्‍ये कमतरता आल्‍याने देशाला गंभीर आर्थिक हानि होते.


    2) लक्षणे काय असतात ?

    • खूप ताप येणे
    • दुग्‍ध-उत्‍पादनात कमतरता येणे
    • पाय, तोंड आणि कांस यांवर फोड येणे
    • पायांमध्‍ये फोड आल्‍याने लंगडणे
    • तोंडात फोड आल्‍याने तोंडावाटे फेसाळलेली लाळ गळणे

    तोंडामध्‍ये रोगाची लक्षणे

     

    पायांत रोगाची लक्षणे

     

    3) हा रोग कसा पसरतो ?

    • प्रभावित जनावरांच्‍या लाळेतून व मल-मूत्रांतून, दुधातून तसेच फोडांमधील द्रवपदार्थाच्‍या वाहण्‍यातून विषाणू बाहेर टाकला जातो.
    • विषाणू एकीकडून दुसरीकडे हवेच्‍या माध्‍यमाने पसरतो आणि विशेषत: जेव्‍हां हवेत आर्द्रता जास्‍त असते तेव्‍हां विषाणू एका जागेतून दुसरीकडे सहज पसरतो.
    • रोग-प्रभावित जनावरांपासून निरोगी जनावरांना खाद्य, पाणी आणि कुत्रे, पक्षी यां सारख्‍या प्राण्‍यापासून तसेच शेतावरील कामगारांच्‍या इकडे-तिकडे येण्‍या-जाण्‍यामुळे देखील हा रोग पसरतो.
    • संसर्ग झालेल्‍या शेळ्या व डुकरे मल-मूत्रामार्गे व्‍हायरस बाहेर टाकतात आणि हा रोग तीव्रतेने पसरविण्‍यात महत्‍वाची भूमिका पार पाडतात.
    • देशी/स्‍थानिक जनावरांपेक्षा गुरा-ढोरांच्‍या संकरित प्रजाती संसर्ग होण्‍यासाठी जास्त संवेदनशील/ सुग्राह्य असतात.
    • संसर्ग झालेल्‍या जनावरांच्‍या एका जागेतून दुसरीकडे वाहतूक केल्‍याने देखील हा रोग पसरतो.

    4) उत्तर-परिणाम काय आहेत?

    रोगग्रस्‍त जनावरे चर्वण करणे, गर्भधारण करणे, उष्‍णता सहन करणे यांसाठी संवेदनक्षम होतात आणि दुग्‍ध उत्‍पादनात कमतरता येते.

    प्रसरण कसे नियंत्रित करावे?

    • स्‍थानिक-विशेष क्षेत्रांमध्‍ये निरोगी जनावरांना पाठविले जाऊ नये.
    • प्रभावित क्षेत्रांमधून जनावरांची खरेदी करण्‍यात येऊ नये.
    • नव्‍याने विकत घेतलेल्‍या जनावरांस वैद्यकीय परीक्षण पूर्ण होईपर्यंत फार्ममध्‍ये/शेतात इतर जनावरांपासून २१ दिवस वेगळे ठेवण्‍यात यावे.

    4) उपचार

    • तोंड व पायांचा रोग असलेल्‍या जनावरांना १% पोटॅशियम परमँगनेट असलेल्या पाण्‍याने धुवावे. पायांच्‍या फोडांना ऍन्टिसेप्टिक लोशन लावावे. बोरिक ऍसिड व ग्लिसरिनचा लेप तोंडातील फोडांवर लावावा.
    • रोगग्रस्त जनावरांना उपशामक आहार द्यावा आणि त्‍यांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवण्‍यात यावे.

    5) लसीकरणाचा वेळापत्रक-तक्‍ता

    • ६ महिन्‍यांतून एकदा एफएमडी संवेदनक्षम जनावरांचे लसीकरण करावे. लसीकरणा कार्यक्रमात गुरु-ढोरे, शेळ्या, मेंढ्या आणि डुकरे यांचा ही समावेश असावा.
    • वासरांना प्रथम लसीकरण ४ महिने वयाची झाल्‍यावर आणि दुसरे लसीकरण ५व्‍या महिन्‍यांत द्यावे. त्‍या नंतर बूस्‍टर डोज् ४-६ महिन्‍यांनी एकदा द्यावा.

    6) अझोला - पशुखाद्यासाठी वापर

    • अझोलाबाबत
    • अझोला – चारा/खाद्य स्वरूपात
    • अझोला उत्पादन
    • कापणी करणे
    • पर्यायी इनपुटस्
    • वाढीसाठी पर्यावरण घटक
    • अझोलाच्या शेतीसाठी आवश्यक असलेले घटक
    • जनावरांना खाऊ घालण्याची पद्धत

    1) अझोलाबाबत

    • अझोला जलशैवालासारखे दिसणारे तरंगते फर्न आहे.
    • सामान्यपणे अझोला तांदुळाच्या शेतात किंवा उथळ पाण्याच्या जागी उगविण्यात येते.
    • ह्याची वाढ फार भराभर होते.

    अझोला जवळून वेध

    2) अझोला – चारा/खाद्य स्वरूपात

    • प्रथिने, आवश्यक एमिनो ऍसिडस्, जीवनसत्वे (व्हिटॅमिन ए, बी 12 आणि बीटाकेरोटिन) वाढ आणि खनिजांसाठी जसे कॅल्शियम, फॉस्फोरस, पोटॅशियम, लोह, तांबे, मॅग्नेशियम यांनी परिपूर्ण आहे.
    • शुष्क वजन आधारित, याच्यामध्ये 25-35 टक्के प्रथिने, 10-15 टक्के मिनरल आणि 7-10 टक्के ऍमिनो ऍसिडस्, बायोऍक्टिव्ह पदार्थ आणि बायो-पॉलिमर्स.
    • याच्यात उच्च प्रथिने आणि निम्न लीनिन कंटेंट असूनसुध्दा जनावरांना सुलभतेने पचणारे.
    • अझोला घन आहारात मिसळून किंवा नुसतेच अझोला जनावरांना देऊ शकतो.
    • अझोला हे पोल्ट्री, शेळ्या-मेंढ्या, डुकरे आणि ससे यांना ही दिला जाऊ शकतो.

    3) अझोला उत्पादन

    • जमीन सारखी व स्वच्छ करून घेण्यात येते.
    • आयताकार स्वरूपात विटा आडव्या टाकल्या जातात.
    • विटांनी तयार करण्यात आलेल्या आयताकाराच्या मार्जिनला झाकणारी 2mX2m मापाची एक पातळ यूव्ही स्टॅबिलाइझ्ड शीट टाकली जाते.
    • 10-15 किलो चाळून बारीक केलेली माती सिल्प्यूलाइन पिट वर टाकण्यात येते.
    • 2 किलो शेणाचे स्लरी तयार करण्यात येते आणि 30 ग्राम सुपर फॉस्फेट 10 लिटर पाण्यात मिसळून, शीटवर टाकण्यात येते. पाण्याची पातळी 10 सेमी वाढविण्यासाठी आणखी पाणी टाकण्यात येते.
    • सुमारे 0.5 ते 1 किलो शुध्द मदर अझोला कल्चर बी, माती व पाणी एकसारखे करून अझोला बेड वर पसरतात. अझोलाच्या रोपांवर तात्काळ पाणी शिंपडावे.
    • एका आठवड्याच्या काळात, अझोला बेड वर सर्वत्र पसरतो आणि एखाद्या जाड्या चटईसारखा दिसतो.
    • 20 ग्राम सुपर फॉस्फेट आणि सुमारे 1 किलो गाईचे शेण 5 दिवसांत एकदा मिसळण्यात आले पाहिजे ज्यायोगे अझोलाची लवकर वाढ आणि रोजची 500 ग्रामची उपज कायम राहील.
    • मायक्रोन्यूट्रिंट मिक्स ज्यामध्ये मॅग्नेशियम, लोह, तांबे, गंधक इत्यादि देखील आठवड्यातून एकदा मिसळावे म्हणजे अझोलातील खनिज घटकांची वाढ होईल
    • 30 दिवसांतून एकदा, सुमारे 5 किलो बेड माती ताज्या मातीने बदलून टाकावी, ज्यायोगे नायट्रोजनची वाढ आणि मायक्रोन्युट्रिंटची कमतरता यांच्यावर उपाय होईल.
    • 25 ते 30 टक्के पाणी देखील, दर 10 दिवसांनी बदलावे, म्हणजे बेडवर नायट्रोजनची वसढ होण्यापासून बचाव होईल
    • बेड स्वच्छ ठेवावा, पाणी व माती बदलावी आणि नवीन अझोला दर सहा महिन्यांनी लावावा.
    • अझोलाच्या शुध्द कल्चरने युक्त असा ताजा बेड लावावा जेव्हा कीटक किंवा रोग लागणे सुरू होईल.
    संपूर्ण वाढ झालेले अझोला 
     
    संपूर्ण वाढ झालेले अझोला 

    4) कापणी करणे

    • लवकर वाढून पिट 10-15 दिवसांत भरून टाकेल. त्या वेळेपासून, 500-600 ग्राम अझोलाची कापणी दर रोज होऊ शकते.
    • 15व्या दिवसापासून एखाद्या चाळणी किंवा ट्रेच्या मदतीने केले जाऊ शकते
    • कापणी केलेला अझोला ताज्या पाण्याने धुवायला हवा म्हणजे गाईच्या शेणाचा वास जाईल.

    5) पर्यायी इनपुटस्

    • ताज्या बायोगॅस स्लरीचा वापर केला जाऊ शकतो.
    • न्हाणीघर आणि गोठ्यातील सांडपाणी पिट् भरण्यासाठी वापरले जाऊ शकते. ज्या क्षेत्रांत ताज्या पाण्याचा अभाव आहे, कपडे धुतल्या नंतर उरलेले पाणी (दुसऱ्यांदा खंगाळलेले) देखील वापरले जावू शकते.

    6) वाढीसाठी पर्यावरण घटक

    • तपमान 200c - 280c
    • प्रकाश 50% पूर्ण सूर्यप्रकाश
    • संबंधित आर्द्रता 65 - 80%
    • पाणी (टाकीमध्ये असलेले) 5 - 12 cm
    • pH 4-7.

    7) अझोलाच्या शेतीसाठी आवश्यक असलेले घटक

    • एखाद्या जाळीत धुणे बरे म्हणजे लहान-सहान रोपटी पडून गेल्यरा त्यांना पुन्हां तळ्यात टाकता येईल.
    • 250c पेक्षा कमी राहील ह्याची काळजी घेणे.
    • सावलीची जाळी वापरून प्रकाशाची तीव्रता कमी करता येईल.
    • ओव्हर क्राउडिंग टाळण्यासाठी अझोला बायोमास दर रोज काढून टाकावा.

    7) जनावरांना खाऊ घालण्याची पद्धत

    • ओला अझोला
    • साधारणपणे एक ते दीड किलो अझोला प्रति दिन प्रत्येक जनावरास खाऊ घालावा. एका दिवशी जास्तीत जास्त दोन किलो अझोला प्रत्येक जनावरास देता येतो. सुरवातीस पशुखाद्यात / आंबवणामध्ये मिसळून १ः१ या प्रमाणात अझोला खाऊ घालावा, त्यानंतर पशुखाद्याशिवाय अझोला खाऊ घालावा.


    • सुका अझोला (अझोला मिल)
    • अझोला सुकवल्यानंतर दहा टक्के प्रमाणात पशुखाद्यात मिसळून वापरावा. 

      वेगवेगळ्या जनावरांना खाऊ घालण्याची पद्धत :

      दुधाळ गाई व म्हशी : दुभत्या जनावरांच्या चाऱ्यामध्ये, आंबवणामध्ये एक ते दीड किलो अझोला प्रति दिन मिसळून (१:१ प्रमाण) खाऊ घालावा. दूध उत्पादनात, तसेच फॅटमध्ये वाढ होते.

      वासरे : अझोलाच्या वापरामुळे वासरांच्या वजनात (३०० ते ५०० ग्रॅम) वाढ झाल्याचे दिसून येते.

      शेळ्या व मेंढ्या : अझोलाच्या वापरामुळे फॅट, दूध व वजन (३००-५०० ग्रॅम) वाढ होते. पक्षी (कुक्कुट, बदक, इमू, लाव्ही) : कोंबड्यांच्या खाद्यात मिश्रण स्वरूपात अझोलाचा वापर केल्यास मांसल कोंबड्यांचे वजन वाढते व अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या उत्पादनात वाढ होते, तसेच अंड्यांचा पृष्ठभाग चकचकीत होतो.


      अझोला खाद्याचे फायदे : १) दूध उत्पादन, फॅट, वजन व अंड्यांचे उत्पादन यांमध्ये वाढ. २) १५-२० टक्के आंबवणावरचा खर्च कमी होऊन खाद्यावरच्या खर्चात बचत होते. ३) एकूणच जनावरांत गुणवत्तावृद्धी होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आरोग्य सुधारते व आयुष्यात वाढ होते. 

      अझोलापासूनचे इतर फायदे अझोला वाफ्यातून काढण्यात येणारे पाणी नत्रयुक्त व खनिजयुक्त असल्याने पिकांसाठी झाडांसाठी वापरता येते, तसेच वाफ्यातून काढण्यात येणाऱ्या एक किलो मातीचे गुणधर्म हे सुमारे ०.५ किलो रासायनिक खताइतके आहे. अझोला लागवड हे सोपे, अल्पखर्चिक व किफायतशीर तंत्रज्ञान असून, ते शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे, त्याचा जनावरांच्या आहारात वापर करणे ही काळाची गरज आहे.

    7) पशुपालन इतर बाबी


    8) म्हशींच्या जाती

    • मुऱ्हा
    • मेहसाणा
    • पंढरपुरी
    • सुरती
    दुग्धोत्पादनासाठी म्हशीच्या मुऱ्हा, मेहसाणा, पंढरपुरी, सुरती या जाती चांगल्या आहेत. निवड पद्धतीने म्हशीमध्ये सुधारणा करणे शक्‍य आहे. गोठ्यामध्ये मिळणाऱ्या म्हशींच्या पिढ्यांची वाढ करणे फायद्याचे ठरते.

    मुऱ्हा

    शरीरबांधा मोठा, भारदस्त व कणखर असतो. एका वेतातील दुधाचे प्रमाण 3000 ते 3500 लिटर असते.

    मेहसाणा

    ही जात सुरती व मुऱ्हा जातींच्या संकरापासून निर्माण झाली असून, शरीर वैशिष्ट्ये मुऱ्हा जातीशी मिळतीजुळती आहेत. या म्हशी एका वेतात सरासरी 3000 लिटरपर्यंत दूध देतात.

    पंढरपुरी

    सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. या म्हशी आकाराने मध्यम, पण अतिशय काटक असतात. लांब व निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोचणारी लांब व पिळवटलेली शिंगे ही या जातीची वैशिष्ट्ये आहेत. म्हशींचे वजन साधारण 400 किलो असते. पारड्या वयाच्या 25 ते 30 महिन्यांत गाभण राहतात आणि 35 ते 40 महिन्यांत पहिल्यांदा वितात. मध्यम शरीर, लवकर वयात येणाऱ्या पारड्या, कमी भाकडकाळ, पहिल्या वेताचे कमी वय, उत्तम प्रजोत्पादन व दुग्धोत्पादन क्षमता आणि दुग्धोत्पादनाचे सातत्य या गुणांमुळे दुधासाठी ही जात चांगली आहे. हे सर्व गुण एकत्रितपणे इतर जातींत आढळत नाहीत. या म्हशी एका वेतात 1500 ते 1800 लिटर दूध देतात.

    सुरती

    शरीरबांधा मध्यम, कान लांबट, रुंद व शिंगांनी झाकलेले असतात. भुवयांचे केस पांढरे, डोळे मोठे व शिंगे मध्यम व विळ्याच्या आकाराची असतात. शरीराचा रंग भुरा व मानेवर ठळक पांढरे आडवे पट्टे असतात. एका वेतातील दुधाचे उत्पादन 1800 लिटर असते. जास्त काळ दूध देते. दुधात स्निग्धांश जास्त प्रमाणात असतात.

    9) दुधाळ जनावरांसाठी आहार

    दुधाळ जनावरांसाठी समतोल आहार 

    1) समतोल आहारामध्ये ओली वैरण, कोरडी वैरण आणि अंबोण यांचा योग्य प्रमाणात वापर महत्त्वाचा आहे. जनावरांना हिरवी वैरण देताना एकदल आणि द्विदल वर्गातील चाऱ्याचे मिश्रण करावे. एकदल वर्गातील चाऱ्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी, पॅरा गवत, नेपियर गवत, धारवाड हायब्रीड नेपिअर-6 इत्यादींचा समावेश होतो. एकदल चाऱ्यामध्ये प्रथिने कमी प्रमाणात आणि पिष्टमय पदार्थ अधिक असतात. चवळी, लसूण, बरसिम, स्टायलो, दशरथ गवत ही द्विदल वर्गातील चारापिके आहेत. द्विदल चारा अधिक पौष्टिक असतो. यामध्ये प्रथिने आणि कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. 

    2) सुक्‍या चाऱ्यामध्ये गव्हाचे काड, ज्वारीचा कडबा, भाताचा पेंडा, मिश्र सुका चारा जनावरांच्या आहारात द्यावा. या चाऱ्यांचा उपयोग मुख्यत्वे करून पोटभर वैरण म्हणून केला जातो. ही वैरण कमी पौष्टिक असते. 

    4) पशुखाद्यात दोन टक्के खनिज मिश्रण, एक टक्का चुना पावडर आणि एक टक्का मिठाचा समावेश करावा. 

    5) पशुखाद्यात साधारणतः 25 ते 35 टक्के पेंड, 25 ते 35 टक्के तृणधान्य, 25 ते 45 टक्के तृणधान्यापासून आणि 20 ते 30 टक्के कडधान्यापासून मिळणारे दुय्यम पदार्थ, एक ते दोन टक्के खनिज मिश्रण आणि एक टक्का मीठ याचा समावेश होतो. 

    6) दुभत्या जनावरास पशुखाद्य देण्याचे प्रमाण त्यांच्या दुग्धोत्पादनावर अवलंबून असते. दुधाळ गाईस एक ते 1.5 किलो पशुखाद्य शरीर पोषणासाठी आणि एक किलो अंबोण प्रति 2.5 किलो दुग्धोत्पादनासाठी द्यावे. दुधाळ म्हशींना प्रति किलो दुग्धोत्पादनासाठी लागणारे अन्नघटक गाईंना लागणाऱ्या अन्नघटकांपेक्षा अधिक असतात. याचे कारण म्हणजे म्हशींच्या दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण गाईच्या दुधापेक्षा जास्त असते. 

    7) अंबोण जनावरास देण्याअगोदर आठ ते 12 तास भिजून ठेवावे म्हणजे ते रुचकर होते, त्याची पाचकतादेखील वाढते. अंबोण हा घटक खर्चिक असल्यामुळे अंबोणाची बचत केल्यास दुग्धोत्पादन अधिक किफायतशीर होते. 

    8) साधारण 10 लिटर दूध देणाऱ्या गाईस 15 ते 20 किलो द्विदल हिरवा चारा, दोन ते तीन किलो मका भरडा, दोन ते चार किलो सुका चारा दिल्यास तिच्या अन्नघटकांच्या गरजा पूर्ण होतात. 

    9) आहारातील अंबोणाचा भाग गाई, म्हशींना दूध काढते वेळी द्यावा. हिरवा चारा दूध काढल्याबरोबर आणि कडबा, गव्हाचे काड, सरमाड सारखा सुका चारा कोणत्याही वेळेस दिल्यास हरकत नाही. 

    10) गाई, म्हशीतील 'कास दाह'

    • लक्षणे :
    • जनावरांचे व्यवस्थापन

    कासदाह हा आजार गोठ्यातील अस्वच्छतेमुळे होतो. या आजारामध्ये जिवाणू रक्तातून कासेत शिरकाव करतात, तसेच जिवाणूंचा सडातून शिरकाव होऊन कास बाधित होण्याचे प्रमाण जास्त असते. जिवाणू कासेतील दूध तयार करणाऱ्या पेशींना इजा करून पेशी निकामी बनवतात. कासेतील पेशी काम करत नसल्यामुळे कास दगडासारखी टणक बनते, कुठल्याही महागड्या औषधोपचाराला देखील प्रतिसाद देत नाही.

    लक्षणे :

    1) कासदाहमध्ये जनावरांना ताप येतो, खाणे, पिणे कमी होते. दुधात बदल होऊन दूध विरजल्याप्रमाणे किंवा गाठीच्या स्वरूपात येते. 

    2) बऱ्याचदा पू, रक्त किंवा पू आणि रक्तमिश्रित अथवा पाण्यासारखे पातळ दूध येते. या रोगाचा तत्काळ, तसेच दीर्घकालीन परिणाम दूध उत्पादनावर आणि दुधातील फॅटवर होतो. 

    3) बाधित जनावरांच्या उपचारासाठी आणि त्यांचा सांभाळण्याचा खर्च अधिक असतो. आजारी जनावर बाजारात विक्रीसाठी नेले असता कमी किंमत येते

    जनावरांचे व्यवस्थापन :

    1) जनावरे बांधण्याची जागा स्वच्छ, कोरडी व हवेशीर असावी. 

    2) गोठा नियमित स्वच्छ व निर्जंतुक ठेवावा. यासाठी गोठ्यात शिफारशीत जंतुनाशक द्रावण शिंपडावे. जंतुनाशक द्रावण उपलब्ध नसल्यास उकळत्या पाण्याने गोठा स्वच्छ करावा. 

    3) दूध काढण्यापूर्वी जनावरांचे मागील पाय, शेपटी आणि कास कोमट पाण्याने स्वच्छ धुवावी. कास कोरड्या सुती कपड्याने पुसून घ्यावी. 

    4) दूध काढण्यापूर्वी हात निर्जंतुक करावेत. धार काढताना पहिल्या दोन ते तीन धारा दुधाच्या भांड्यात न घेता, दुसऱ्या भांड्यात घेऊन त्याची योग्य विल्हेवाट लावावी. कारण पहिल्या धारांमध्ये जंतूंचे प्रमाण जास्त असते. या धारा जमिनीवर पडू देऊ नयेत. 

    5) सर्व निरोगी जनावरांचे दूध अगोदर काढावे. आजारी जनावरांचे दूध वेगळे काढावे. 

    6) गाई, म्हशीने पान्हा सोडल्यावर लवकरात लवकर म्हणजे साधारणत: सात मिनिटांच्या आत धार काढावी. 

    7) दूध काढण्याच्या वेळेमध्ये बदल करू नये. 

    8) धार अंगठा मुडपून न काढता पूर्ण हातानेच काढावी, कारण अंगठ्याचा दाब पडल्यामुळे जखम होऊन जंतूसंसर्ग लवकर होऊ शकतो. 

    9) दूध पूर्णपणे काढावे. अपुरे दूध काढल्यास कासेमध्ये जंतूंची वाढ होते, कारण दूध हे जंतूंच्या वाढीसाठी पोषक असते. 

    10) संपूर्ण दूध काढल्यानंतर गाईच्या सडाला सुरकुत्या पडतात, त्यावरून दूध पूर्ण निघाले आहे असे समजावे. 

    11) दूध काढणीनंतर कासेला निर्जंतुक द्रावणाने (एक टक्के पोटॅशिअम परमॅंग्नेट) पुसावे, कारण दूध काढल्यानंतर जवळपास अर्धा तास सडांची छिद्रे मोकळी असतात. त्यामुळे जंतू सडात शिरकाव होण्याची शक्‍यता असते. 

    12) दूध काढल्यानंतर जनावरास बसू देऊ नये. हिरवा चारा खायला द्यावा. जनावर बसल्यामुळे जमिनीवरील जंतू सडात प्रवेश करतात. 

    13) जनावरांना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने नियमित जंतुनाशके पाजावीत, शिफारशीत वेळेत लसीकरण करावे, त्यामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

    14) जनावरांच्या खुराकामध्ये दररोज क्षारमिश्रणे द्यावीत. 

    15) जनावर आटत असल्यास पशुवैद्यकांच्या सल्ल्याने कासेमध्ये प्रतिजैवके सोडावीत. 

    16) दूध उत्पादन किंवा दुधामध्ये कोणताही बदल आढळून आल्यास त्वरित पशुवैद्यकाच्या मदतीने उपचार करावा.

    11) वासरांतील परजीवींचे नियंत्रण

    • लक्षणे
    • उपाय
    • उपाय

    अस्कॅरीस व्हिटूलोरम हा 10- 15 सें. मी. लांबीचा गोलाकार कृमी आहे. याचा प्रादुर्भाव गर्भाशयामध्येच होतो किंवा जन्मल्यानंतर होऊ शकतो. वासराच्या जन्मानंतर पूर्ण कृमी आतड्यामध्ये तयार होतात. हा कृमी शेळी- मेंढीच्या करडांमध्ये आढळत नाही. हा कृमी वासरांच्या पचनसंस्थेस हानी पोचवितो, अन्नद्रव्य शोषण करतो. आतड्याच्या संभाव्य हालचालींमध्ये बाधा आणतो. अन्नद्रव्यांचे पचन योग्य पद्धतीने न झाल्याने वासराचा मृत्यू होतो.

    लक्षणे

    वासरे आवमिश्रित, घाण वास येणारी संडास करतात. संडास करतेवेळेस त्रास होतो. वासराच्या पाठीमागे बाक तयार होतो. वासरू खंगत जाते. म्हशीच्या रेड्यामध्ये या कृमींमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे.

    उपाय

    पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार जंतनाशके द्यावीत. पट्टकृमी गाई- म्हशींची वासरे व शेळ्या- मेंढ्यांच्या कोकरांच्या आतड्यामध्ये वास्तव्य करतात. यांची लांबी मीटरपेक्षा जास्त असते, ते त्वचेवर सतत अन्नद्रव्य शोषण करत असतात. यांचे जीवनचक्र हे खरपड्यामध्ये पूर्ण होते. खरपड्यामधील त्यांची अर्भक अवस्था जनावरांच्या खाण्यात आल्यासच लागण होते. गवतासोबत खरपडे पोटात गेल्यामुळे लागण होते. हे पट्टकृमी अन्नशोषण करतात, त्यामुळे वासरे खंगतात. या कृमीचे पिवळसर रंगाचे तुकडे विष्ठेद्वारा बाहेर पडतात, यावरून निदान करता येते.

    उपाय

    तत्काळ कृमिनाशक औषधांची शिफारशीत मात्रा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्यावी. गवतावरील खरपड्यांची (ऑरीबॅटीड माइट्‌स) संख्या वाढल्याचे लक्षात आल्यास गवत कापून वाळवून नंतरच पशुधनास खाण्यास द्यावे.

    12) यशस्वी दुग्धोत्पादनातील पंचसूत्री

    • गाई -
    • निरोगी प्रजनन संस्था
    • निरोगी पचन संस्था
    • स्वच्छ गोठा
    • स्वच्छ दूधनिर्मिती

    1) गाई

    म्हशींच्या कासेचे आरोग्य राखण्यासाठी धार काढणारी व्यक्ती निरोगी हवी. धार काढताना हात स्वच्छ धुऊन घ्यावेत. हाताची नखे वाढू देऊ नयेत. आजारी व्यक्तीने धार काढू नये. अंगठा मुडपून दूध काढू नये, कारण त्यामुळे सडास अंतर्गत भागात जखमा होऊन जंतूसंसर्ग होण्याची शक्‍यता असते. म्हणून मूठबंद पद्धतीने दूध काढावे. दूध पूर्ण काढावे. कासेत दूध राहिल्यास काससुजीला आमंत्रण मिळते. दूध काढण्यापूर्वी कास स्वच्छ धुऊन कोरडी करावी. कास धुण्यासाठी स्वच्छ पाण्यात एक टक्का पोटॅशिअम परमॅंगनेट मिसळावे. पहिल्या काही धारांमध्ये जिवाणूंचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे असे दूध कासेला किंवा हाताला लावू नये. कास सुजी झालेली गाय सर्वांत शेवटी पिळावी. कास सुजीतील दूध गोठ्यातील जमिनीवर काढू नये. असे दूध वेगळ्या पातेल्यात काढून गोठ्यापासून लांब पुरून टाकावे. धार काढल्यानंतर सडाची छिद्रे अर्धा तास उघडी राहतात, त्यामुळे जनावराला अर्धा तास खाली बसू देऊ नये. दूध काढल्यानंतर जनावराला वैरण टाकल्यास जनावर खाली बसत नाही आणि गोठ्यातील शेणा-मातीतील जंतू कासेत प्रवेश करण्यास प्रतिबंध होतो. गाभण गाय आटवत असताना प्रत्येक सडात पुरेशा प्रमाणात प्रतिजैविक सोडावे. वासरांचे संगोपन वेगळे करावे. लांब सड व लोंबती कास असलेल्या गाई / म्हशी घेऊ नयेत. दर पंधरा दिवसांनी गोठ्यातच कासदाहासाठी (सी.एम.टी.) चाचणी करावी. दुधात कोणताही बदल दिसून आल्यास तत्काळ पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत.

    2) निरोगी प्रजनन संस्था

    जनावरांच्या प्रजनन संस्थेचे आरोग्य राखण्यासाठी दरवर्षी सांसर्गिक गर्भपाताची चाचणी करून घ्यावी. नोंदणीकृत व जबाबदार पशुवैद्याकडून कृत्रिम रेतन करावे. वार अडल्यास स्वतः काढण्याचा प्रयत्न करू नये. तांत्रिक ज्ञान नसलेल्या व्यक्तीकडून वार काढल्यास गर्भाशयास इजा होण्याची शक्‍यता असते. जनावरांना योग्य मात्रेत खनिजद्रव्ये दिल्यास उलटण्याचे प्रमाण कमी होऊन प्रजनन संस्थेचे आरोग्य टिकून राहते. गर्भाशयाचे गंभीर आजार झालेल्या जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे करावे. गर्भपात झालेले गर्भ आणि वार गोठ्यापासून लांब पुरून टाकावे. आजारी जनावरांना योग्य उपचार करावेत.

    3) निरोगी पचन संस्था

    वैरण जमिनीवर न टाकता गव्हाणीत टाकावी. वैरणीची कुट्टी करून द्यावी. कुट्टी करत असताना बोटभर लांब तुकडे करावेत. फार बारीक तुकडे करू नयेत. जनावरांना फक्त ओला किंवा फक्त वाळका चारा देऊ नये. एकाच प्रकारचा चारा दिल्यास जनावराचे रवंथ करण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे चाऱ्यात पुरेशी लाळ मिसळली न गेल्याने पोटाचे विकार संभवतात. जनावरांना एकाच वेळी जास्त वैरण न देता दिवसातून चार ते पाच वेळा थोडी थोडी वैरण द्यावी. जनावरांना उकिरड्यावर चरू देऊ नये. जनावराला स्वच्छ व ताजे पाणी द्यावे, साचलेले घाण पाणी देऊ नये. गोठ्यातील सर्व जनावरांचे नियमित जंतनाशन करावे. समतोल आहार देण्याचा प्रयत्न करावा. पचन संस्थेच्या सांसर्गिक रोगांपासून ग्रस्त जनावरांपासून निरोगी जनावरे वेगळी ठेवावीत. पचन संस्थेच्या कुठल्याही विकारावर तत्काळ उपाययोजना करावी.

    4) स्वच्छ गोठा

    गोठा स्वच्छ, कोरडा, हवेशीर व उबदार ठेवावा. गोठ्यात ओलावा वाढल्यास जंतूंची वाढ होते. गोठ्यात पुरेसा प्रकाश असावा. शेण - मूत्र साठू देऊ नये. आजारी जनावराची विष्ठा, मूत्र, उरलेला चारा जाळून टाकावा. आजारी जनावराची वेगळी व्यवस्था ठेवावी. गोठ्यात वैरण / उरलेली वैरण साचू देऊ नये. शक्‍य झाल्यास जनावरांना रोज धुऊन खरारा करावा, त्यामुळे परजीवी कीटकांचा प्रादुर्भाव होत नाही. रक्ताभिसरणाला चालना मिळून ताजेपणा वाटतो. रोगी जनावरांना त्वरित उपचार करावा. उन्हाळ्यात गोठा थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा. खंगत जाणाऱ्या जनावरांची चाचणी करून घ्यावी. आठवड्यातून एकदा पाण्याचा हौद धुऊन चुन्याने रंगवून घ्यावा. पाण्यात शिफारशीत निर्जंतुक औषधी योग्य प्रमाणातच टाकावी. जनावरांचे लसीकरण नियमित करावे.

    5) स्वच्छ दूधनिर्मिती

    रोगी व अस्वच्छ जनावरांपासून स्वच्छ दूध मिळत नाही. दूध स्वच्छ नसल्यास टिकवणक्षमता कमी होऊन दूध नासते. म्हणून जनावरे निरोगी व सशक्त असावीत. दूध काढताना प्रत्येक सडातील चार - पाच धारा वेगळ्या भांड्यात काढाव्यात. हे दूध इतर दुधात मिसळू नये. दूध काढताना जनावराला कोरडा आणि उग्र वास असलेला चारा देऊ नये. दूध काढण्याची जागा स्वच्छ व धूळमुक्त असावी. त्या ठिकाणी माश्‍या व डासांचा प्रादुर्भाव नसावा. दुधाची भांडी स्वच्छ व निर्जंतुक केलेली असावीत. दुधाची भांडी दररोज धुण्याच्या सोड्याने गरम पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यावीत आणि कोरडी करावीत. दूध काढून झाल्यानंतर ते गोठ्यातून त्वरित हलवावे. दूध गाळून थंड ठिकाणी (शक्‍य असल्यास बर्फाच्या पेटीत) ठेवावे. दूध काढल्यानंतर सड निर्जंतुक द्रावणात बुडवून घ्यावेत आणि दूध लवकरात लवकर संकलन केंद्रात पोचवावे.

    शेळी पालन

    • हे कोण सुरू करू शकते?
    • सुरू करण्याची कारणे
    • तुमच्यासाठी कोणती प्रजाति चांगली आहे?
    • प्रजोत्पादन प्रबंधन
    • लसीकरण
    • शेळ्यांसाठी गोठा (मेषगृहे)
    • संगोपनाच्या पध्दती
    • शेळ्यांचा विमा
    • भारतामध्ये शेळ्यांचे फार्म
    शेळीला भारतात ‘गरीबाची गाय’ म्हणतात आणि कोरड्या जमिनीवर शेती करणायांसाठी हा एक फार महत्वाचा घटक आहे. किरकोळ किंवा चढउतार असलेल्या पृष्ठभागाच्या जमिनी ह्या गाय किंवा इतर प्रकारच्या जनावरांसाठी चांगल्या नसतील, पण शेळी हा उत्तम पर्याय आहे. फार थोडी गुंतवणूक करून शेळी पालन हा किरकोळ आणि लहान शेतकÚयांसाठी एक फायदेशीर उद्यम ठरू शकतो.

    1) हे कोण सुरू करू शकते?

    • लघु आणि मध्यम शेतकरी
    • ज्यांच्याकडे जमीन नाही असे श्रमिक
    • सामान्य कुरणांची उपलब्धता

    2) सुरू करण्याची कारणे

    • कमी भांडवल निवेश आणि लवकर प्राप्ती होणे
    • साधे आणि लहान शेड पुरेसे आहे
    • स्टॉल (एका जनावरास बांधण्याची जागा) फेड स्थितीत ठेवल्यास नफा देणारे
    • शेळ्यांचा उच्च प्रजोत्पादन दर
    • वर्षभराचे काम
    • चर्बी नसलेले मांस आणि कमी वसा असलेले व सर्व लोकांना आवडणारे
    • केव्हां ही विकून पैसे मिळविता येतात

    3) तुमच्यासाठी कोणती प्रजाति चांगली आहे?

    जमनापरी

    • चांगली उंची असलेले जनावर
    • प्रौढ जमनापरीमध्ये चांगले सुबक बाकदार रोमन नाक आणि किमान 12 इंच लांबीचे हेलकावे घेणारे कान
    • बोकडाचे वजन सुमारे 65 ते 85 किलोग्राम असते व शेळ्यांचे वजन 45 ते 60 किलोग्राम असते
    • प्रत्येक विण्याच्या वेळी एकच करडू
    • सहा महिन्यांच्या करड्याचे वजन सुमारे 15 किलोग्राम असते
    • दर रोज किमान 2-2.5 लिटर दुधाचे उत्पादन

    तेलीचेरी

    • शेळ्यांचा रंग पांढरा, भुरा किंवा काळा असतो
    • एका विण्यात 2-3 करडी
    • बोकडाचे वजन सुमारे 40 ते 50 किलोग्राम असते व शेळ्यांचे वजन 30 किलोग्राम असते

    बोअर

    • संपूर्ण विश्वभरात मांसाकरीता पाळतात
    • वाढीचा दर तीव्र आहे
    • बोकडाचे वजन सुमारे 110 ते 135 किलोग्राम असते व शेळ्यांचे वजन 90 ते 100 किलोग्राम असते
    • 90 दिवसांच्या करड्याचे वजन 20-30 किलोग्राम असते

    आहार प्रबंधन

    • चरण्याच्या जोडीला घन आहार दिल्यास उच्चतम वाढ दर मिळतो
    • प्रोटीनयुक्त हिरवा चारा जसे अकेसिया, ल्यूसर्न आणि कसावा तसेच आहारात नायट्रोजन स्त्रोत असणे महत्वपूर्ण आहे.
    • शेतकरी शेताच्या कडेने अगाथी, सबाबुल आणि ग्लॅरिसिडियाची झाडे लावू शकतात आणि हिरवा चारा म्हणून देऊ शकतात.
    • शेतकरी शेताच्या कडेने अगाथी, सबाबुल आणि ग्लॅरिसिडियाची झाडे लावू शकतात आणि हिरवा चारा म्हणून देऊ शकतात.
    • एक एकराच्या जमिनीच्या क्षेत्रात उगविलेली झाडे आणि चारा 15 ते 30 शेळ्यांना पोसण्यासाठी पुरेसा आहे.

    घन आहार खाली दिल्याप्रमाणे तयार करता येऊ शकतो:

    घटक

    करड्याचा 
    आहार

    वृध्दि आहार

    स्तनपान
    देणाऱ्या 
    शेळीचा आहार

    गर्भारशेळीचा 
    आहार

    ज्वारी

    37

    15

    52

    35

    डाळी

    15

    37

    ---

    ---

    तेलवड्या

    25

    10

    8

    20

    गवताचा भुसा

    20

    35

    37

    42

    खनिज मिश्रण

    2.5

    2

    2

    2

    सामान्य मीठ

    0.5

    1

    1

    1

    एकूण

    100

    100

    100

    100

    • करड्यांना पहिल्या 10 आठवड्यांत 50-100 ग्राम घन/सांद्रित आहार द्यायला पाहिजे.
    • वाढत्या वयाच्या करड्यांना 3-10 महिन्यांपर्यंत दररोज 100-150 ग्राम घन/सांद्रित आहार देण्यात आला पाहिजे.
    • गाभण असलेल्या शेळीला दररोज 200 ग्राम घन/सांद्रित आहार देण्यात आला पाहिजे.
    • 1 लिटर दूध देणाऱ्या दुधारू शेळ्यांना दररोज 300 ग्राम घन/सांद्रित आहार देण्यात आला पाहिजे.
    • शेळ्यांच्या स्टॉलमध्ये उत्तम प्रकारच्या तांब्याने युक्त (950-1250 पीपीएम) असलेले मिनरल ब्लॉक्स पुरविण्यात यायला हवे.
     

    4) प्रजोत्पादन प्रबंधन

    लाभदायक शेळी पालनासाठी 2 वर्षांमध्ये शेळीने 3 वेळा व्यायला (किडिंग) हवे.
    • तीव्र वाढीच्या व मोठ्या आकाराच्या शेळ्यांचा वापर प्रजोत्पादनासाठी करावा.
    • प्रजोत्पादनासाठी एक वर्ष वयाच्या मादीचा उपयोग करावा.
    • मादींनी एका किडिंग नंतर 3 महिन्यांतच पुन्हां गर्भ धारण केल्यासच 2 वर्षांत 3 वेळा प्रजोत्पादन होऊ शकते.
    • शेळ्या सुमारे 18 ते 21 दिवसांच्या अंतराने माजावर येतात आणि ही अवस्था 24-72 तास टिकते.
    • माद्या माजावर आल्यावर काहीतरी दुखत असल्यासारखे जोराने ओरडतात. माजावर आल्याचे आणखी एक लक्षण म्हणजे शेपटी जोर-जोराने इकडे-तिकडे हलविणे. त्याच्या जोडीला, त्यांचे बाह्य जननेंद्रिय थोडे-से सुजल्यासारखे आणि योनिमार्गातील स्त्रावामुळे ओले व घाणेरडे दिसते. त्यांची भूक मंदावते आणि मूत्रत्यागाची वारंवारता वाढते. माजावर आलेली मादी स्वत: नर असल्यासारखी इतर मादीच्या अंगावर चढण्याचा प्रयत्न करते किंवा इतर मादीस अंगावर चढू देते.
    • माजावर येण्याची लक्षणे सुरू झाल्यावर 12 ते 18 तासांच्या काळांत मादीचा समागम घडविण्यात येतो.
    • काही माद्यांमध्ये माज 2-3 दिवस टिकतो. त्यामुळे त्यांचा समागम पुन्हां दुसऱ्या दिवशी घडवायला हवा.
    • गर्भावस्था काळ सुमारे 145 ते 150 दिवसांचा असतो, पण एक आठवडा पुढे-मागे होऊ शकतो. आधीच तयार राहिलेले बरे.

    कृमि नष्ट करणे (पोटातील जंत नष्ट करणे)

    • समागमाच्या आधी माद्यांचे डीवर्मिंग करून पोटातील कृमि नष्ट करायला पाहिजे. ज्या शेळ्यांना जंत असतील त्या कमकुवत आणि संथ असतात.
    • करड्यांचे डीवर्मिंग ते एक महिन्याचे झाल्यावर करावे. कृमि किंवा जंतांचे जीवनचक्र तीन आठवड्यांचे असते, म्हणून करडी दोन महिन्यांची झाल्यावर पुन्हा एकदा डीवर्मिंग करण्याची शिफारस केलेली आहे.
    • विण्यापूर्वी 2 ते 3 आठवडे गाभण माद्यांचे डीवर्मिंग करण्यात यायला हवे.
    • गर्भारपणाच्या आरंभिक काळात (2 ते 3 महिने) गर्भपात होवू नये म्हणून माद्यांचे डीवर्मिंग करू नये.

    5) लसीकरण

    • करड्यांना एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा प्रथम डोज 8 महिन्यांच्या वयात आणि पुन्हां 12 आठवड्याची झाल्यावर द्यावा.
    • माद्यांना एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा डोज समागम काळाच्या 4 ते 6 आठवडे आधी आणि विण्याच्या 4 ते 6 आठवडे आधी द्यावा.
    • नरांना वर्षातून एकदा एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा डोज द्यावा.

    6) शेळ्यांसाठी गोठा (मेषगृहे)

    1.डीप लिटर सिस्टम (जनावरांसाठी तृण शय्या)ి

    • लहानसा कळप ठेवण्यासाठी पुरेशा आकाराचे शेड ज्यांमध्ये चांगले वातायन (Cross ventilation)
    • लिटरची (गवताच्या गादीची) उंची कमीत कमी 6 सें.मी. असावी.
    • लिटर तयार करण्यासाठी लाकडाचा भुगा, धान्याचा भुसा आणि शेंगांच्या सालपटांचा वापर करावा.
    • लिटरला थोड्या दिवसांनी वरखाली आलट-पालट करीत राहावे ज्याने घाण वास येत नाही.
    • दर दोन आठवड्यांनी लिटर सामग्री बदलावी.
    • प्रत्येक शेळीला सुमारे 15 चौरस फुट जागा हवी असते.
    • बाह्य-परान्नपुष्ट उपद्रव कमी होईल ह्याबाबत काळजी घेण्यात यायला हवी.
    • एक प्रौढ शेळी एका वर्षांत सुमारे एक टन खत टाकते.

    कोंबडी पालन

    कोंबड्यांचे प्रकार व उपलब्धता

    अ. कारी निर्भिक (असील संकरीत)

      असीलचा खरा अर्थ आहे खरे किंवा शुध्द. असील ही जात तिच्या लढवय्येपणा, उच्च कार्यक्षमता, दिमाखदार रुप आणि संघर्ष कौशल्यांसाठी परिचित आहे.  झुंज देण्याच्या तिच्या उपजत गुणांमुळे या देशी जातीला असील हे नांव दिले असावे. या महत्वाच्या जातीचे मूळ स्थान आंध्रप्रदेश असावे असे म्हणतात. या जातीतील चांगल्या प्रकारच्या कोंबड्यांची झुंज लावली जाते आणि देशभरात लोक त्यांच्या झुंजी आयोजित करीत असतात. असील ही जात मोठ्या हाडा-पेराची आणि राजेशाही दिसणारी आणि दिमाखदार रुप असलेली आहे. यातील नर कोंबड्यांचे प्रमाणित वजन ३ ते ४ किलो तर मादी कोंबड्यांचे वजन २ ते ३ किलो असते.
    • लैंगिकदृष्ट्या पक्व पक्ष्याचे वजन १९६ दिवस असते.
    • वार्षिक अंडी उत्पादन (संख्या) ९२
    • ४० व्या आठवड्यात अंड्याचे वजन (ग्रॅम) ५०

    ब. कारी श्यामा (कडकनाथ संकरीत)

    या जातीचे स्थानिक नांव "कालामासी" असे आहे ज्याचा अर्थ काळी मांस असलेली कोंबडी.  मध्य प्रदेशातील झाबुआ आणि धार जिल्हे आणि राजस्थान तसेच गुजरातलगतचे जिल्हे मिळून अंदाजे ८०० चौरस मैलांचा प्रदेश या जातीचे मुळ उगमस्थान समजले जाते. आदिवासी, स्थानीय निवासी आणि ग्रामीण गरीब लोक बहुतांशी या जातीच्या कोंबड्या पाळतात. हा पक्षी पवित्र समजला जातो आणि दिवाळीनंतर देवीला त्याचा बळी चढवला जातो.
  • एक दिवसाच्या पिलांचा रंग निळसर ते काळा असतो आणि पाठीवर अनियमित गडद पट्टे असतात.
  • या जातीचं मांस काळे असले आणि पाहायला अयोग्य वाटले तरी ते चविष्ट त्याचबरोबर औषधी असल्याचे मानले जाते.
  • आदिवासी लोक कडकनाथचं रक्त मानवांच्या जुनाट आजारांमध्ये उपचारांमध्ये वापरतात आणि त्याचे मांस कामोत्तेजक म्हणून सेवन करतात.
  • मांस आणि अंडी प्रथिनं (मांसामध्ये २५.४७ टक्के) आणि लोह यांनी समृध्द असल्याचे मानले जाते.
  • २० आठवड्यांनी शरीराचं वजन ९२० ग्रॅम
  • लैंगिकदृष्ट्या पक्वावस्थेत वय १८० दिवस
  • वार्षिक अंडी उत्पादन (संख्या) १०५
  • ४० आठवड्यांनी अंड्याचे वजन ४९ ग्रॅम
  • गर्भधारणक्षमता (%) ५५
  • उबवणक्षमता FES (%) ५२
  • क. हितकारी (उघड्या गळ्याची संकरीत)

  • उघड्या गळ्याची जात ही तुलनेने मोठ्या आकाराची आणि लांब नळीदार मानेची असते. नांवावरुन लक्षात येते की, या पक्ष्यांची मान पूर्णतः उघडी असते किंवा मानेच्या पुढल्या भागात केवळ थोडेसे पंख दिसून येतात.
  • नर कोंबडे लैंगिकदृष्ट्या पक्वावस्थेत येतात तशी त्यांची उघडी त्वचा विशेषत्वाने लाल रंगाची होते.
  • उघड्या मानेच्या कोंबडी मूळ ठिकाण केरळमधील त्रिवेंद्रम असल्याचे मानले जाते.
  • २० आठवड्यांनी शरीराचे वजन १००५ ग्रॅम
  • लैंगिकदृष्ट्या पक्वावस्थेत वय २०१ दिवस
  • वार्षिक अंडी उत्पादन (संख्या) ९९
  • ४० आठवड्यांनी अंड्याचे वजन ५४ ग्रॅम
  • गर्भधारणक्षमता ६६
  • उबवणक्षमता FES (%) ७१
  • ड. उपकारी (फ्रीझल संकरीत)

  • स्थानीय जातींच्या आधारे विकसित आगळ्या प्रकारचे भटकणारे पक्षी, दिसायला देशी कोंबड्यांसारखे, हवामानाशी जुळवून घेण्याची आणि रोगप्रतिकाराची चांगली क्षमता, अपवादात्मक वाढ आणि उत्पादन कार्यक्षमता.
  • परसदारातील कुक्कुट पालन व्यवस्थेसाठी सर्वात योग्य.
  • विविध प्रकारच्या शेती-हवामान स्थितींकरिता सुयोग्य अशा उपकारीच्या चार जाती उपलब्ध आहेत.
    1. कडकनाथ x देहलम लाल
    2. असील x देहलम लाल
    3. उघड्या गळ्याची x देहलम लाल
    4. फ्रीझल x देहलम लाल

    कार्यक्षमतेविषयी रुपरेषा

  • लैंगिक पक्वतेच्या वेळी वय १७०-१८० दिवस
  • वार्षिक अंडी उत्पादन १६५-१८० अंडी
  • अंड्याचा आकार ५२-५५ ग्रॅम
  • अंड्याचा रंग करडा
  • अंड्याची गुणवत्ता – उत्कृष्ट अंतर्गत गुणवत्ता
  • जीवित्व क्षमता ९५ टक्क्यांहून अधिक
  • हवामानानुसार कार्यक्षम आणि उत्तम अन्नशोधक
  • कुक्कुटपालनविषयक प्रकल्प संचालनालय, हैदराबाद (ICAR) इथल्या जाती

    अ. वनराजा

    • ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात परसदारातील संगोपनासाठी योग्य, हैदराबादच्या कुक्कुटपालन प्रकल्प संचालनालय (ICAR) द्वारे विकसित.
    • आकर्षक पिसारा असलेला दुहेरी फायद्याचा हा बहुरंगी पक्षी आहे.
    • कोंबड्यांच्या सामान्य रोगांच्या विरोधात उत्तम प्रतिकार क्षमता आणि मुक्त संख्येत संगोपनासाठी जुळवून घेण्यास सक्षम.
    • नियमित आहार व्यवस्थेत वनराजा नर कोंबडे वयाच्या ८ व्या आठवड्यांत मध्यम शरीराचे वजन गाठतात.
    • कोंबडी एका अंडीचक्रामध्ये १६०-१८० अंडी घालते.
    • त्यांच्या तुलनेनं हलक्या वजनामुळं आणि गुडघा ते घोट्यापर्यंतच्या लांब शरीरामुळं, हे पक्षी स्वतःच परभक्षी पक्ष्यांपासून स्वतःचं रक्षण करु शकतात अन्यथा परसदारी पाळलेल्या कोंबड्यांना हा धोका सर्वाधिक असतो.

    ब. कृषीब्रो

    • कुक्कुटपालनविषयक प्रकल्प संचालनालय (ICAR), हैदराबादद्वारे विकसित.
    • बहुरंगी व्यवसायिक ब्रॉयलर पिल्ले
    • २.२ खाद्य परिवर्तन गुणोत्तरासह वयाच्या ६ व्या आठवड्यापर्यंत शरीराचे वजन गाठतात.
    • वयाच्या ६ व्या आठवड्यापर्यंत या पक्षाची जीवित्वाची क्षमता ९७ टक्के आहे.
    • या पक्ष्यांची पिसे आकर्षक रंगाची असतात आणि समशीतोष्ण हवामानाच्या परिस्थितीशी ते चांगल्या प्रकार जुळवून घेतात.
    • व्यवसायिक कृषीब्रो ही जात कोंबड्यांच्या रानीखेत आणि संक्रामक बरसल यांच्यासारख्या सामान्य रोगांना प्रतिकारक्षम असते.
    • फायदेः मजबूत, चांगल्या प्रकार जुळवून घेणारी आणि जिवंत राहण्याची उत्तम क्षमता.

    कर्नाटक पाळीवप्राणी मत्स्यविज्ञान आणि विद्यापीठ बंगलोरद्वारे विकसित जाती

    कुक्कुटपालन विज्ञान विभाग, शेतीविषयक विज्ञान विद्यापीठ, बंगलोर, विद्यमान कर्नाटक 
    पाळीवप्राणी मत्स्यविज्ञान आणि विद्यापीठ, बंगलोर

      या जातीची कोंबडी एका वर्षात गिरीरीज कोंबडीपेक्षा १५-२० अंडी अधिक देते आणि कर्नाटक पाळीवप्राणी मत्स्यविज्ञान आणि विद्यापीठ, बंगलोर द्वारे २००५ मध्ये ही जात वापरात आणली गेली. स्वर्णधारा कोंबड्यांची उच्च अंडी उत्पादनाची क्षमता असते आणि अन्य स्थानिक जातींच्या तुलनेत त्यांची वाढ चांगली होते आणि मिश्र तसेच परसदारातील संगोपनासाठी त्या चांगल्या आहेत. गिरीराजा जातीच्या तुलनेत, स्वर्णधारा जात ही आकाराने लहान आणि हलक्या वजनाची असते, त्यामुळे त्यांना जंगली मांजर आणि कोल्ह्यांसारख्या परभक्षी प्राण्यांपासून पळून जाणे सोपे जाते. या पक्षाचं संगोपन त्याची अंडी आणि मांसासाठी केले जाते. उबवल्यानंतर हा पक्षी २२-२३ व्या आठवड्यात परिपक्व होतो.
    • मादी अंदाजे ३ किलो वजनाची होते तर नर अंदाजे ४ किलो वजनाचे होतात.
    • स्वर्णधारा कोंबड्या एका वर्षात अंदाजे १८०-१९० अंडी देतात.

    अन्य स्थानीय जाती

    जात

    मूळ निवासी प्रदेश

    अंकलेश्वर

    गुजरात

    असील

    आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश

    बुसरा

    गुजरात आणि महाराष्ट्र

    चित्तगाँग

    मेघालय आणि त्रिपुरा

    4दानकी

    आंध्र प्रदेश

    दाओथिगीर

    आसाम

    घगुस

    आंध्र प्रदेश आणि कर्नाटक

    हरीघाटा ब्लॅक

    पश्चिम बंगाल

    कडकनाथ

    मध्य प्रदेश

    कलास्थी

    आंध्र प्रदेश

    काश्मीर फेव्हरोला

    जम्मू आणि काश्मीर

    मिरी

    आसाम

    निकोबारी

    अंदमान आणि निकोबार

    पंजाब ब्राऊन

    पंजाब आणि हरियाणा

    तेल्लीचेरी

    केरळ

    बॉयलर उत्पादन

    कुक्कुट मांस उत्पादनांमध्ये ब्रॉयलरला सर्वाधिक पसंती मिळते. ब्रॉयलर उत्पादनासाठी अनेक खाजगी कंपन्यांनी शेतक-यांबरोबर करार केले आहेत. त्यामुळे विपणनाचा-मार्केटिंगचा फारसा प्रश्न नाही. सुमारे आठ आठवड्यांपेक्षा लहान, 1.5 ते 2 किलो वजनाचे आणि मऊ लुसलुशीत मांसाचे कोंबडीचे पिलू म्हणजे ब्रॉयलर.

    उत्कृष्ट व्यवस्थापन पर्याय

    • कुक्कुट पालन केंद्राचे तापमानः पहिल्या आठवड्यामध्ये 950  फॅरनहाईट इतके तापमान आरामदायी (सहज चालण्याजोगे) असते आणि पुढील प्रत्येक आठवड्याला 50  फॅरनहाईटने कमी करत सहाव्या आठवड्यामध्ये ते 700  फॅरनहाईटपर्यंत कमी करावे.
    • वातायनः हवा चांगली खेळती ठेवावी, पक्ष्यांना गुदमरल्यासारखे होऊ नये यासाठी अमोनिया - पक्ष्यांची विष्ठा नियमितपणे साफ करावी.
    • प्रकाशः 200 चौरस फूट चटई क्षेत्रासाठी 60 वॅटचा एक बल्ब
    • चोच साफ करणेः 1 दिवसाचे असताना चोच साफ करावी.

    ब्रॉयलरची आरोग्य व्यवस्था

    • निरोगी पिलांपासून सुरुवात करा
    • अंडी ऊबवणूक केंद्रांमध्ये मरेक रोगप्रतिबंधक लस द्या
    • 4-5 दिवसांचे असताना आरडीव्हीएफ-1 द्या
    • कॉक्सिडियोसिस रोखण्यासाठी खाद्यातून औषधे द्या
    • खाद्य अफ्लोटॉक्सिनमुक्त ठेवा
    • प्रत्येक चक्रानंतर जमिनीवर किमान तीन इंच जाडीपर्यंत स्वच्छ गवत पसरून ठेवा

    बर्ड फ्लू

     

    बर्ड फ्लूविषयी पक्ष्यांना देखील, माणसांप्रमाणेच, फ्लू होतो. बर्ड फ्लू, ज्याला एव्हीयन फ्लू, एव्हीयन इन्फ्लूएन्झा देखील म्हणतात. H5N1 विषाणू पक्ष्यांना संक्रमित करतात, ज्यांमध्ये इतर पोल्ट्री आणि बदक इ. जंगली पक्ष्यांचा देखील समावेश आहे. तरीही, बर्ड फ्लू माणसाच्या आरोग्यास घातक ठरू शकतो. एका माणसाला बर्ड फ्लू विषाणूने H5N1 प्रत्यक्ष संसर्ग केल्याची, बाब हाँगकाँगमधे 1997 मध्ये आढळली होती. तेव्हांपासून, बर्ड फ्लू विषाणू आशिया, आफ्रीका आणि यूरोपच्या पक्ष्यांमध्ये पसरला आहे.


     

    घातक H5N1 विषाणूने भारताला जानेवारीमध्ये घेरले. 3.9 दशलक्ष कोंबडीची पिले म्हणजे चिकन आणि बदके देशात हा विषाणू पसरू नये म्हणून ठार करण्यात आली, असे फूड एण्ड ऍग्रीकल्चर ऑर्गनायझेशनने एका वक्तव्यात बुधवारी सांगितले. एफएओ ¼ FAO½ ने पुढे म्हटले की 2 फेब्रुवारी, 2008 पासून कोणताही नवीन रोग ऐकिवांत नाही. एव्हीयन इन्फ्लूएन्झा बहुतेक पक्ष्यांना होतो पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (WHO) वक्तव्याप्रमाणे ह्याच्या घातक H5N1 ने, आशिया खंडात 2003 मध्ये 234 लोकांचा बळी घेतला आहे.

    जेव्हां बर्ड फ्लू अचानक सुरू होतो, संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात असलेले लोक आजारी पडतात. संसर्गदूषित आणि अर्धी कच्ची पोल्ट्री ¼चिकन½ खाल्ल्याने किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हा रोग होवू शकतो. बर्ड फ्लू माणसांना खूप आजारी करू शकतो किंवा ठारही मारू शकतो. सध्यातरी ह्यावर कोणतीही लस उपलब्ध नाही.

    व्यवस्थापन ब्रॉयलर पक्ष्यांचे...

    रोगमुक्त व सशक्त ब्रॉयलर कोंबड्यांची पिल्ले निवडावीत. त्यावरच व्यवसायाचे गणित अवलंबून आहे. हॅचरीमध्ये पिल्लांना लसीकरण झालेले असावे. शिफारशीनुसार लसीकरण करावे. 

    वादळी वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे, तसेच स्वच्छ सूर्यप्रकाश लंबरुपी पडावा यासाठी ब्रॉयलर पक्ष्यांसाठी शेडची रचना करताना उत्तर-दक्षिण दिशेस करावी. पोल्ट्री फार्मच्या जमिनीची पातळी आजूबाजूच्या जमिनीपेक्षा उंच असावी. 

    १) शेडसाठी लागणाऱ्या विजेची उपलब्धता, पाणी व कोंबड्यांची बाजारपेठ जवळच्या अंतरावर असावी. 
    २) शेडमधील जमिनीवर लाकडी भुसा, भाताचे तूस पसरावे. याचा थर कमीत कमी तीन इंचांचा असावा. यामुळे कोंबड्यांच्या शरीराचे तापमान योग्य त्या मर्यादेत राहते. 
    ३) पाणी खाद्यपचनास मदत करते. शरीराचे तापमान नियंत्रणाचे काम करते. उन्हाळ्यात साधारण पाण्याची जास्त आवश्‍यकता असते. पाण्यामधून आपण गरजेनुसार कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे देऊ शकतो. 
    ४) रोगमुक्त व सशक्त ब्रॉयलर कोंबड्यांची पिल्ले निवडावीत. त्यावरच व्यवसायाचे गणित अवलंबून आहे. 
    ५) हॅचरीमध्ये पिल्लांना लसीकरण झालेले असावे. 
    ६) खाद्य अल्फाटॉक्झिनमुक्त असणे गरजेचे आहे. 
    ७) लाकडाचा भुसा तीन आठवड्यांनंतर बदलावा. रोजच्या रोज सकाळी किंवा संध्याकाळी थरांची अदलाबदल करावी. 
    ८) लसीकरण करताना लसीचा थेंब डोळ्यात किंवा इंजेक्शनाच्या मदतीने पायाच्या मांडीतील स्नायूमध्ये देणे गरजेचे असते. 
    ९) कोंबड्या सात आठवड्यांच्या झाल्यावर १.५ ते २ किलोच्या वजनाच्या आसपास विक्रीसाठी तयार होतात. 
    १०) कोंबड्यांची हाताळणी पोल्ट्री शेडपासून विक्रीच्या जागेपर्यंत योग्य पद्धतीने करावी. कारण या कालावधीमध्ये त्यांच्या आरोग्यावर व वजनावर परिणाम होतो.

    तापमानाचा कोंबड्यांवर परिणाम

    वाढत्या हवामानाचा परिणाम कुक्कुटपालनावर झालेला आढळून येतो. ऋतूंचा विचार केला असता, उन्हाळा ऋतूमध्ये कोंबडी हा पक्षी इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात उष्माघातास बळी पडतो, त्यामुळे प्रत्यक्षपणे मांसल व अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या उत्पादनात घट होते. 
    ज्या वेळी कोंबड्यांच्या सभोवतालचे तापमान 38 ते 40 अंश से.पर्यंत पोचते, त्या वेळी त्यांना वाढलेल्या तापमानाचा त्रास जाणवू लागतो. उष्णता कमी करण्यासाठी कोंबड्या तोंडाची उघडझाप करतात, त्याला धापा टाकणे असे म्हणतात. जास्त प्रमाणात धापा टाकल्यामुळे श्‍वसन संस्थेच्या कडेवर असलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होते. कोंबड्यांच्या सततच्या तोंडाची उघडझाप करण्याने श्‍वसनाचा वेग वाढतो, तसेच हृदयाच्या स्पंदनांमध्ये वाढ होते, त्यामुळे रक्तदाब वाढतो व यामुळे कोंबड्या मृत्युमुखी पडू शकतात.

    असा ओळखा उष्णतेचा त्रास

    1) कोंबड्यांना जर उष्णतेचा त्रास जाणवत असेल, तर त्या शांतपणे उभ्या राहतात, त्यांच्यामध्ये मंदपणा व सुस्तपणा दिसून येतो. 
    2) काही कोंबड्या या पाणी पिण्याच्या भांड्याजवळ मान वाकवून उभ्या असतात, तसेच काही कोंबड्या या भिंतीचा आडोसा घेऊन शांतपणे उभ्या असतात. 
    3) उन्हाळ्यात जर कोंबड्यांना उष्माघाताचा त्रास जाणवत असेल, तर त्या जास्त पाणी पितात व खाद्य कमी प्रमाणात खातात. 
    4) कोंबड्या शरीरातील वाढलेल्या उष्णतेला कमी करण्यासाठी व थंडपणा आणण्यासाठी त्यांचे पंख शरीरापासून दूर पसरवितात. 
    5) उष्णतेला कमी करण्यासाठी कोंबड्या तोंडाची सतत उघडझाप करून धापा टाकताना शेडमध्ये दिसून येतात. 
    6) काही कोंबड्या श्‍वास घेण्यास धडपडू लागतात व त्यांना दम लागतो. 
    7) काही कोंबड्यांना उष्माघातामुळे मानसिक धक्का बसतो, त्यांचे पाय लटपटतात आणि ठराविक काळासाठी त्या चक्कर येऊन खाली पडतात. 
    8) काही कोंबड्या या शेडमधील इतर कोंबड्यांच्या मागच्या भागाची पिसे तोडताना दिसून येतात. 
    9) कोंबड्यांच्या वजनात अचानकपणे घट होते. 
    10) त्यांची त्वचा रखरखीत होते व रंगांमध्ये फरक दिसून येतो. 
    11) कोणत्याही प्रकारचे कारण नसताना, कोंबड्यांच्या अंडी देण्याच्या व अंडी उबविण्याच्या क्षमतेतसुद्धा कमीपणा आलेला दिसून येतो. 
    12) कोंबड्यांच्या अंड्यांचा आकार हा लहान होतो व त्यांच्या अंड्यांच्या कवचाची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची झालेली दिसून येते. 
    13) मांसल कोंबड्यांमध्ये उष्माघातामुळे वाढीचा दर कमी होतो व त्या अधिक प्रमाणात उष्माघातामुळे मृत्युमुखी पडतात. 

    उन्हाळ्यातील व्यवस्थापन


    कोंबड्यांना उष्माघातापासून वाचविण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारे आच्छादित भिंत व छताच्या शेडमध्ये ठेवावे. त्याचप्रमाणे शेडमध्ये हवा खेळती राहील अशा ठिकाणी व दिशेस शेडची बांधणी करावी. छताच्या पुढच्या बाजूला 24 इंच एवढ्या लांबीचे आच्छादन बसवावे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी छताची सफाई करावी व त्यास पांढऱ्या रंगाने रंगविणे फायदेशीर ठरते, तसेच छतावर वाळलेल्या गवताच्या पेंढ्या, भाताचा कोंडा टाकावा व त्यास ओले ठेवावे.

    दिवसातून तीन-चार वेळेस छतावर पाण्याची फवारणी करावी. असे केले असता शेडमधील तापमान कमी होऊन कोंबड्यांना थंडावा मिळतो. शेडच्या एका बाजूला पोत्याचे पडदे लावून त्यावर पाणी शिंपडावे, जेणेकरून शेडमध्ये थंडपणा राहील व कोंबड्यांना उष्माघातापासून वाचविता येईल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेडमध्ये ताजी हवा खेळती ठेवणे फार महत्त्वाचे आहे. हवा खेळती न राहिल्यामुळे शिळी व दूषित हवा पक्ष्यांच्या शेडमध्ये तयार होते व त्या हवेत अमोनिया, ओलसर कार्बन- डाय- ऑक्‍साईड व धुळीचा शिरकाव होतो व कोंबड्यांवर ताण येऊ शकतो.

    नैसर्गिक हवा शेडमध्ये खेळती ठेवण्यासाठी पंख्यांचा वापर करावा, जेणेकरून शेडमधील हवेची हालचाल वाढेल व आत असलेली अधिक उष्णता बाहेर टाकली जाईल. त्याचप्रमाणे शेडमध्ये तयार झालेली शिळी हवा बाहेर घालविण्यासाठी बाहेर हवा फेकणाऱ्या पंख्यांचा वापर करणे फायदेशीर ठरेल. उष्माघातावर मात करण्यासाठी आहारातील समतोल राखणे गरजेचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोंबड्यांच्या खाद्यांमध्ये अचानकपणे बदल करू नये. उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना खात्रीशीर, स्वच्छ, थंड व मुबलक पाण्याची व्यवस्था करणे अत्यावश्‍यक आहे. याकरिता शेडमधील पिण्याच्या पाण्याची भांडी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये 35-50 टक्‍क्‍यांनी वाढवावी.

    ब्रॉयलर कोंबडीपालनाबाबत माहिती

  • कोंबडीपालन व्यवसायाचे भवितव्य हे कोंबडीघरावर बऱ्याच अंशी अवलंबून आहे. पक्षिघरासाठी जागेची निवड करताना परिसरात नैसर्गिक हवा खेळती असावी. जागा सखल भागात असावी, दलदलीची नसावी. जमीन मुरमाड असावी. जागा शहरात अथवा भरवस्तीत नसावी. पाण्याची व विजेची सोय असावी.
  • पक्षिघरांसाठी जमिनीच्या तुकड्याची कमीत कमी रुंदी 200 फूट असावी. पक्षिघराची दिशा ही नेहमी पूर्व - पश्‍चिम असावी. पक्षिघर उभारताना त्यांना लागणाऱ्या जागेचा विचार करून घर उभारावे. सुरवातीच्या काळामध्ये प्रत्येक ब्रॉयलर पक्ष्याला 0.5 चौ.फूट जागा मिळावी. नंतरच्या कालावधीमध्ये प्रति पक्षी एक चौ.फूट जागा मिळेल अशाप्रकारे घर उभारावे. उदा. 1000 ब्रॉयलर पक्ष्यांसाठी 1000 चौ.फूट जागा मिळेल अशी घरबांधणी करावी.
  • पक्षिघराची लांबी कितीही ठेवली तरी चालते; परंतु रुंदीवर मात्र मर्यादा येते. जास्तीत जास्त 30 फूट रुंदी असलेल्या घरात योग्य वायुविजन व प्रकाश राहतो. घराचा पाया दगड व चुन्यात बांधून पक्का केल्यास घराचा टिकाऊपणा वाढतो.
  • घराची जमीन आजूबाजूच्या जमीन सपाटीपेक्षा एक फूट उंचीवर असल्यास घराला ओल येत नाही, तसेच जमीन कॉंक्रिटची पक्की तयार करून घ्यावी. जुने पक्षी गेल्यानंतर शेड धुऊन स्वच्छ करण्यासाठी सोपे जाते.
  • घरांना रुंदीच्या बाजूने छपरापर्यंत उंच भिंती बांधाव्या लागतात. त्या भिंतीत सहा फूट उंचीचे व तीन फूट रुंदीचे दरवाजे ठेवावेत. घराच्या लांबीच्या बाजूने एक फूट उंचीच्या विटांच्या भिंती बांधाव्यात. त्यावर पक्षिगृहात हवा आणि प्रकाश येण्यासाठी किमान सहा ते आठ फूट उंचीची छपरापर्यंत जाळी मारावी. घरांना लांबीच्या दोन्ही बाजूंस अंतराअंतराने आठ फूट उंचीचे लोखंडी अगर कॉंक्रिटचे खांब उभे करावेत. त्यावर कैच्या चढवून दोन कैचीतील अंतर दहा फूट ठेवावे. कैच्यांवर दुपाखी छप्पर इतर लोखंडी अँगलच्या आधाराने बसवले जाते. दोन्ही बाजूंस छपराचा पत्रा साधारणतः चार फूट बाहेर काढल्याने ओव्हरहॅग पक्षिगृहात येणारा पाऊस जमिनीवर पडून लिटर ओले होत नाही.
  • कोंबड्यांचे आरोग्य


    पिलांना हा रोग बुरशीमुळे होतो. विशेषतः पावसाळ्यात व आर्द्रता जास्त असलेल्या हवामानात ही बुरशी पक्ष्याच्या शरीरात दूषित हवा, खाद्य, पाणी यांमधून प्रवेश करते.
    लक्षणे
    श्‍वासोच्छ्वासास त्रास, जलद श्‍वसन, खाद्य नकोसे वाटल्यास पिलाचा मृत्यू चोवीस तासांत होतो. 
    उपाय
    शेडची स्वच्छता ठेवावी. स्वच्छ कोरडे खाद्य द्यावे. पिलांना योग्य जागा व स्वच्छ हवा मिळवून मिळावी. लिटर कोरडे ठेवावे. लिव्हर टॉनिक दिल्यास सुधारण्यास मदत होते.

    ऍफ्लोटॉक्‍सिकॉसिस

    ऍस्परगिलस फ्लाक्‍स नावाच्या बुरशीपासून तयार झालेले विषारी द्रावण कोंबड्यांच्या खाण्यात आल्यास हा रोग होतो. भिजलेले अगर खराब झालेले खाद्यपदार्थ उदा. - शेंगदाणा पेंड, मका, किडलेला गहू वगैरे धान्यांवर बुरशी तयार होते. असे बुरशीयुक्त खाद्य कोंबडीने खाल्ल्यास तिला विषबाधा होते. 
    लक्षणे  
    पिले मलूल होतात, त्यांची पिसे विस्कटतात, खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते, वाढ खुंटते, पिले पांगळी होऊन जातात. 
    उपाय  
    खराब धान्य खाद्यात वापरू नये, धान्य दमट असल्यास त्यांना कडक उन्हात सुकवावे. संशय आल्यास खाद्य बदलावे व पूरक औषधी म्हणून लिव्हर टॉनिक, जीवनसत्त्वे द्यावीत.

    कोरडे खाद्य द्या

    1) ब्रॉयलर पिल्ले लेअर पिल्लांपेक्षा प्रकृतीने नाजूक असतात. त्यांचे खाद्य खाण्याचे व शरीरवाढीचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्यांच्या सहा आठवड्यांच्या थोडक्‍या काळात बुरशीयुक्त खाद्य खाण्यात आले, तर त्यातील विषारी रसायनामुळे यांच्या स्वास्थ्यावर वाईट परिणाम होतो. 
    2) ब्रॉयलर खाद्यात मका, शेंगदाणे पेंड हे खाद्य घटक मोठ्या प्रमाणावर असतात. त्याच पदार्थांना लवकर बुरशी येते, त्यामुळे चांगले वाळलेले पदार्थ मिळवून त्याचे खाद्य बनवावे. 
    3) खाद्य बनवत असताना शेंगदाणा पेंडऐवजी सोयाबीन केक व चांगला वाळलेला मका खाद्यासाठी वापरावा. आपण जर कंपनीचे तयार खाद्य घेत असल्यास ते मधून मधून प्रयोगशाळेत तपासावे. 
    4) कोणत्याही प्रकारचे उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

    उन्हाळ्यात ब्रॉयलर नियोजन

    ब्रॉयरल पक्ष्यांना विविध वातावरण, नियोजन, निवास, शारीरिक इत्यादी गोष्टींमुळे ताण निर्माण होतो. त्याचा सरळ उत्पादनावर परिणाम होतो. 
    वातावरणातील ताण म्हणजे सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नियोजनाची गरज भासते व हे नियोजन जर आपण व्यवस्थितरीत्या आत्मसात केले तर आपल्या ब्राॅयलरचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळू शकते. 

    ब्रॉयलरसाठी ६५.७५ अंश फॅरानाइट हे योग्य तापमान आहे. पण, यापेक्षा कमी किंवा जास्त हवामानातील तापमान ब्रॉयलरच्या शरीरावर परिणाम करते व कोंबड्या या वातावरणात राहू शकत नाही.

    उन्हाळ्यात ब्रॉयलरच्या शरीरावर होणारे परिणाम

    ब्रॉयलरच्या शरीरावर उन्हाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. यामध्ये शरीरातून उष्णता मुक्त होण्याचे प्रमाण व शरीरात उष्णता निर्माण करण्याचे प्रमाण या प्रमाणात बदल झाल्यास परिणाम आढळतो. 
    i) पिण्याच्या पाण्याचे प्रमाण वाढते व खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते. 
    ii) खाल्लेल्या खाद्यांचे शरीरात वजन वाढीसाठी उपयोग न होता ते वाया जाते व वाढीवर परिणाम होतो. 
    iii) शरीरातील रक्तप्रवाह वेगाने होतो. (हृदयाची स्पंदने वाढतात व वाढ खुंटते.) 
    iv) रोग प्रतिकार क्षमता कमी होते व पक्षी दगावण्याची शक्यता वाढते.

    विविध तापमानाचा ब्राॅयलर पक्ष्यांवर होणारा परिणाम

    - ---- तापमान ---- होणारा परिणाम 
    i) ---- ६५ अंश फॅरानाइट -८० अंश फॅरानाइट ---- योग्य तापमान ज्यामध्ये कोंबड्या आनंदी व उत्साही राहतात. वाढ चांगल्याप्रकारे होते. 
    ii) ---- ८१अंश फॅरानाइट - ८५ अंश फॅरानाइट ---- खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते व शरीरामध्ये खाद्याचे वजनात रूपांतर खूपच कमी प्रमाणात होते. 
    iii) ---- ८६ अंश फॅरानाइट - ९५ अंश फॅरानाइट ---- तापमान जसजसे ८६ अंश फॅरानाइटच्या वर जाते. तसतसे कोंबड्या खाद्य खाने २-३ टक्के कमी करतात. 
    iv) ---- ९६ अंश फॅरानाइट - १०० अंश फॅरानाइट ---- या तापमानात कोंबड्या आपले पंख पसरतात. खूप मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर टाकतात व यामुळे उष्माघात होतो व कोंबड्या दगावतात. 
    v) ---- १०१ अंश फॅरानाइट - त्यापेक्षा जास्त ---- या तापमानाला कोंबड्या दगावतात.

    तापमानाशी जुळवून घेण्यासाठी ब्रॉयलरचा प्रतिसाद

    • माणसाप्रमाणे घामग्रंथी नसल्यामुळे ब्रॉयलर जवळ खूप जास्त प्रमाणात पाणी पिणे हा एकमेव मार्ग असतो.
    • खूप जास्त प्रमाणात वातावरणातील तापमानाशी जुळवून घेण्यासाठी ब्रॉयलर कोंबड्या त्यांच्या हालचाली थांबवतात.
    • कोंबड्या भुश्‍यामध्ये विष्टा टाकतात जी त्याच्या शरीराच्या तापमानापेक्षा कमी असते.
    • अयोग्य तापमानात (८० अंश फॅरानाइट) ब्रॉयलर त्यांची पंख व चोच उघडतात, याद्वारे ते जास्त प्रमाणात उष्ण व दमट हवा बाहेर टाकतात.
    परसबागेतील कुक्कुटपालन

    महाराष्ट्र शासनाने लहान स्तरावरील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची ही अडचण लक्षात घेऊन परसातील कुक्कुटपालनास चालना देतील, अशा स्वरूपाच्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करता येतो.

    एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम


    ही योजना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राबविण्यात येते, तसेच ही योजना सर्वसाधारण गटातील सर्व लाभार्थींकरिता उपलब्ध आहे. या योजनेत दोन पर्याय उपलब्ध आहेत.

    अ) तलंगा गटवाटप  
    या कार्यक्रमांतर्गत सर्व प्रवर्गातील लाभार्थींना ५० टक्के अनुदानावर ८ ते १० आठवडे वयाच्या तलंगाच्या २५ माद्या आणि तीन नर याप्रमाणे गटाचे वाटप करण्यात येते. 
    तलंगाच्या एका गटाची (२५ माद्या + ३ नर) एकूण किंमत ६००० रुपये मंजूर करण्यात आली आहे. तलंगाच्या एका गटाचा खर्चाचा तपशील 
    पक्षी किंमत (२५ माद्या + ३ नर) ---- ३००० रु. 
    खाद्यावरील खर्च ---- १४०० रु. 
    वाहतूक खर्च ---- १५० रु. 
    औषधे ---- ५० रु. 
    रात्रीचा निवारा ---- १००० रु. 
    खाद्याची भांडी ---- ४०० रु. 
    ------------------------------- 
    एकूण ---- ६००० रु. 

    यापैकी ५० टक्के खर्च म्हणजेच ३००० रुपये मर्यादेत प्रति लाभार्थी एका गटाचा पुरवठा करण्यात येतो. उर्वरित ५० टक्के रक्कम म्हणजेच ३००० रुपये लाभाने स्वतः उभारून त्यातून तलंगाच्या गटासाठी लागणारा निवारा, वाहतुकीवरील खर्च, खाद्यावरील खर्च, औषधी, पाण्याची भांडी, खाद्याची भांडी इत्यादीवरील खर्च करणे अपेक्षित आहे.

    ---------------------------------

    ब) एकदिवसीय सुधारित कुक्कुट पक्ष्यांच्या पिलांचे गटवाटप 
    या कार्यक्रमांतर्गत सर्व प्रवर्गांतील लाभार्थींना ५० टक्के अनुदानावर प्रति लाभार्थी एकदिवसीय सुधारित कुक्कुट पक्ष्यांच्या (आरआयआर, ब्लॅक ॲस्ट्रॉलॉर्प, गिरिराज, वनराज, कडकनाथ व इतर शासनमान्य जातीचे पक्षी) १०० पिलांचे गटवाटप करण्यात येते. एका गटाची (१०० एकदिवसी पिलांची) एकूण किंमत १६,००० रुपये मंजूर करण्यात आली आहे. 
    एका गटाच्या खर्चाचा तपशील  

    एकदिवसीय १०० पिलांची किंमत ---- २००० रु. 
    प्रत्येक गटाबरोबर द्यावयाचे खाद्य ८०० किलो ---- १२,४०० रु. 
    वाहतूक खर्च ---- १०० रु. 
    औषधी ---- १५० रु. 
    रात्रीचा निवारा ---- १००० रु. 
    खाद्याची भांडी ---- ३५० रु.

    • यापैकी ५० टक्के अनुदानातून ८००० रुपये मर्यादेच्या प्रति लाभार्थी एकदिवसीय १०० पिले किंमत २००० रुपये आणि खाद्य ( ६००० रूपये किमतीच्या मर्यादेत) पुरवठा करण्यात येतो.
    • उर्वरित ५० टक्के रक्कम म्हणजेच ८००० रुपये लाभाने स्वतः उभारून त्यातून एकदिवसीय १०० पिलांच्या गटासाठी लागणारा निवारा, वाहतुकीवरील खर्च, उर्वरित खाद्यावरील खर्च, औषधी, पाण्याची भांडी, खाद्याची भांडी इत्यादींवरील खर्च करणे अपेक्षित आहे.
    • सदर योजनेचा लाभ कोणत्याही गटातील लाभार्थी घेऊ शकतील. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ देण्यात येतो.
    • अंमलबजावणी अधिकाऱ्याने योजनेस व्यापक प्रसिद्धी देऊन अर्ज मागविण्यात येतात.
    • योजनेचे अर्ज तालुका पशुसंवर्धन कार्यालयात, जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयात, जिल्हाधिकारी कार्यालय व वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
    • लाभार्थी निवडताना ३० टक्के महिला लाभार्थी निवडण्याबाबत प्राधान्य देण्यात येते.
    • दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, भूमिहीन शेतमजूर, मागासवर्गीय, अल्प व अत्यल्प भूधारक यांना प्राधान्य देण्यात येते.
    • ज्या जिल्ह्यात मध्यवर्ती अंडी ऊबवणी केंद्र किंवा सघन कुक्कुट विकास गट नाहीत अशा ठिकाणी नजीकच्या मध्यवर्ती अंडी ऊबवणी केंद्र किंवा सघन कुक्कुट विकास गटच्या कार्यान्ययन अधिकाऱ्याची नेमणूक सदस्य म्हणून करण्यात येते.
    • एका तलंगाच्या गटास प्रतिलाभार्थी अनुदानाची ५० टक्के रक्कम ३००० रूपये इतकी निश्‍चित करण्यात आली आहे.
    • तलंग गट वाटपाचा खर्च गटाच्या निर्धारित किमतीपेक्षा जास्त झाल्यास सदरचा वाढीव खर्च लाभार्थ्याने स्वतः करणे अपेक्षित आहे.
    • एकदिवसीय पिले/तलंगा गट वाटप करताना विशेषतः मरेक्स, राणीखेत आर.डी. आणि देवी रोगांवरील लसीकरण झाले आहे याची दक्षता घ्यावी. या सुविधा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत उपलब्ध करून देण्यात येतात.
    • एकदिवसीय १०० पिलांसाठी प्रति लाभार्थी अनुदानाची ५० टक्के रक्कम ८००० रूपये इतकी निश्‍चित करण्यात आली आहे.
    • एकदिवसीय १०० पिलांचा गटाचा खर्च गटाच्या निर्धारित किमतीपेक्षा जास्त झाल्यास सदरचा वाढीव खर्च लाभार्थीने स्वतः करणे अपेक्षित आहे.
    • या योजनेमध्ये लाभ दिलेल्या लाभार्थ्याने दिलेल्या गटापासून मिळणाऱ्या उत्पन्नाची नोंद ठेवावी.
    • पक्ष्यांचे अंड्यावर येण्याचे वय, त्यांच्यापासून मिळालेले एकूण व सरासरी अंडी उत्पादन इत्यादींबाबतच्या नोंदी नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेकडे ठेवाव्यात.
    • या योजनेअंतर्गत एकदा लाभार्थ्याची निवड झाल्यावर त्या लाभार्थ्याच्या या योजनेकरिता किमान पुढील पाच वर्षे पुनःश्‍च विचार करण्यात येत नाही.

    १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे ही नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय योजना राज्यात गेल्या तीन वर्षांपासून लागू करण्यात आली आहे. तथापि, २०१२-१३ या वर्षी सदर योजना राज्य मानव विकास अहवाल २००२ मधील मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या गडचिरोली, यवतमाळ, जालना, नंदुरबार, वाशीम व धुळे या जिल्ह्यांमध्येच ही योजना राबविण्यात येत आहे.

    ब्रॉयलर कोंबड्यांसाठी शेड

    1) शेडमध्ये नैसर्गिक हवा खेळती असावी. जागा सखल भागात असावी, दलदलीची नसावी. जमीन मुरमाड असावी. जागा शहरात अथवा भरवस्तीत नसावी. पाण्याची व विजेची सोय असावी. त्याचप्रमाणे जागेची निवड करताना तिच्या आकाराचा विचार करावा.

    2) शेडसाठी जमिनीच्या तुकड्याची कमीत कमी रुंदी 200 फूट असावी. शेडची दिशा ही नेहमी पूर्व - पश्‍चिम असावी. शेड उभारताना त्यांना लागणाऱ्या जागेचा विचार करून शेड उभारावी.

    3) सुरवातीच्या काळामध्ये प्रत्येक ब्रॉयलर पक्ष्याला 0.5 चौ. फूट जागा मिळावी. नंतरच्या कालावधीमध्ये प्रति पक्षी एक चौ.फूट जागा मिळेल अशाप्रकारे शेड उभारावी. शेडची लांबी कितीही ठेवली तरी चालते; परंतु रुंदीवर मात्र मर्यादा येते. जास्तीत जास्त 30 फूट रुंदी असलेल्या घरात योग्य वायुविजन व प्रकाश राहतो.

    4) शेडचा पाया दगड व चुन्यात बांधून पक्का केल्यास घराचा टिकाऊपणा वाढतो. शेडची जमीन आजूबाजूच्या जमीन सपाटीपेक्षा एक फूट उंचीवर असल्यास घराला ओल येत नाही, तसेच जमीन कॉंक्रिटची पक्की तयार करून घ्यावी.

    5) जुने पक्षी गेल्यानंतर ती धुऊन स्वच्छ करण्यासाठी सोपे जाते. शेडला रुंदीच्या बाजूने छपरापर्यंत उंच भिंती बांधाव्या लागतात. त्या भिंतीत सहा फूट उंचीचे व तीन फूट रुंदीचे दरवाजे ठेवावेत. शेडच्या लांबीच्या बाजूने एक फूट उंचीच्या विटांच्या भिंती बांधाव्यात. त्यावर पक्षिगृहात हवा आणि प्रकाश येण्यासाठी किमान सहा ते आठ फूट उंचीची छपरापर्यंत जाळी मारावी.

    6) शेडमध्ये लांबीच्या दोन्ही बाजूस अंतराअंतराने आठ फूट उंचीचे लोखंडी अगर कॉंक्रिटचे खांब उभे करावेत. त्यावर कैच्या चढवून दोन कैचीतील अंतर दहा फूट ठेवावे. कैच्यांवर दुपाखी छप्पर इतर लोखंडी अँगलच्या आधाराने बसवले जाते.

    7) दोन्ही बाजूंस छपराचा पत्रा साधारणतः चार फूट बाहेर काढल्याने शेडमध्ये येणारा पाऊस जमिनीवर पडून लिटर ओले होत नाही. शेडची मधली उंची 12 ते 15 फूट व बाजूची उंची सात ते आठ फूट ठेवल्याने छपरास योग्य ढाळ मिळून पावसाचे पाणी झटकन ओघळून जाते. घराच्या छपराकरिता वापरण्यात येणारा पत्रा हा सिमेंटचा असावा.

    पोल्ट्रीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान

    गेल्या काही वर्षांत देशातील पोल्ट्री उद्योग आधुनिक होत असून यातून चांगल्या रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. इनक्‍युबेटर व हॅचर्समध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले आहे. यामध्ये सर्व कामे स्वयंचलित पद्धतीने नियंत्रित केली जातात. याचा पोल्ट्री व्यावसायिकांनी फायदा करून घेतला पाहिजे.

    पोल्ट्रीतील आधुनिकीकरणातून मजुरांवरील अवलंबन कमी होते. पक्ष्यांच्या व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढते, गुणवत्ता कायम राखली जाते. अन्न सुरक्षेच्यादृष्टीने हे महत्त्वाचे आहे. हॅचरीज, ब्रॉयलर फार्म, ब्रीडर फार्म, खाद्य तयार करण्याचे युनिट, औषधे व लस तयार करणारे युनिट, मशिनरी तयार करणाऱ्या उद्योग समूहांमध्ये आधुनिकीकरण होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकऱ्यांना पोल्ट्री व्यवसायात नवनवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. यामध्ये करार पद्धतीने कुक्कुटपालन, खाद्यनिर्मिती असे उद्योग सुरू करणे शक्‍य आहे. पोल्ट्री व्यवस्थापनामध्ये आता संगणकीकरणही वाढते आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टींची नोंद ठेवणे सोपे जात आहे.

    पोल्ट्री प्रकल्पाची आखणी

    1) जागेची निवड - पोल्ट्रीची जागा निवासी भागापासून दूर असावी. कुठल्याही प्रकारचे प्रदूषण नसावे. पक्ष्यांचे व्यवस्थापन करताना जैव-सुरक्षेचे सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. 
    2) पाणीपुरवठ्याची गुणवत्ता व उपलब्धता - चांगल्या प्रतीचे पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध असावे किंवा पाणी प्रक्रिया संयंत्राच्या वापरानेही हे करता येईल. 
    3) कायम वीजपुरवठ्याची सोय - विद्युतपुरवठा खंडित झाल्यास पुरेशी क्षमता असलेले जनरेटर किंवा इतर काही पर्यायांची सोय असावी. 
    4) कमी आर्द्रता - विविध रोगांना प्रतिबंध करण्यासाठी आणि पक्ष्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने योग्य वातावरण आवश्‍यक असते. 
    5) तांत्रिक कर्मचारी - प्रशिक्षित, योग्य ज्ञान असलेले कर्मचारी प्रकल्पावर असणे आवश्‍यक आहे. 
    6) बाजारपेठांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. 
    7) पक्ष्यांचे प्रकार, निवासाची पद्धत आणि प्रकल्पाचा प्रकार यावरून योग्य सामग्रीची निवड करावी. 

    लागणारी साधनसामग्री

    1) केजेस (पारंपरिक प्रकारचे किंवा बॅटरी टाइप) 
    2) पिण्याच्या पाण्याची योजना (निपल) 
    3) स्वयंचलित खाद्यपुरवठा 
    4) पक्ष्यांची विष्ठा गोळा करणारी यंत्रणा 
    5) अंडी गोळा करण्याची यंत्रणा 
    6) सायलो आणि खाद्य वाहतूक यंत्रणा 
    7) अंड्यांसाठीचे काउंटर 
    8) वायुविजन आणि थंड करण्याची यंत्रणा 
    9) संगणक प्रणाली 
    10) उच्चदाब असलेले फॉगर्स 
    11) गॅस ब्रुडिंग यंत्रणा 
    12) इनक्‍युबेटर व हॅचर्स (ऑटोमॅटिक व सेमी ऑटोमॅटिक) 
    13) हॅचरीज वायुविजन यंत्रणा.

    पोल्ट्रीमधील आधुनिकीकरण

    1) स्वयंचलित खाद्य यंत्रणा

    मानवी पद्धतीने खाद्यपुरवठा करताना काही वेळा असमान पद्धतीने खाद्याचे वितरण होते. त्यामुळे पक्ष्यांच्या शरीराच्या वजनावरून बराच मोठा फरक पडतो. वाया जाणाऱ्या खाद्यावर नियंत्रण मिळविणे अवघड जाते. व्यावसायिक ब्रॉयलर पोल्ट्री उद्योगामध्ये खाद्याचा खर्च हा एकूण उत्पादनावरील खर्च व वाया जाणाऱ्या खाद्याच्या 60 ते 70 टक्के इतका असतो. याउलट, स्वयंचलित खाद्य यंत्रणेतून अचूक प्रमाणात आणि कमी वेळेत खाद्य संपूर्ण शेडमध्ये एकसमान प्रमाणात दिले जाते. यामुळे पक्ष्यांचे वजन एकसमान राखले जाऊन खाद्य रूपांतरणाचे प्रमाण कमी होते. खाद्य वाया जात नाही. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन नफ्यात वाढ होते. मजुरांची गरज कमी होते. आजारांच्या संक्रमणावर नियंत्रण मिळविता येते. पक्ष्यांचे योग्य व्यवस्थापन होऊन अपेक्षित उत्पादन मिळते.

    2) स्वयंचलित पाणीपुरवठा यंत्रणा

    नेहमीच्या पाणीपुरवठा पद्धतीमुळे शेडमध्ये पक्ष्यांना देताना पाणी भरपूर प्रमाणात वाया जाते. लिटर ओले होऊन अमोनिया व इतर वायूंचे प्रमाण वाढते. त्यामुळे पक्ष्यांचे कार्य बिघडते. आजारी पक्ष्यांची लाळ पाण्याच्या भाड्यात गळल्याने रोगांचे संक्रमण जलद गतीने होते. जर पाणी साठविण्याचे भांडे व्यवस्थित स्वच्छ केले नाही, तर जिवाणूंमार्फत होणारा संसर्ग पक्ष्यांना खूप घातक ठरतो. स्वयंचलित प्रणालीमध्ये निपलने पाणी देण्याची सोय आहे. शेडमध्ये पक्ष्यांच्या उंचीच्या वरच्या पातळीत निपल बसविले जातात. बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाणी वाया जात नाही. लिटर कोरडे राहाते. वातावरण चांगले राहाते. पक्ष्यांची लाळ पाण्यामध्ये पडत नाही. यामुळे होणारे प्रदूषण थांबले जाते. पाणीपुरवठ्याचे पाइप्स बंद व अपारदर्शक असल्याने जिवाणू अथवा शेवाळामुळे होणारे रोगाचे संक्रमण होत नाही. मजुरांची गरज कमी होते. आजार व संक्रमणावर नियंत्रण राखले जाते.

    फायदे

    1) नियंत्रित वातावरणाची शेड तयार केली, तर नेहमीपेक्षा जास्त पक्षी तेवढ्याच आकाराच्या शेडमध्ये सांभाळता येतात. त्यामुळे उभारणी खर्च, वीज, मजूर, नियंत्रण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जागेच्या खर्चाची बचत होते. 
    2) प्रकल्प क्षेत्रावरील दैनंदिन कामकाजावर सहज लक्ष ठेवता येते, नोंद ठेवता येते. 
    3) अंड्यांचे, पक्ष्यांचे वजन चांगले मिळते. 
    4) जैव सुरक्षा व्यवस्थापन चांगले राखले जाते. 
    5) पिल्लांसाठी आरोग्यदायी वातावरण आणि अति आरामदायी वातावरण मिळते. 
    6) खाद्य वाया जाण्याचे प्रमाण कमी होते 
    7) खाद्य रूपांतरणाचे प्रमाण कमी होते 
    8) मालाच्या साठ्याचे व्यवस्थापन चांगले होते 
    9) कमी जागेत, मोठा प्रकल्प उभारता येतो. 

    शेड बांधणीचे प्रकार

    कमी खर्चात पक्ष्यांसाठी आवश्‍यक शेड उभारता येते. पक्ष्यांच्या योग्य व्यवस्थापनासाठी योग्य वातावरण राखता येते. स्वयंचलित पद्धतीमुळे निवारे सहज वाढविता येतात. भोवतालचे वातावरण वर्षभर साधारण राहत असेल तर आपण ओपन हाऊसचा वापर करू शकतो. अशा परिस्थितीत अतिरिक्त रोधक व वातावरण नियंत्रणाची गरज नसते. काही भागांत लोक "मल्टिस्टोअरेज हाऊसेस' बांधतात.

    पक्ष्यांसाठी शेड बांधताना सॅंडविच तावदानांचा वापर, फायबर रोधकासह द्विस्तरीय कोरूगेटेड शीट्‌स, हॉलो बॉक्‍स, थर्मोकूल इन्सुलेटेड भिंती, ऍसबेस्टॉस शीट तसेच बाजूची भिंत खुली असलेली शेड बांधणे गरजेचे आहे.

    इनक्‍युबेटर व हॅचर्सचे प्रकार

    दोन्ही बाजूंवर गॅल्व्हनाइज्ड शीट लावलेले इनक्‍युबेटर्स हे पारंपरिक पद्धतीने लाकडाच्या भिंतींचे बनविले जातात. पाऱ्याच्या तापमापकाचा उपयोग तापमान नियंत्रणासाठी होतो. गनी रिंग्जचा वापर आर्द्रता नियंत्रणासाठी केला जातो. एम.एस. केबिनमध्ये ट्रॉलीज बाहेर येऊ शकणार नाहीत अशाप्रकारे बसविल्या जातात. त्यामुळे जेव्हा अंडी आतमध्ये घेतली जातात त्या वेळी आतमध्ये योग्य वातावरण राखले जाते. परंतु यामध्ये सर्व नियंत्रण हे मानवी असते; म्हणून माणसाकडून चूक झाल्यास उत्पादनाच्या प्रतीवर परिणाम होऊ शकतो. या सर्व घटकांमुळे इनक्‍युबेशनवर ताण येतो आणि पिल्लांची प्रत खालावते. त्याचबरोबर, होणारे कार्य हे सभोवतालच्या वातावरणावर आणि मानवी कौशल्यावर अवलंबून असते, त्यामुळे शेवटी नफा कमी मिळतो.

    गेल्या काही वर्षांत इनक्‍युबेटर व हॅचर्समध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले आहे. काही कंपन्यांनी उच्च-तंत्रज्ञानावर आधारित इनक्‍युबेशन यंत्रणा तयार केली आहे. यामध्ये सर्व कामे स्वयंचलित पद्धतीने नियंत्रित केली जातात. या इनक्‍युबेटरमध्ये लिक प्रूफ स्थिती राखणाऱ्या अधिक घनतेच्या ईपीएस, एबीएस पॅनेल्स केबिन्सचा वापर केला आहे. प्लॅटिनम (PT-500) प्रोब्समुळे तापमान व आर्द्रता नियंत्रणात ठेवली जाते. ऊर्जेमध्ये बचत होते. या सर्व गोष्टींमुळे इनक्‍युबेशनचा ताण कमी केला जाऊन अतिशय चांगल्या प्रतीची पिल्ले विकसित होतात. या पिल्लांचे त्यानंतरचे कार्य इतर पिल्लांच्या मानाने नक्कीच सुधारते. या यंत्रणेला संगणकाची जोड आहे. ज्यामुळे सर्व माहिती साठवली जाते. त्यात बदल करता येत नाही. आधुनिक यंत्रणेमुळे 50 टक्के जागेची, 45 टक्के ऊर्जा आणि मजुरांवरील खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते. त्यामुळे जरी प्राथमिक गुंतवणूक अधिक असली तरी येत्या काळात हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणारे आहे.

    मेंढी पालनाचे फायदे

    मेंढी पालन

    मेंढी पालन हे कितीही प्रमाणात (जेथे जास्त जमीन नाही) किंवा एखाद्या घराच्या शेडमध्ये देखील करता येते. कोरड्या जमिनीवर शेती करण्यासाठी हा एक फार महत्वाचा घटक आहे. फार थोडी गुंतवणूक करून मेंढी पालन हा किरकोळ, लहान शेतकरयासाठी आणि भूमिहीन श्रमिकांसाठी एक फायदेशीर उद्यम ठरू शकतो.

    फायदे

    • पर्यावरण आणि अयोग्य प्रबंधन पध्दतींशी चांगले अनुकूलन
    • दिवसेंदिवस मांसाची किंमत वाढत आहे.
    • मेंढ्यांपासून दूध आणि लोकर मिळते.
    • एक मेंढी एका वेळेस 1 ते 2 करडू देते
    • मांसापासून सरासरी मिळकत 22-30 कि.ग्रा/मेंढी
    • खतामुळे जमिनीची चांगली किंमत

    जाती

    • स्थानीय जाती क्षेत्रांप्रमाणे बदलते
    • परकीय जाती
    1. मेरीनो – लोकरीसाठी
    2. रॅम बुलेट – लोकर आणि मांस
    3. शेविएट – मांस
    4. साउथ डाउन – मांस

    अर्थशास्त्र

    • आठ महिन्यांच्या मेंढीचे आरंभिक मूल्य: रू. 1000/- ते रू.1200/-
    • मेंढ्या 6-7 वर्षांच्या झाल्यावर विकतात रू.800/- ते रू.1500/- ते 2000/-
    • रॅमस् 1 वर्ष किंवा त्याही पेक्षा लहान असतांना विकल्या जातात – रू.1500/- ते रू.2000/-

    डेक्कनी मेंढी


    शारिरीक गुण वैशिष्टये.

    रंग - हया मेंढयांमध्ये काळा (57%) पांढरा (28%) आणि काळा पांढरा, मिश्र रंग (15%) तपकिरी असा आढळतात.

    वजने- दख्खनी मेंढया मध्यम प्रकारच्या मेंढया असून त्यांची वजने आणि शारीरीक प्रमाणके खालीलप्रमाणे

    प्रौढ नर

    प्रौढ मादया

     

    अ) वजन किं

    ३८.४८+१.०६

    २८.५८ ०.११

    ब) लांबी (सेमी)

    ६७.८८ ०.६९

    ६५.२१ ०.१०

    क) उंची (सेमी)

    ६७.४४ ०.७१

    ६३.७९ ०.०९

    ड) छातीचा घेर

    ७७.९६ ०८७

    ७०.७५ ०.१०

    पैदास - मेंढपाळांच्या कळपामध्ये करडे जन्माचे प्रमाण ७५.२ %

    उत्पादनः- 
    मांस उत्पादन - कत्तलीचे वय सहा महिने आणि मांसाचा उतारा ४९.६+१८%

    लोकर उत्पादन 
    सरासरी प्रति पैकी लोकर उत्पादन ५८७ ग्रॅम्स 
    लांबी (सेमी) ८.५८ ०.३२ 
    धाग्याची तलमता (मासक्राँन) ५२.४२ १.८६ 
    केसांचे प्रमाण (%) ७३.७५ २.५४

    लोकर केसांची घनता (प्रति चौ. से मी) ७३४.४६ २८.९०

     

     




    माडग्याळ मेंढी


    शारिरीक गुण वैशिष्टये. 
    रंग - हया मेंढयांमध्ये प्रामुख्याने पांढरा आणि त्यावर तपकिरी मोठे ठिपके आढळतात आणि हे माडग्याळ मेंढयांचे खास वैशिष्टये आहे.

     

    नाक - हठक पोपटासारखे बर्हिवक्र नाक हे हया जातीचे दुसरे वैशिष्टय आहे.

    शिंगे - दोन्ही लिंगामध्ये शिंगे आढळून येत नाहीत.

    उंची - प्रौढ मेंढेनराची सरासरी उंची खादयांपर्यन्त ८० से.मी. (३२ इंच) ते ८८ सें.मी. (३५ इंच) तर प्रौढ मेंढयांमध्ये ६३ से.मी. (२५ इंच) ते ७५ सें.मी. (३० इंच) आढळते.

    मान - प्रौढ मेंढेनरामध्ये ४५ सें.मी. (१८ इंच) ते ५३ सें.मी. (२१ इंच) तर प्रौढ मेंढयांमध्ये ३० सें.मी. (१२ इंच) आढळते. 
    शेपटाची सरासरी लांबी १७ ते २० सें.मी.

    १. जुळयाचे प्रमाणः अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी 
    २. लोकर - लोकर ही जाडी भरडी आणि सरासरी वार्षिक उत्पादन ते २५० ग्रॅम्स ते २६० ग्रॅम्स आढळते.

    • सरासरी वजनवाढीचा वेग २२५ ग्रॅम्स प्रतिदिन आढळतो.
    • दुध - कोकरापुरते दुध उपलब्ध असते.
    • प्रजनन क्षमता -
    • कालावधी - ९ ते १२ महिने
    • एकूण पैदाशीचा कालावधी - ७ ते ८ वर्षे
    • सर्वसाधारण जीवन - १४ ते १५ वर्षे कालावधी.
    माडग्याळ मेंढयांचे स्थलांतर - चारा आणि पाण्याकरिता नजिकच्या ता.मंगळवेढा, जि. सोलापूर आणि जिल्हा विजापूर, कर्नाटक राज्यामध्ये स्थलांतरित होतात.

    मेंढी पाळीव प्राणी

    मेंढी हा पोकळ शिंगे असलेला, रवंथ करणारा, समखुरी प्राण्यांच्या आर्टिओडॅक्टिला गणातील बोव्हिडी कुलाच्या कॅप्रिनी या उपकुलातील प्राणी आहे. जगाच्या कृषी अर्थशास्त्रामध्ये ह्याला महत्त्वाचे स्थान आहे. मुख्यत्वे लोकर व मांस आणि काही प्रमाणात दुधाच्या उत्पादनासाठी मेंढ्या पाळल्या जातात. समशीतोष्ण प्रदेशातील कमी पाऊस असलेल्या भागातील जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) मेंढ्यांना अनुकूल असते. उंच डोंगराळ प्रदेशातील खुरटे गवत व रसाळ तण खाऊन मेंढी आपली उपजीविका उत्तम तऱ्हेने करू शकते. आकारमान, वजन, लोकर व शिंगे यांवरून त्यांचे अनेक प्रकार अस्तित्वात आहेत. काही प्रकारांत नर व मादी दोहोंनाही शिंगे असतात. माद्यांची शिंगे नरापेक्षा बहुधा लहान असतात. काहींमध्ये फक्त नरांनाच शिंगे असतात, तर आणखी काही प्रकारांत ती दोघांनाही नसतात. नरांची शिंगे कोणीय असून त्यांवर आडवे कंगोरे असतात; त्यांचा रंग हिरवट किंवा तपकिरी असतो. सकृतदर्शनी काही प्रकारच्या मेंढ्या शेळ्यांसारख्या दिसतात, त्यांच्यातील फरक चटकन लक्षात येत नाही.

    उत्पत्ती व इतिहास

    इतर सर्व पाळीव प्राण्यांप्रमाणे मेंढी हा प्राणी सुरुवातीस रानटी स्थितीत होता. मानवाने नवाश्म युगामये (इ.स.पू. ९००० ते ८००० वर्षे) इतर प्राण्यांबरोबर मेंढी हा प्राणी माणसाळवला असावा. मध्यपूर्वेपासून ते आयर्लंडमधील दलदलीच्या भागापर्यंतच्या प्रदेशातील मानवाच्या अस्तित्वाच्या इतर खाणाखुणांबरोबर मेंढ्यांची हाडे सापडली आहेत. ॲग्रिकल्चरल ओरिजिन्स अँड डिस्‌पर्सल्स या ग्रंथामध्ये कार्ल ओसॉयर यांनी मेंढ्यांच्या माणसाळण्याचा काळ माणूस शेती करून राहू लागलेल्या नवाश्म युगातील मानवाच्या काळाशी संबंधित असल्याचे व नैर्ऋत्य आशियामध्ये त्या माणसाळल्या गेल्या असाव्यात, असे प्रतिपादन केले आहे. लिओपोल्ड ॲडॅमट्झ या ऑस्ट्रियन संशोधकांच्या मते वलयाकार (वेढा असलेली) शिंगे असलेल्या माणसाळलेल्या मेंढ्यांची उत्पत्ती पंजाब ते बलुचिस्तान या भागातील उरियल प्रकारातील ओव्हिस विग्नाय या रानटी मेंढ्यापासून झाली असावी. ताम्रयुगामध्ये यूरोपात ओ. एरिस स्टुडेरायहा मेंढ्यांचा जाडजूड वलयाकार शिंगे असलेला नवीन प्रकार अस्तित्वात आला. जे.यू. ड्यूर्स्ट या स्वीडिश आनुवंशिकीशास्त्रज्ञांच्या मतानुसार हा प्रकार सार्डिनियामधील डोंगराळ प्रदेशातील ओ. म्युसिमॉन ह्या रानटी मेंढ्यांपासून उत्पन्न झाला असावा. ओ. म्युसिमॉन मेंढ्यांचा सार्डिनियातील माणसाळलेल्या मेंढ्यांशी फलदायी संयोग होऊ शकतो, हे थोरले प्लीनी (इ.स. २३ ते ७९) यांच्या वेळेपासून माहीत आहे. मेंढ्यांचे मूळ वसतिस्थान मध्य आणि पश्चिम आशिया हे समजले जाते. अर्वाचीन पाळीव मेंढ्यांची उत्पत्ती कशी झाली याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नसली, तरी इराण, अफगाणिस्तान व तिबेट येथील उरियल (ओ. विग्नाय), दक्षिण पूर्व यूरोपमधील ओ. म्यूसिमॉन आणि मध्य आशिया या हिमालयाच्या भागातील आर्गली (ओ. ॲमॉन) या रानटी मेंढ्यांपासून झाली असावी, असे दिसते. मेष म्हणजे मेंढा हे अग्नीचे वाहन आहे, असा उल्लेख वैदिक वाङ्‌मयात अनेक ठिकाणी आहे. यज्ञामध्ये मेंढ्याच्या मांसाचे हवन करण्यात येत असल्याबद्दलचा उल्लेख वैदिक मंत्रामध्ये आढळतो.राजनिघंटु (इ.स. १०७५) या ग्रंथामध्ये मेंढ्याचे मांस थंड व रुचकर पण पचनास जड असते, असे लिहिले आहे. बायबलमध्ये इतर कोणत्‌याही प्राण्यापेक्षा मेंढीचा उल्लेख अधिक ठिकाणी आहे. निरनिराळ्या धर्माच्या पुरातन इतिहासाच्या संदर्भात बळी देण्यासाठी मेंढा या प्राण्याचा उल्लेख सर्वत्र आढळतो. ही बळी देण्याची प्रथा अद्यापही चालू आहे.

    मध्ययुगामध्ये मध्यम व लांब धाग्याची लोकर व मांस यांकरिता इंग्लंडमधील मेंढ्या प्रसिद्ध होत्या, तर तलम धाग्याची लोकर असलेल्या मेरिनो मेंढ्याबद्दल स्पेन हा देश विख्यात होता. हे दोन देश मेंढ्यांचे मांस व लोकर या बाबतींत आघाडीवर होते. सोळाव्या व सतराव्या शतकांमध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांमध्ये मेंढ्या आयात करण्यात आल्या आणि तेथील जलवायुमान व चराऊ कुरणे यांच्या अनुकूलतेमुळे मेंढीपालनाचा धंदा वाढीस लागला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात अमेरिकेच्या पश्चिम भागामध्ये मेंढीपालनाचा धंदा मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. याची कारणेही तेथील जलवायुमान आणि चराऊ कुरणांची उपलब्‌धता हीच होती. तथापि १९५० नंतर अमेरिकेतील मेंढ्यांच्या संख्येत घट होऊ लागली. याचे कारण अधिक किफायतशीर असलेल्या दुग्धोत्पादनाच्या व गुरांच्या मांसोत्पादनाच्या धंद्याकडे तेथील लोकांचे लक्ष गेले, हे होय. तेथे मेंढ्यांची संख्या १९४७ मध्ये५.५ कोटी होती; १९७० मध्ये २.५ कोटींवर आली. याच काळात म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व यूरोपातील यूगोस्लाव्हिया, बल्गेरिया, रूमानिया, पोलंड, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी व पूर्व जर्मनी या देशांमध्ये लोकरीची प्रत वाढविण्याच्या दृष्टीने मेंढ्यांच्या प्रजननाकडे विशेष लक्ष पुरविण्यात आले. या देशांतील मेंढ्यांपासून मध्यम प्रतीची गालिच्याची लोकर मिळत असे, तर यूगोस्लाव्हिया, रूमानिया, बल्गेरिया व चेकोस्लोव्हाकिया या देशांमधील २५% दुग्धोत्पादन मेंढ्यांपासून मिळत असे. यांतील काही देशांमध्ये शेतीचे एकत्रीकरण करण्यात आले व मेंढीपालन सहकारी पद्धतीने करण्यात येऊ लागले. बल्गेरियातील स्टारा झागॉरा, रूमानियातील तुर्कांना व त्सिगाई, यूगोस्लाव्हियातील झॅकेल इ. स्थानिक जातींशी रशियन ॲस्कानियन, स्टाव्हरोपोल या मेरिनो मेंढ्यांच्या जातींचा संकर करून बल्गेरियामध्ये थ्रॅसियन मेरिनो, रूमानियामध्ये स्पान्सा व पोलंडमध्ये लोविक्का या वार्षिक ५.५ ते ७.५ किग्रॅ. तलम लोकर देणाऱ्या मेंढ्याच्या जाती निर्माण करण्यात आल्या आहेत.

    सर्वसामान्य माहिती

    हरिणाप्रमाणे मेंढ्यांच्या डोळ्याच्या खालच्या बाजूस कातड्याखाली एक ग्रंथी असते व तिचा स्त्राव बाहेर येण्यासाठी एक छिद्रअसते. बऱ्याच जातींमध्ये ती अल्पविकसित असते, तर काहींमध्ये ती अस्तित्वातही नसते. खुराच्या बेचक्यात पिशवीसारखी एक ग्रंथी असून तिच्यातून उग्र वास असलेला तेलकट पदार्थ स्त्रवत राहातो. चालताना गवताला किंवा वाटेवरील दगडाला हा स्त्राव लागतो. मेंढ्यांचे घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असल्यामुहे स्त्रावाच्या वासावरून आसपासच्या इतर मेंढ्यांची त्यांना चाहूल लागते. काही मेंढ्यांच्या गळ्यावर पुढच्या बाजूस केसांचा झुबका दिसून येतो; पण त्यांना दाढी नसते. शेळ्यांप्रमाणे मेंढ्यांच्या शरीराला उग्र वास येत नाही. मेंढ्यांना वरच्या जबड्यात पुढील बाजूस कृंतक दंत (कुरतडण्याच्या कामी उपयोगी पडणारे पटाशीसारखे दात) नसतात. त्या ठिकाणी उपास्थींचा (कूर्चाचा) जाड पुठ्‌ठ्यासारखा भाग असतो. खालच्या जबड्यात पुढील बाजूस आठ कृंतक दंत असतात. खालच्या जबड्यातील कृंतक व वरच्या जबड्यातील पुठ्‌ठ्यासारखा भाग यामध्ये गवत धरून डोक्याला हिसके देऊन ते तोडले जाते. खालच्या व वरच्या जबड्यात प्रत्येक बाजूस सहा सहा दाढा असतात. मेंढ्यांना ओठांची पुष्कळच स्वैर हालचाल करता येत असल्यामुळे हवे तेच नेमके खुडून जमिनीलगत चरता येते. इतर रवंथ करणाऱ्या प्राण्यांप्रमाणे मेंढ्यांचे पोट चार कप्प्यांचे असते. दुपारचा थोडा विश्रांतीचा वेळ सोडल्यास त्या दिवसभर चरत असतात. त्यांचे जवळ जवळ अर्धे आयुष्य चरण्यात जाते.

    मेंढ्याच्या त्वचेची जाडी २ मिमी. असते. व तीत कमीधिक प्रमाणात रंगद्रव्य असते. त्वचेमध्ये धर्म ग्रंथी, त्वक्‌-स्नेह ग्रंथी (तेलकट पदार्थ स्त्रवणाऱ्या ग्रंथी), लोम व लोकर उगविणारे तंतुपुटक असतात व त्यांची एक विशिष्ट रचना सर्वसाधारणपणे अस्तित्वात असते. जन्माच्या वेळी जे पुटक अस्तित्वात असतात त्यांना मूलपुटक म्हणतात. प्रत्येक पुटकाशी एकेके त्वक्-स्नेह ग्रंथी, धर्म ग्रंथी व अरेखित स्नायू (उभे तंतू असलेला अनैच्छिक स्नायू) संलग्न असतात. दुय्यम पुटक नंतर तयार होतात व त्यांच्याशी फकत एक त्वक्-स्नेह ग्रंथी संलग्न असते. मूलपुटक तीन तीनच्या समूहामध्ये असतात व त्याबरोबर काही दुय्यम तंतुपुटक असतात. हे तंतू निरनिराळ्या जातीनुसार कमी अधिक असतात व त्यांची संख्या द. चौ. सेंमी.मध्ये ७७५ ते ९,३०० असू शकते. बहुतेक मेंढ्यांच्या अंगावर लोकर असते; परंतु काही जातींच्या मेंढ्यांच्या अंगावर आखूड केस असतात, तर आणखी काहींच्या अंगावर लोकर व केस यांचे मिश्रण असते.

    लोकरीचा धागा बहुतांशी अविद्राव्य (न विरघळणाऱ्या) ⇨केराटिनाचा बनलेला असतो. धाग्याचा व्यास १० ते ७० मायक्रोमीटर (१मायक्रोमीटर=१०- मी) असतो व मेंढ्यांच्या अंगावर एक वर्ष वाढलेल्यसा धाग्याची लांबी २.५ ते १५ सेंमी. किंवा थोडी अधिक असते. धाग्याचा व्यास व लांबी यांचा मेंढ्यांची जात, पोषण व पर्यावरण यांचा अन्योन्य संबंध आहे. धाग्याचा एका सेंमी. लांबीमध्ये १ ते १० किंवा थोड्या अधिक मळसूत्री वळ्या दिसून येतात. या वळ्यांमुळे धाग्याला लवचिकपणा येतो. मेंढ्यांची लोकर जर कापली नाही, तर आयुष्यभर ती ठराविक प्रमाणात वाढत असते.

    मेंढ्या जात्याच भित्र्या असतात. त्यातल्या त्यात धीट मेंढीच्या पाठीमागे जाण्याची व कळपात राहण्याची त्यांची प्रवृत्ती असते. सामान्यतः त्यांना बुद्धी कमी असते, असे मानले जाते; तथापि हवामानासंबंधीची त्यांना चांगली जाण असते, असे दिसून येते. त्यांची आयुर्मर्यादा ७ ते १०वर्षे असते; पण २० वर्षेपर्यंत जगल्याची उदाहरणे आहेत. सपाटीपेक्षा उंच पठारावर चरणे त्यांना अधिक आवडते.

    रानटी मेंढ्यांच्या जाती

    तुर्कस्तानलगतच्या पामीर पठारावरील ४,९०० मी. उंचीवर मार्को पोलो या यूरोपीय प्रवाशांना तेराव्या शतकात रानटी मेंढ्यांचे कळप आढळले होते .

    अद्यापही जगाच्या पाठीवर रानटी मेंढ्यांचे अस्तित्व दिसून येते. तुर्कस्तानलगतच्या पामीर पठारावरील ४,९०० मी. उंचीवर मार्को पोलो या यूरोपीय प्रवाशांना तेराव्या शतकात रानटी मेंढ्यांचे कळप आढळले होते व पुढे त्यांच्याच नावाने ही जात ओ. पोली म्हणून ओळखली जाऊ लागली. य जातीतील नरांची शिंगे मोठी व पसरट असून शिंगांची टोके डोक्यापासून दूर राहतात. इतर रानटी जातींच्या शिंगांच्या अरुंद वळणामुळे टोके डोक्याजवळ राहतात. ओ. कारेलिनी हा याच मेंढ्यांचा एक प्रकार तिएनशान डोंगरांच्या रांगामध्ये आढळून येतो. या दोन्ही प्रकारच्या मेंढ्या आकारमानाने थोराड आहेत; पण अल्ताई पर्वत श्रेणीत आढळणाऱ्या ओ. ॲमॉन या आर्गली मेंढ्या सध्या अस्तित्वात असलेल्या रानटी मेंढ्यांपैकी सर्वांत धिप्पाड असून त्यांची उंची १.३ मी.व वजन १३५ किग्रॅ. असते. यांचा एक प्रकार लडाख व तिबेटमध्ये, दुसरा पूर्व मंगोलियामध्ये व तिसरा गोबीच्या वाळवंटामध्ये आढळून येतो. आर्गली गटातील सर्वात लहान रानटी मेंढ्या अफगाणिस्तान, पंजाब व लडाखमधील डोंगराळ भागामध्ये उरियल, उरिन किंवा शापू म्हणून ओळखल्या जातात. या पर्शियन किंवा आर्मेनियन (ओ. ओरिएंटॅलिस) आणि सार्डिनियन किंवा कॉर्सिकन (ओ. म्युसिमॉन) मेंढ्यांसारख्या दिसतात. याशिवाय तिबेटमध्ये १० ते ५० च्या कळपात आढळणाऱ्या भराल (स्यूडॉइस नेयॉर) या हिमालयातील निळ्या मेंढ्या म्हणून ओळखल्या जातात.

    आफ्रिकेमध्ये उत्तरेपासून पूर्वेकडे सूदानपर्यंत पसरलेल्या डोंगरांच्या रांगांमध्ये रानटी मेंढ्यांचा एकच प्रकार उदाद किंवा औदाद (ॲमोट्रॅगस लेरव्हिया) म्हणून ओळखला जातो. या मेंढ्यांना डोळ्याखालील ग्रंथी असत नाहीत व त्यांची शिंगे शेळीप्रमाणे गुळगुळीत असतात.

    रशियामधील पूर्व सायबीरियाच्या भागामध्ये व लगतच्या स्टॅनोव्हाय पर्वतराजीमध्ये ओ. बोरीलिस व ओ. निव्हिकोला हे रानटी मेंढ्यांचे दोन प्रकार आढळतात. या मेंढ्यांचे उत्तर अमेरिकेतील डोंगराळ भागात आढळणाऱ्या रानटी मेंढ्यांशी बरेच साम्य आहे. अमेरिकेतील या रानटी मेंढ्यांना मोठ्या शिंगांच्या (बिग हॉर्न) म्हणून ओळखतात. त्यांच्या डोळ्याखाली ग्रंथी नसते, तसेच वयस्क नराच्या शिंगाचा पुढील भाग सपाट असतो. यामुळे आर्गली मेंढ्यांहून त्या निराळ्या आहेत, हे लक्षात येते.

    अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या भागातील याच प्रकारातील मेंढ्या रंगाने खाकी असून त्यांच्या पुठ्‌ठ्याचा रंग पांढरा असतो. स्टिकीन नदीच्या आसपासच्या ब्रिटिश कोलंबियातील मेंढ्यांचा रंग काळा असतो, तर अलास्कामधील याच जातीच्या रानटी मेंढ्या पांढऱ्या असतात व त्या डाल मेंढ्या म्हणून ओळखल्या जातात.

    वर्गीकरण

    शरीरांची ठेवण, विशेषतः शेपटीची लांबी व तीत साठणारी चरबी, तसेच लोकरीची प्रत यांच्यावर आधारित असे पाळीव मेंढ्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. यानुसार खालील प्रमुख वर्ग मानले जातात.

    (१) उत्तम प्रतीची तलम लोकर देणाऱ्या मेंढ्या : उदा., मेरिनो, रॅम्ब्युलेट इत्यादी.

    (२) मध्यम प्रतीची तलम लोकर देणाऱ्या मेंढ्या : ह्या मेंढ्यांतही दोन प्रकार आहेत (अ) काळ्या किंवा लांबट तोंडाच्या मेंढ्या उदा., साऊथडाऊन, सफोक, ऑक्सफर्ड इत्यादी. (आ) पांढऱ्या तोंडाच्या डॉर्सेट हॉर्न, रायलँड इत्यादी.

    (३) लांब धाग्याची लोकर देणाऱ्या मेंढ्या : ह्यातील एक प्रकारच्या मेंढ्या लांब व चमकदार लोकर देणाऱ्या आहेत. उदा., कॉटस् वोल्ड, लिंकन इत्यादी. ह्यातील दुसऱ्या प्रकारच्या मेंढ्यांवर चकाकी कमी असते. या प्रकारात बॉर्डर लायसेस्टर, रोमनी मार्श, शेव्हिएट, मेंढ्यांत मोडतात.

    (४) लांब व जाड धाग्याची लोकर देणाऱ्या मेंढ्या : ह्यामध्येही दोन प्रकार आहेत (अ) सुधारित मेंढ्या : स्कॉटिश ब्लॅक फेस इत्यादी. (आ) अजूनही आद्य अवस्थेत असलेल्या मेंढ्या; ह्या मेंढ्यांचे तीन उपप्रकार आहेत. (आ. १) पातळ शेपटीच्या मेंढ्या : उदा., नव्हाजो (अमेरिकन), झॅकेल (यूरोप), यूरा (स्पेन), तिबेट (आशिया). (आ.२) चरबीयुक्त शेपटीच्या मेंढ्या : यांचेही परत दोन उपउपप्रकार आहेत. (१) चरबरीत लोकर देणाऱ्या : आशिया खंडातील बऱ्याचशा मेंढ्या. (२) फर देणाऱ्या : काराकुल जातीच्या मेंढ्या. (आ. ३) चरबीयुक्त पुष्ट पुठ्‌ठ्याच्या मेंढ्या : ह्या मेंढ्याच्या प्रकारात कझक, दुम्बा इ. जातीच्या मेंढ्या मोडतात.

    वरील चार मुख्य प्रकारच्या मेंढ्यांच्या जाती आहेत (उत्तम प्रतीची लोकर देणाऱ्या, मध्यम प्रतीची लोकर देणाऱ्या, लांब धाग्याची लोकर देणाऱ्या व जाड धाग्यांची लोकर देणाऱ्या). ह्याशिवाय लांब धाग्याची लोकर देणाऱ्या मेंढ्यांचा उत्तम प्रतीची लोकर देणाऱ्या मेंढ्यांशी संयोग करून संकरित मेंढ्यांचा एक नवीन वर्गच तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये कॉरिडेल, पोलवर्थ, कोलंबिया, पनामा, कॉरमो इ. जातींच्या मेंढ्या येतात.

    काही मेंढ्यांच्या अंगावर लोकर अजिबात नसते. त्यांचा उपयोग फक्त मांस उत्पादनासाठीच होतो. नेल्लोर, बन्नूर ह्या जातींच्या मेंढ्या मांसासाठी म्हणूनच पाळतात. पर्शियन जातीच्या मेंढ्या ह्या प्रकारात मोडतात. काही मेंढ्याचा उपयोग दूध उत्पादनासाठी करतात. ईस्ट फ्रेझियन, पेलविन, झॅकेल या मेंढ्या ह्या प्रकारात मोडतात.

    मेंढीपालन जग आणि भारत

    प्राचीन काळी मेंढ्‌यांची पैदास व जोपासना कशी केली जात असे याबद्दलची निश्चित माहिती उपलब्ध नाही. पंधराव्या शतकापासूनची यांसंबंधीची माहिती मिळते.

    प्राचीन काळी मेंढ्‌यांची पैदास व जोपासना कशी केली जात असे याबद्दलची निश्चित माहिती उपलब्ध नाही. पंधराव्या शतकापासूनची यांसंबंधीची माहिती मिळते.

    उत्तर व दक्षिण गोलार्धाच्या २० ते ६० अक्षांशामधील देशांमध्ये मेंढीपालन मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. बहुतांशी लोकरीसाठी तर काही देशांत प्रामुख्याने दुधासाठी व आणखी काही देशांत मांसासाठी त्या पाळल्या जातात. अठराव्या शतकापर्यंत उ. गोलार्धामध्ये स्पेन, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स व इटली या देशांत मेंढीपालन प्रगतावस्थेत होते. औद्यागिक क्षेत्रात आघाडीवर येण्यापूर्वी हे देश केवळ मेंढ्या व त्यांपासून मिळणाऱ्या लोकरीच्या उत्पादनावर संपन्न झाले होते. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस द. गोलार्धात, यूरग्वाय, अर्जेंटिना, द. अफ्रिका प्रजासत्ताक, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर मेंढ्या पाळण्यात येऊ लागल्या. ऑस्ट्रेलियामध्ये १८५० मध्ये मेंढ्यांची संख्या१ कोटी ७० लाख होती, तर १८९० च्या सुमारास ती १० कोटींच्या आसपास झाली.

    यूरोप व भूमध्य समुद्राच्या आसपासच्या देशांतील मिश्र अर्थव्यवस्थेमुळे, मांस, लोकर व दूध यांच्या उत्पादनाकरिता कॉर्सिकन आणि सार्डिनियन मेंढ्या पाळल्या जातात. मध्य व द. यूरोपामध्ये – जर्मनीमध्ये ईस्ट फ्रिझियन, बल्गेरियामध्ये पेलबिन आणि स्टारा झागॉरा व बाल्कन देशांमध्ये झॅकेल या जातींच्या मेंढ्या दुग्धोत्पादनासाठी पाळतात. इराणमधील दुग्धोत्पादनातील २५% दूध मेंढीचे आहे. तेथील बलुची मेंढ्या एका दुग्धकालात सरासरीने ५०किग्रॅ. तर लेबाननमधील आवास्सी मेंढ्या भरपूर खाद्य दिल्यावर १९० दिवसांत २०० किग्रॅ. दूध देतात. इराकमधील अर्धेअधिक दुग्धोत्पादन मेंढीचे आहे. इराणमधील बलुची, सँडजबी व मोघानी या मेंढ्यांच्या दुधामधील चरबीचे प्रमाण अनुक्रमे सरासरीने ६.२१%, ६.४७% आणि ५.६९% इतके आहे.

    मध्यपूर्वेकडील भाग, प. आशियातील वाळवंटी प्रदेश, मंगोलिया, चीन व भारतीय उपखंडातील भागामध्ये मेंढ्यांच्या अनेक जाती आणि उपजाती पाळण्यात येतात व त्यांच्यापासून प्रायः गालिचे व कांबळी (घोंगड्या) यांना उपयुक्त असलेल्या लोकरीचे उत्पादन होते. यांशिवाय अफगाणिस्तान व इराणमध्ये मांसोत्पादनासाठी दुम्बा आणि मध्य आशियामध्ये फरसाठी काराकुल जातीच्या मेंढ्या पाळण्यात येतात.

    संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेच्या १९८२ सालच्या अंदाजाप्रमाणे जगातील मेंढ्यांची संख्या ११५.७ कोटीच्या आसपास असून त्यांपैकी १/३मेंढ्या द. गोलार्धात आहेत. भारतामध्ये ४.१७ कोटी मेंढ्या असून संख्येच्या दृष्टीने जगामध्ये भारताचा सहावा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलिया, रशिया, न्यूझीलंड, अर्जेंटिना व द. आफ्रिका प्रजासत्ताक या देशांतील संख्या भारतापेक्षा अधिक आहे. भारतामधील जवळजवळ निम्म्‌‌‌‌‌‌या मेंढ्या आंध्र प्रदेश, तमिळनाडू व कर्नाटक या राज्यांत मिळून आहेत. महाराष्ट्रातील मेंढ्यांची संख्या २१ लाखांच्या आसपास आहे.

    चराऊ रानांची विपुलता व समशीतोष्ण जलवायुमान मेंढीपालनाचा अनुकूल असते. तथापि अंगावरील लोकरीमुळे आपल्या शरीराच्या तापमानाचे नियंत्रण त्या चांगल्या तऱ्हेने करू शकतात, म्हणून उष्ण जलवायुमानालाही त्या तोंड देऊ शकतात. त्यांचे नेहमीचे तापमान ३९ से. असले, तरी ३७ ते४१ से. इतका फेरबदल त्यात असून शकतो. शरीरातील उष्णता मुख्यत्वे श्वसनावाटे बाहेर टाकली जाते; तरी पण मेंढ्यांना काही प्रमाणात घाम येतो. मकरवृत्ताच्या उत्तरेकडील ऑस्ट्रेलियाच्या भागात सरासरी पर्जन्यमान ४२ सेंमी. पेक्षा कमी आहे व त्या ठिकाणी नुसत्या झाडाझुडपांच्या चराईवर मेरिनो जातीच्या मेंढ्या आपली उपजीविका चांगल्या तऱ्हेने करू शकतात.

    पश्चिम राजस्थानातील दुर्जल प्रदेशामध्ये उन्हाळ्यातील कमाल तापमान ४२ से. इतके असते. तेथील मारवाडी व माग्रा जातींच्या मेंढ्यांच्या एका अभ्यासावरून या मेंढ्यांना आठवड्यातून फक्त दोनदाच पिण्याचे पाणी दिले, तरी त्यांच्या वजनामध्ये अगर उत्पादन व प्रजनन कार्यक्षमतेवर काहीही विपरित परिणाम झाल्याचे आढळून आले नाही. तसेच हिवाळ्यामध्ये सलग १३ दिवसांपर्यंत पाणी मिळाले नाही, तर त्या तग धरून राहतात.

    जगातील मेंढ्यांच्या लोकरीचे उत्पादन १९८२ साली २८.५६ लक्ष टन झाले व त्यातील ४२% मेरिनो जातीच्या मेंढ्यांचे होते; संकरित मेरिनो व इंग्लंडमधील लोकर देणाऱ्या मेंढ्यांपासून मिळणारी लोकर ३८%, तर २०% गालिच्याची लोकर होती लोकर. ऑस्ट्रलियामध्ये जगातील संख्येच्या१/६ मेंढ्या आहेत; पण लोकरीचे उत्पादन जगातील उत्पादनाच्या १/३ आहे. द. आफ्रिकेतील मेंढ्यांची संख्या जगाच्या ४% व उत्पादनही जगातील उत्पादनाच्या ४% आहे, तर भारतातील संख्या जवळजवळ ४% पण उत्पादन मात्र १.४% आहे (३७,००० टन).

    भारतामध्ये हिमालयाच्या आसपासच्या जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांतील समशीतोष्ण जलवायुमान व कमीअधिक उंचीवरील चराऊ राने यांमुळे तेथे मेंढीपालनाचा धंदा चांगल्या तऱ्हेने होतो. भारतीय मेंढीपासून सरासरीने वर्षाला ०.८ ते ०.९ किग्रॅ. लोकर मिळते.

     

    कोष्टक क्र. १ विदेशी व भारतातील मेंढीची तुलना.

     

    भारतीय मेंढी

    विदेशी मेंढी

    लोकरीचे उत्पादन

    (प्रती वर्ष/ प्रती मेंढी)

    १ – १.५ किग्रॅ.

    ४ – ५ किग्रॅ.

    शरीराचे वजन

    (प्रती मेंढी)

    २० – २५ किग्रॅ

    ४० – ५० किग्रॅ.

    मांसाचे उत्पादन

    (प्रती मेंढी)

    १० – १२ किग्रॅ

    २० – २५ किग्रॅ.

    लोकर विकण्यापासून फायदा

    (प्रती वर्ष/ प्रती मेंढी)

    १० – १५ रु.

    १२० – १२५ रु.

    मांस विकण्यापासून फायदा

    १४० – १७० रु.

    २८० – ३५० रु.

    मेरिनो, रॅम्ब्युलेट यांसारख्या विदेशी जातींच्या मेंढ्यांपासून सरासरीने ५ ते ७ किग्रॅ. लोकर मिळते. द. भारतातील मेंढ्या प्रामुख्याने मांसोत्पादनासाठी पाळल्या जातात. त्यांचे सरासरी वजन ३० किग्रॅ. च्या आसपास असते. विदेशी मांसोत्पादक मेंढ्यांचे याच्या तिप्पट असते. मेंढ्यांपासून मिळणाऱ्या मांसाचे १९८२ मध्ये ६२.४४ लक्ष टन जागतिक उत्पादन झाले व त्यापैकी भारतामध्ये १.२७ लक्ष टन झाले. द. भारतातील या मांसोत्पादक जातींची (नेल्लोर, बन्नूर व दख्खनी) लोकर केसाळ असते; पण त्यांची कातडी जगामध्ये उत्कृष्ट समजली जातात. घट्ट विणीची कणीदार पोत असलेली ही कातडी मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जातात. उत्तम प्रतीची लोकर देणाऱ्या विदेशी मेंढ्यांच्या कातड्याची प्रत चांगली असत नाही. त्यांच्या कातड्यामध्ये अधिक चरबी असल्यामुळे ती विसविशीत व कमजोर असतात.भारता-मधून निर्यात होणाऱ्या मेंढ्यांच्या कातड्यांपैकी ९०% कातडी द. भारतातून निर्यात होतात चर्मोद्योग. जगातील मेंढ्यांच्या कातड्याचे उत्पादन १९८२ मध्ये अंदाजे १३ लाख टन झाले, तर भारतात ३७,००० टन झाले.

    भारतातील मेंढ्यांची संख्या ४.१७ कोटी आहे व त्यादृष्टीने भारताचा क्रमांक सहावा लागतो. उत्पादनाच्या दृष्टीने ह्याच मेंढ्या जगाच्या तुलनेत १.४% आहेत हे जरी सकृतदर्शनी तोकडे वाटले, तरी ही तुलना करताना इतरही गोष्टीचा विचार अवश्य करावयास हवा. सबंध ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्येइतकी असून ऑस्ट्रेलियाचे क्षेत्रफळ भारताच्या तिप्पट आहे. याशिवाय गाय, बैल, म्हशी इ. पशूंची संख्यादेखील तुलनेने खूप कमी आहे. ह्या मर्यादा लक्षात घेता, देशी मेंढ्यांपासून मिळणारे कोष्टक क्र. २ मध्ये दिलेले उत्पन्न लक्षणीय आहे, असे म्हणावे लागेल


    कोष्टक क्र. २ भारतातील एकूण मेंढ्यांची संख्या व त्यांपासून मिळणारे उत्पन्न.

    मेंढ्यांची संख्या

    ४.१७ कोटी

    लोकरीचे उत्पादन

    ३.४५ कोटी किग्रॅ. प्रती वर्ष

    मांसाचे उत्पादन

    १०.०० कोटी किग्रॅ. प्रती वर्ष

    कातड्याचे उत्पादन

    १.५५ कोटी कातडी प्रती वर्ष

    परकीय चलनाची उपलब्धी

    १०८ कोटी रुपये(गालिच्याच्या निर्यातीमुळे)

    मेंढ्यांपासून देशाच्या उत्पादनात पडणारी भर

    १४० कोटी रुपये

    विदेशी मेंढ्यांच्या जाती

    रानटी मेंढ्यांपासून उत्पन्न झालेल्या माणसाळलेल्या मेंढ्यांच्या अनेक जाती जगामध्ये अस्तित्वात आहेत. विविध आनुवंशिक गुणांचे संचय असलेल्या या जातींपासून मानवाची गरज, विशिष्ट पर्यावरणात तग धरून राहण्याची क्षमता, मांस, दूध व लोकर यांबाबतींतील त्यांची उत्पादनक्षमता यांचा अभ्यास करून शास्त्रीय दृष्टीने प्रजनन करून बऱ्याच विदेशी जाती निर्माण केल्या गेल्या आहेत.

    जगामध्ये अशा एकूण २०० च्यावर जाती अस्तित्वात आल्या आहेत. यांतील बऱ्याच स्थानिक दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. सु. ३० विदेशी जाती जागतिक महत्त्वाच्या आहेत. त्यांतील काही प्रसिद्ध जाती, तसेच महत्त्वाच्या भारतीय जातींची माहिती येथे दिली आहे.

    भारतीय मेंढ्यांच्या जाती

    स्थूलमानाने भारतामध्ये मेंढ्यांचे चार प्रकार आढळतात व वर्णनाच्या सोईसाठी भारताचे चार भाग कल्पिले आहेत. हिमालयाच्या आसपासचा, उत्तर, दक्षिण व पूर्व भारत हे ते भाग होत.

    पहिला म्हणजे हिमालयाच्या जवळचा समशीतोष्ण जलवायुमान असलेल्या जम्मू व काश्मीर राज्य, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशातील भाग, पंजाब या राज्यांचा मिळून झालेला भाग. या भागातील मेंढ्यांची लोकर लांब धाग्याची, मऊ व तलमसर आहे. त्यातल्या त्यात उत्तम प्रतीची लोकर व लोकरीखाली अंगालगत असणारी मऊ फर असलेल्या मेंढ्या २,४०० ते ३,६०० मी. उंचीवरील डोंगराळ भागात आढळून येतात. मेंढ्यांची संख्या ५२लाखाच्या आसपास असून त्यांच्यापासून वर्षाला४,५०० टनाच्या आसपास लोकरीचे उत्पादन होते. पूंछ, करनाह, भाकरवाल, भादरवाह व रामपूरबशीर ह्या या भागातील प्रसिद्ध जाती आहेत.

    पूंछ : पूंछ भागात आढळणाऱ्या या जातीच्या मेंढ्या थोराड आणि आखूड कानाच्या असून रंगाने पांढऱ्या असतात. शेपटी आखूड असून तिचा बुंधा जाड असतो. यातील बहुसंख्य मेंढ्यांना शिंगे नसतात. उन्हाळ्यात चराऊ रानामधील गवत खाऊन व हिवाळ्यात बंदिस्त मेंढवाड्यामध्ये खाद्य देऊन त्या वाढविल्या जातात. वर्षातून दोन किंवा तीन कातरणींमध्ये एका मेंढीपासून सरासरीने १.६ किग्रॅ. लोकर मिळते.

    करनाह : काश्मीरमध्ये १,२०० ते ४,६०० मी. उंचीवरील करनाह भागात या जातीच्या मेंढ्या आढळतात व केल हे त्यांचे माहेरघर आहे. या जातीतील मेंढ्यांचे नाक उठावदार असून शिंगे मोठी व वळलेली असतात. वर्षाला दोन कातरणींत ०.९ ते१.३ किग्रॅ. उत्तम प्रतीची तलम पण आखूड धाग्याची लोकर यांच्यापासून मिळते.

    भाकरवाल : काश्मीरमध्ये डोंगराळ भागात व पीर पंजालच्या पर्वतराजीवरील पठारावर या जातीच्या मेंढ्या आढळतात. त्या काटक आणि थोराड असून त्यांचे कळप स्थानांतर करीत काश्मीर दरीमध्ये लिद्दार, पहलगामपर्यंत पोहोचतात. काही उपजातींच्या मेंढ्यांच्या शेपटीवर बरीच चरबी साठलेली असते. यांचे कान लांब, रुंद व लोंबते असून त्यांच्या डोळ्यांच्या व तोंडाच्या भोवती विटकरी रंगाचे वलय असते. वर्षातून एका मेंढीपासून तीन कातरणींमध्ये सरासरीने १.६ किग्रॅ. जाड धाग्याची रंगीत लोकर मिळते. स्थानिक लोक तिचा जाडीभरडी ब्लँकेटे बनविण्यासाठी उपयोग करतात.

    भादरवाह (गद्‌दी) : जम्मूमधील किश्तवार व भद्रवाह भागांत या मेंढ्या आढळतात. या जातीच्या नरांना शिंगे असतात; पण माद्यांना नसतात. यांचा रंग पांढरा असतो व चेहऱ्यावर तपकिरी रंगाचे केस असतात. हिवाळ्यामध्ये यांचे कळप कुलू व कांग्रा खोऱ्यांमध्ये राहतात, तर उन्हाळ्यात पीर पंजालच्या सर्वांत उंच टेकड्यांवर चराईसाठी जातात. वर्षातून तीन कातरणींमध्ये सरासरीने एका मेंढीपासून १.१३किग्रॅ. तलम, तजेलदार लोकर मिळते. यातील काही धारीवाल लोकर गिरणीमध्ये उपयोगात आणली जाते. लोकरीखालील अंगालगतच्या मऊ फरचा उपयोग अधिक किंमतीच्या कुलू शाली व ब्लँकेटे करण्यासाठी होतो.

    रामपूरबशीर : हिमालयाच्या पायथ्याशी सर्व दूर आढळणारी ही मेंढ्यांची प्रसिद्ध जात आहे. या मेंढ्या मध्यम चणीच्या असून त्‌यांची शिंगे मागे वळून पुन्हा खाली वळलेली असतात. कान मोठे असून शेपटी बारीक व आखूड असते. यांचे कळप उन्हाळ्यात तिबेटच्या सीमेपर्यंत चरत जातात व पुन्हा यमुना, टॉन्स व सतलज दरीतील शिवालिक टेकड्यांमध्ये परततात. डेहराडून जिल्ह्याच्या चक्राता भागात या जातीच्या मेंढ्यांचे काही प्रकार आढळतात. प्रत्येक मेंढीपासून वर्षाला १.३६ ते १.८ किग्रॅ. चांगल्या प्रतीची लोकर मिळते. तिबेटच्या सीमेवर शेळ्यांबरोबर या मेंढ्या सामानाची ने-आण करण्यासाठी वापरतात.

    राजस्थान, गुजरात, पंजाब व उत्तर प्रदेशाचा सपाटीचा भाग व मध्य प्रदेशाचा लगतचा भाग धरून कल्पिलेल्या उत्तर विभागातील मेंढ्यांची संख्या१.२३कोटीच्या आसपास आहे आणि त्यांच्यापासून अदमासे भारतातील लोकरीच्या उत्पादनाच्या ६३% (२०,२०० टन) लोकर मिळते. गालिचे बनविण्यासाठी ही उपयुक्त असून तीतील ११-१२ हजार टन निर्यात केली जाते. या भागातील कोरडी हवा, हिवाळ्यातील थंडी, अपुरी चराऊ राने व मधूनमधून उद्‌भवणारी दुष्काळी परिस्थिती यांना समर्थपणे तोंड देऊ शकणाऱ्या चार प्रमुख जाती या भागात आढळतात.

    लोही : डोक्याचा तपकिरी रंग, उठावदार उंचावलेले नाकाचे हाड (रोमन नोज), मऊ व लांबसडक कान ही या जातीची वैशिष्टये आहेत. यांच्या चेहऱ्यावर लोकर नसते. ल्यालपूर, झांग व मंगमरी या पाकिस्तानातील जिल्ह्यांत या जातीच्या जातिवंतर मेंढ्या आढळतात. तथापि या जातीतील काही प्रकार राजस्थान व गुजरातमध्ये आहेत. लोकर, मांस व दूध या तीनही प्रकारचे उत्पादन या जातीच्या मेंढ्यांपासून मिळते. प्रत्येक मेंढीपासून वर्षाला १.८ किग्रॅ. जाड, लांब धाग्याची लोकर व दररोज ३.६ लिटरपर्यंत दूध मिळू शकते. राजस्थानमध्ये या जातीच्या मेंढ्यांच्या उपजातींना निरनिराळी नावे आहेत. जोधपूर व जैसलमीर जिल्ह्यांत जैसलमीरी; जयपूर, टोंक व सवाईमाधवपूर जिल्ह्यांत मालपुरी; उदयपूर जिल्ह्यांत सोनाडी अशी नावे आहेत; तर गुजरातमधील बडोदे जिल्ह्यात या मेंढ्या चारोथ्री या नावाने ओळखल्या जातात.

    बिकानेरी : पूर्वीच्या बिकानेर संस्थानातील भाग व त्या लगतच्या उ. प्रदेश, पंजाब आणि राजस्थानमधील भागात या जातीच्या मेंढ्या प्रामुख्याने आढळतात. या मेंढ्या मध्यम चणीच्या असून त्यांचे डोके लहान असते व कान सुरळीसारखे असतात. भारतातील सर्वांत जास्त प्रमाणात लोकर देणारी ही मेंढ्यांची जात आहे. प्रत्येक मेंढीपासून वर्षाला १.८ ते ४ किग्रॅ. लोकर मिळते. माग्रा, चोकला किंवा शेरबवटी व नाली या उपजातीही या भागात आढळतात. चोकला या राजस्थानमधील उपजातीपासून चांगल्या प्रतीची गालिचे करण्याला उपयुक्त लोकर मिळते.

    मारवाडी : या जातीच्या मेंढ्यांपासून पांढरी, केसमिश्रित, जाडीभरडी गालिच्याची लोकर मिळते. काळ्या रंगाचा चेहरा, लांब पाय व उठावदार नाक ही या जातीची वैशिष्टये आहेत. या मेंढ्यांना गळ्याखाली गलूली आढळतात. जोधपूर व जयपूर भागांत या मेढ्या आढळत असल्या, तरी भटक्या जातींनी पाळलेले या जातीच्या मेंढ्यांचे कळप उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसेच उत्तर महाराष्ट्रात दूरवर येतात. प्रत्येक मेंढीपासून वर्षाला ०.९ ते १.८ किग्रॅ. लोकर मिळते.

    कच्छी : उत्तर गुजरात व सौराष्ट्राच्या वाळवंटी प्रदेशात या जातीच्या मेंढ्या आढळतात. काळसर बदामी रंगाच्या या मेंढ्या चणीने लहान पण बांधेसूद असतात. यामुळे त्यांच्यापासून बऱ्यापैकी मांस उपलब्ध होते. विविध प्रकारची लोकर या जातीच्या मेंढ्यांपासून मिळते व तिचा उपयोग लष्करामध्ये लागणाऱ्या फेल्टच्या कपड्यासाठी करतात.

    काठेवाडी : काठेवाड व त्याच्या लगतचा कच्छचा भाग, दक्षिण-राजस्थान व उत्तर गुजरात व भागांतील मेंढ्यांची ही जात आहे. मेंढ्या मध्यम बांध्याच्या, पांढऱ्या रंगाच्या पण चेहरा व पाय यांवर काळे अगर तपकिरी रंगाचे केस असतात. सरासरीने प्रत्येक मेंढीपासून वर्षाला दीड किग्रॅ. जाड व लांब धाग्याची लोकर मिळते.

    महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू व केरळ या राज्यांच्या मिळून कल्पिलेल्या दक्षिण भागात २.२६ कोटी मेंढ्या आहेत. यांतील पूर्वेकडील भागातील १.०२ कोटी मेंढ्यांपासून जवळ जवळअजिबात लोकर मिळत नाही, त्या मांसोत्पादनासाठी पाळल्या जातात. उरलेल्या मेंढ्यांपासून १०,७००टन जाडीभरडी करड्या रंगाची लोकर मिळते. दख्खनी व नेल्लोर या प्रमुख जाती या भागांत आढळतात.

    दख्खनी : राजस्थानातील लोकर देणाऱ्या मेंढ्या आणि आंध्र प्रदेश व तमिळनाडूमधील केसाळ मेंढ्या यांच्या संकरापासून ही मेंढ्यांची जात निपजलेली आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात व कर्नाटक राज्याच्या काही भागांत या मेंढ्या आढळतात. प्रत्येक मेंढीपासून वर्षाला सरासरीने ४५० ग्रॅ. लोकर मिळते व ती काळ्या व करड्या रंगाची आणि केसाळ असते. तिचा कांबळी करण्यासाठी उपयोग करतात. या मेंढ्या मुख्यत्वे मांसासाठी पाळल्या जातात. निकृष्ट चराऊ रानावर या मेंढ्या आपली उपजीविका करू शकतात.

    नेल्लोर : या जातीच्या मेंढ्या भारतातील सर्वात उंच मेंढ्या आहेत. लांबोळा चेहरा, लांब कान व सर्वांगावर दाट पण आखूड केस यामुळे या शेळीसारख्या दिसतात. नराला पीळदार शिंगे असतात, तर मादीच्या डोक्याला मध्यभागी उंचवटा असतो. यांचा रंग पिवळट तांबूस हरिणासारखा असून शेपटी आखूड असते. शेपटीच्या टोकला केसांचा झुबका असतो. सामान्यपणे जंगली भाग, नद्यांची पात्रे, डोंगरांचे उतार व पीक काढलेली शेते या ठिकाणी मिळेल त्या खाद्यावर या मेंढ्या आपली उपजीविका करू शकतात. मंड्या, यलाग व तेंगुरी हे या जातीच्या मेंढ्यांचे प्रकार आहेत. या मेंढ्यांपासून जवळ जवळ काहीही मिळत नाही. मात्र मांसोत्पादनासाठी या जाती प्रसिद्ध आहेत. बन्नूर ही कर्नाटकातील आणखी एक जात मांसाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

    बिहार, ओरिसा व पश्चिम बंगाल या राज्यांचा मिळून कल्पिलेल्या पूर्व विभागामध्ये मेंढीपालनाचा धंदा फारसा केला जात नाही. येथील हवेमध्ये आर्द्रता व उष्णता, तसेच पावसाचे मानही बरेच असल्यामुळे या भागात मेंढ्यांच्या नाव घेण्यासारख्या जाती नाहीत. या भागातील मेंढ्यांची संख्या ३०लाख असून त्यांच्यापासून ९०,६०० किग्रॅ. जाडीभरडी लोकर मिळते. तिचा उपयोग प्रायः कांबळी बनविण्यासाठी करतात. प्रत्येक मेंढीपासून सरासरीने११० ते २२५ग्रॅ. लोकर मिळते.

    विदेशी मेंढ्यांच्या जाती

    मेरिना : ही मूळची स्पेनमधील जात असून अतिशय तलम लोकरीच्या उत्पादनासाठी जगप्रसिद्ध आहे. बाराव्या शतकापासून ही जात अस्तित्वात आहे. मूर लोकांनी ती स्पेनमध्ये आयात केली असावी. समशीतोष्ण जलवायुमान असलेल्या रुक्ष प्रदेशात स्थानांतर करीत जगण्याची क्षमता या जातीच्या मेंढ्यांच्या अंगी असल्यामुळे जगातील कित्येक देशांमध्ये या जातीचा प्रसार झाला आहे. त्या त्या देशात या जातीच्या मेंढ्यांचे अनेक विभेद निर्माण झाले. उदा., ऑस्ट्रेलियन मेरिनो, रशियन मेरिनो,अमेरिकन मेरिनो इत्यादी. या जातींच्या नरांना शिंगे असतात, माद्यांना ती नसतात. डोके व पाय यांवरही भरपूर व दाट लोकर असते. या मेंढ्या शुभ्र पांढऱ्या रंगाच्या असून त्यांच्या लोकरीचे धागे बारीक व लवचिक असतात. कातड्यातील तैल ग्रंथीमधून पुष्कळ चरबी या धाग्यामध्ये मिसळली गेल्यामुळे लोकर कुरळी, मऊ, तलम व तजेलदार असते. वरच्या बाजूच्या चरबीवर धूळ साचून एक काळपट आवरण तयार होते व त्यामुळे आतील स्वच्छ पांढरी लोकर आयतीच सुरक्षित राहते. मानेवर जाडजूड वळ्या असलेल्या नेग्रेटी मेरिनो या मेंढ्यांपासून एकोणिसाव्या शतकामध्ये इंग्लिश मेरिनो ही जात इंग्लंडमध्ये तयार करण्यात आली. एका मेंढीपासून वर्षाला ५ ते ७ किग्रॅ. लोकर मिळते. या जातीच्या मेंढ्यांच्या संकरापासून निपजलेल्या प्रजेची लोकरही उत्कृष्ट दर्जाची असते.

    रॅम्ब्युलेट : फ्रान्सच्या सोळाव्या लूई या राजाच्या रॅम्ब्युलेट येथील मेंढवाड्यावर स्पेनमधून १७८६ मध्ये व पुन्हा १७९९ मध्ये निवडक मेरिनो जातीच्या मेंढ्या आयात केल्या गेल्या. या मेंढ्यांपासून हिची पैदास करण्यात आली. या मेंढ्यांच्या अंगावर दाट, तलम लोकर भरपूर असते. चेहरा व पाय यांचा रंग पांढरा असून चेहऱ्यावर पुष्कळ लोकर इतकी असते की, त्यामुळे काही मेंढ्यांना आंधळेपणा येण्याचा संभव निर्माण होतो. नराला शिंगे व डोक्यावर मध्यभागी उंचवटा असतो; माद्यांना फक्त उंचवटा असतो. या जातीच्या मेंढ्यांच्या लाकरीबरोबरच त्यांचे मांसोत्पादन वाढविण्याचे प्रयत्न जर्मन मेंढपाळांनी केले. उत्तर अमेरिकेत या जातीच्या मेंढ्या १८४० मध्ये प्रथमतः आयात केल्या गेल्या व पश्चिम किनाऱ्यावरील प्रांतात निवड पद्धतीने प्रजनन करून त्यांचे संगोपन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले.

    चेव्हिऑट : मध्यम प्रतीची लोकर उत्पादन करणाऱ्या ह्या मेंढ्यांच्या जातीची स्कॉटलंडमध्ये पैदास करण्यात आली. यांच्या चेहऱ्याचा रंग पांढरा असून डोके, कान आणि पायावर कोपराखाली व ढोपराखाली लोकर नसते, त्यामुळे त्या डौलदार दिसतात. प्रत्येक मेंढीपासून वर्षाला २.५ ते ३.५ किग्रॅ. लोकर मिळते. लिंकन जातीच्या मेंढ्यांशी संकर प्रजनन करून मांसोत्पादनासाठी संकरित प्रजा उपयोगात आणतात.

    साऊथ डाऊन : इंग्लंडमध्ये सर्वप्रथम अस्तित्वात आलेली ससेक्स टेकड्यांतील ही मेंढ्यांची जात बांध्याने लहान आहे. त्यांच्या चेहऱ्याचा रंग फिकट तपकिरी असून त्यांना शिंगे नसतात. एका मेंढीपासून वर्षाला २ ते ३ किग्रॅ. उत्कृष्ट प्रतीची पांढरी पण आखूड धाग्याची लोकर मिळते.

    इंग्लिश लायस्टर : रॉबर्ट बेकवेल या शास्त्रज्ञांनी१७५५ मध्ये स्थानिक मेंढ्यांपासून निवड पद्धतीने प्रजनन करून ह्या जातीची इंग्लंडमध्ये पैदास केली. चेहरा व पाय यांवर लोकर नसते. सर्वांगावर पिळ्यासारखी झुबकेदार लोकर असते. ही लोकर जाड व लांब धाग्याची असते.

    रोमनी मार्श : जाड व लांब धाग्याची लोकर देणाऱ्या इंग्लंडमधील केंट परगण्यातील मेंढ्यांची ही जात आहे. या मेंढ्या काटक असून त्यांच्या अंगावर दाट लोकर असते. द. अमेरिका, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या प्रदेशांत या जातीच्या मेंढ्या मोठ्या प्रमाणावर पाळतात. नर व मादी यांच्या डोक्यावर मध्यभागी उंचवटा असतो.

    कॉरिडेल : मध्यम प्रतीची लोकर देणाऱ्या मेंढ्यांच्या ह्या जातीची पैदास न्यूझीलंडमध्ये लिंकन जातीचे मेंढे व मेरिनो जातीच्या मेंढ्या यांच्या संकर प्रजननाने करण्यात आली. या जातीच्या मेंढ्यांचा चेहरा पांढरा असून त्यांना शिंगे नसतात. या मेंढ्या मध्यम चणीच्या असून लोकर व मांस यांसाठी न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व अमेरिकेमध्ये पाळण्यात येतात. लिंकन व मेरिनो यांच्याच संकरातून ऑस्ट्रेलियामध्ये (व्हिक्टोरिया) १८८० च्या सुमारास तयार करण्यात आलेली दुसरी

    जात म्हणजे पोलवर्थ ही आहे. या मेंढ्या थोराड असून ऑस्ट्रेलियाच्या अतिथंड व जास्त पाऊस असलेल्या भागात पाळल्या जातात.

    लिंकन : लांब पण जाड धाग्याची लोकर देणाऱ्या मेंढ्यांची ही जात इंग्लंडमधील स्थानिक जात आहे. या जातीच्या मेंढ्यांना शिंगे नसतात; पण डोक्यावर मध्यभागी लोकरीचा झुबका असतो. अंगावरही झुबकेदार लोकर असते. ही जात मांसोत्पादनासाठी प्रसिद्ध असली, तरी प्रत्येक मेंढीपासून ५ ते७ किग्रॅ. लोकर मिळते.

    काराकुल : मध्य आशियातील उझबेकिस्तान व अफगाणिस्तान येथील ही मूळची मेंढ्यांची जात आहे. उत्कृष्ट मऊ तजेलदार फरबद्दल ही जात प्रसिद्ध आहे. नवजात कोकराचा रंग काळा असतो. एक ते तीन दिवसांची कोकरे मारून त्यांची कातडी फर धंद्यासाठी विकली जातात. पर्शियन लँबस्किन म्हणून ही प्रसिद्ध आहेत. रशिया, आफ्रिका व अमेरिका या प्रदेशांमध्ये काराकुल मेंढ्या कोकरांच्या कुरळ्या फरकरिता पाळण्यात येतात. रशियामधून या जातीच्या शुद्ध बीजाच्या मेंढ्यांची आयात भारतामध्ये अलीकडे करण्यात आली आहे. राजस्थानमधील थर वाळवंटाच्या प्रदेशात लोकरीसाठी त्यांची पैदास सुरू करण्यात आली आहे. तेथील जलवायुमान या मेंढ्यांना अनुकूल असल्यामुळे हे पैदाशीचे प्रयत्न यशस्वी हात असल्याचे दिसून आले. मौल्यवान लँबस्किन खेरीज प्रत्येक मेंढीपासून वर्षाला ३ ते ३.५ किग्रॅ. लोकर, तसेच २० ते 25 किग्रॅ. मांस मिळू शकते. मात्र अद्याप फर कातडीच्या उत्पादनाकडे लक्ष देण्यात आलेले नाही [→फर-२]. यांशिवाय पेलविन, सेव्हलिव्हो, स्टारा झागॉरा या बल्गेरियातील मेंढ्यांच्या जाती मुख्यत्वे दुग्धोत्पादनासाठी पाळल्या जातात.

    मेंढ्‌यांची सुधारणा

    विविध जननिक गुणधर्म समुच्चय (आनुवंशिकतेतून येणारे गुणधर्म) असलेल्या अनेक जातींच्या मेंढ्या जगामध्ये अस्तित्वात असताना स्ववंशीय संयोग अगर अंतःप्रजनन (निकटचा संबंध किवा जवळचे नाते असलेल्या प्राण्यांच्या लैंगिक संबंधातून होणारे प्रजोत्पादन) या पद्धतींचा उपयोग करून आपले कळप सुधारण्याचा फारसा प्रयत्न पूर्वीच्या मेंढपाळांनी केल्याचे दिसून येत नाही. विसाव्या शतकामध्ये मात्र यांचा, तसेच निवड पद्धतीचे आडाखे व संततीची कार्यक्षमता यांचा अभ्यास करून मेंढ्यांच्या सुधारित जाती निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. तशातच ⇨कृत्रिम वीर्यसेचन व मेंढ्यांना माजावर आणण्यासाठी स्टेरॉइड औषधांचा उपयोग होऊ लागल्यामुळे प्रजननाचे तंत्रच बदलून गेल्याचे दिसते. आनुवंशिक गुणधर्म प्रदान करण्यात मादीपेक्षा नराचा वाटा अधिक असतो, असेही निदर्शनास आले. याचा फायदा घेऊन मध्यपूर्वेकडील व भारतातील स्थानिक मेंढ्यांशी संयोग करण्यासाठी मेरिनो नरांचा वापर करून निर्माण झालेल्या संकरित प्रजेच्या लोकरीची प्रत व उत्पादन वाढविण्यात बरेच यश आलेले दिसते. निवड पद्धत वापरून प्रजनन केल्यावर काराकुल जातीच्या मेंढ्यांच्या फरच्या कुरळेपणाची लांबी कमी करण्यात यश आले. मेंढ्यांचे वजन व त्यांच्या अंगावरील त्वचेच्या वळ्या यांचा मांसाची प्रत व उत्पादन आणि लोकरीच्या धाग्यांची लांबी यांच्याशी संबंध आहे, असे निदर्शनास आले आहे. या व अशा अनेक संशोधनात्मक निष्कर्षाचा इष्ट परिणाम होऊन मेंढ्यांच्या कित्येक जातींमध्ये लोकरीची प्रत व उत्पादन आणि मांसोत्पादन यांमध्ये लक्षणीय प्रगती करता आलेली आहे. या अनुषंगाने मेंढ्यांचे खाद्य, संगोपन इ. अनेक बाबींकडेही लक्ष पुरविण्यात आले. अमेरिकेमध्ये डबॉइस, आयडा आणि फोर्ट विंगेट येथे, तसेच इतर देशांमध्येही संशोधन केंद्रे काढण्यात आली आहेत.

    भारतामध्ये मेंढ्यांच्या लोकरीची प्रत व उत्पादन यांत सुधारणा करण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियन मेरिनो, अमेरिकन रॅम्ब्युलेट, रशियातील स्टॅव्हरोपोलेस्की, पोलवर्थ व काराकुल इ. विदेशी जातींचे नर आयात करून शासकीय पातळीवर प्रयत्न चालू आहेत. काश्मीरमध्ये बनिहाल व दाचिगाव, हिमाचल प्रदेशामध्ये सरहान, उत्तर प्रदेशात पिंपळकोटी, राजस्थानमध्ये जयपूरजवळ अवकिनगर व तमिळनाडूमध्ये उटकमंड येथील संशोधन केंद्रांमध्ये असे प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्रामध्ये पुणे येथे मेरिनो व रॅम्ब्युलेट महूद आणि रांजणी येथे कॉरिडेल या जातींच्या मेंढ्या आयात करून दख्खनी मेंढ्यांशी संकर प्रजननाने नवीन विभेद निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. यांशिवाय हिस्सार येथे १९६९मध्ये आणि अगदी अलीकडे ममिडीपल्ली (आंध्र प्रदेश), चल्लाकेरी (कर्नाटक), डकसम (जम्मू व काश्मीर), भैंसोरा (उत्तर प्रदेश) व फतेपूर (राजस्थान) येथे केंद्र शासनाच्या मदतीने मेंढ्यांची मोठ्या प्रमाणावर पैदास केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. ह्या ठिकाणी आयात केलेल्या विदेशी नरांचा स्थानिक मेंढ्यांशी संकर करण्यात येतो. येणाऱ्या संकरित प्रजेचे वाटप शेतकऱ्यांत केले जाते.

    मेंढ्यांच्या मांसल जातींची उत्पादनक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने दक्षिण भारतातील मंड्या व नेल्लोर आणि उत्तर भारतातील बिकानेरी, नाली व लोही या मांसल जातींमध्ये संकर प्रजननाचे तसेच साऊथ डाऊन, रोमनी मार्श, कॉरिडेल आणि डॉर्सेट डाऊन या विदेशी मांसल मेंढयांच्या जातींचा मंड्या, नेल्लोर व बिकानेरी या भारतीय जातींच्या मेंढ्यांबरोबर संकर प्रजननाचे नवे विभेद तयार करण्याचे प्रयत्न चालू आहे.

    संगोपन

     

    मेंढ्यांच्या संगोपनाच्या पद्धती देशकाल परिस्थिती, मेंढ्यांची संख्या, जलवायुमान, चराऊ रानांची उपलब्धता यांवर अवलंबून असतात. चराऊ रानातील खुरटे गवत, लहान लुसलुशीत रसाळ तण, वाळवंटी प्रदेशात उपलब्ध होणाऱ्या कोवळ्या वनस्पती, डोंगर पठारावरील व पर्वतराजींचया उतारावर उगवणारे उंच न वाढणारे गवत, बाभळीच्या जातीच्या झाडांच्या शेंगा यांवर मेंढ्या आपली उपजीविका चांगल्या तऱ्हेने करू शकतात. त्यांच्या खाद्यात १० ते १५% प्रथिनांची जरूरी असते व ती अशा चाऱ्यामधून मिळते. प्रजननासाठी व मांसोत्पादनासाठी वापरात आणावयाच्या मेंढ्यांव्यतिरिक्त इतरांना नेहमीकरिता खुराक देण्याची जरूरी नसते. मेंढ्यांच्या खुराकाला भरडा म्हणतात. मका, हरभरा, ज्वारी ही भरडलेली धान्ये, गव्हाचा भुस्सा, भुईमुगाची पेंड यांतील उपलब्ध खाद्यपदार्थ योग्य प्रमाणात मिसळून भरडा तयार करतात. मांसोत्पादनासाठी पाळलेल्या कोकरांना मेंढीला पिणे बंद झाल्यावर भरडा सुरू करतात. धान्य २ भाग, गव्हाचा भुस्सा१ भाग, पेंड १ भाग यांचे मिश्रण १०० ते ४५० ग्रॅ. वयाप्रमाणे देतात. कोकराला रोज ५ ते ७ ग्रॅ. मीठ देण्याची जरूरी असते. गाभण मेंढीला रोजी २०० ते २५० ग्रॅ. भरडा गर्भपोषणासाठी देणे जरूर आहे. प्रजननासाठी वापरल्या जाणाऱ्या मेंढ्यांस रोजी २०० ते ४५० ग्रॅ. भरडा देतात. कॅल्शियम, फॉस्फरस, आयोडीन, तांबे व कोबाल्ट या खनिज द्रव्यांची जरूरी असते व चाऱ्यातून ही उपलब्ध होतात. खाद्यामध्ये अस्थिपिष्टाचा समावेश केल्यास काही खनिजे उपलब्ध होऊ शकतात. मेढ्यांना अ, ड, ई या जीवनसत्त्वांची जरूरी असते व काही वेळा ती खाद्यातून पुरवावी लागतात. ‘अ’ जीवनसत्त्व हिरव्या चाऱ्यातून व ‘ड’ जीवनसत्त्व सूर्यप्रकाशातून मिळते. ब व क जीवनसत्त्वे मेंढ्या आपल्या शरीरात तयार करू शकतात. एका मेंढीला रोज ७ लिटर पाणी लागते. चरण्याच्या जागेपासून पाणी पिण्यासाठी त्यांना हिवाळ्यात ४ ते ५ किमी. व उन्हाळ्यात ३किमी.पेक्षा जास्त चालावे लागू नये, अशी व्यवस्था असणे जरूर असते. बर्फ व अती पाऊस असलेल्या किंवा कडक थंडीच्या प्रदेशातून तात्पुरते स्थलांतर करून मेंढ्यांचे कळप फिरते ठेवून त्यांचे पोषण करणे ही बऱ्याच देशांमधून रूढ असलेली संगोपन पद्धती आहे.

    कोकरू जन्मल्यावर मेंढीने त्याला चाटल्यावर ते कोरडे होऊन १ ते २ तासांत उठून मेंढीला पिऊ लागते. व्याल्यानंतर २ ते ४ तासांमध्ये वार टाकली जाते. कोकराला चीक पिऊ देणे आवश्यक असते. मेंढीमध्ये मातृभाव कमी असतो त्यामुळे मेंढपाळाला कोकराची काळजी घेणे आवश्यक असते. मेंढी नीट पाजते किंवा नाही याकडे लक्ष पुरवावे लागते. कोकरू ४ ते ४.५ महिन्यांचे होईपर्यंत मेंढीला पिते. जरी २ ते ३ आठवड्यांचे झाल्यावर चरण्याला सुरुवात केली, तरी ५ ते ८ आठवड्यांचे होईपर्यंत ते फारसे खाद्य खाऊ शकत नाही. याच वेळी त्याची लोकर कातरण्याइतकी लांब होते. पहिल्या कातरणीच्या लोकरीला जावळी लोकर म्हणतात. यापुढे वर्षातून एकदा, दोनदा व काही जातींमध्ये तीन वेळा कातरणी करतात. हात कातरणीने एक मनुष्य एका दिवसात ४० ते ६० मेंढ्यांची लोकर कातरू शकतो, तर यांत्रिक कात्रीने तो २०० ते २५० मेंढ्यांची लोकर कातरतो.

    अलीकडे ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांना उंदराच्या लाळ ग्रंथीमधून बाह्यत्वचा वृद्धिकारक प्रथिनाचे नि:सारण करून त्याचे मेंढीला अंतःक्षेपण (इंजेक्शन) केल्यावर लोकर गळून नुसत्या हाताने ओढून ती पूर्णपणे काढता येते, असे दिसून आले आहे. जैव कातरण पद्धती अद्याप प्रयोगावस्थेत आहे.

    मोठ्या प्रमाणावर मेंढ्या पाळणाऱ्या काही पुढारलेल्या देशांतही मेंढ्या उघड्यावरच राहतात. अती थंडीवाऱ्यापासून संरक्षण होइल एवढाच निवारा केव्हा केव्हा उपलब्ध करून देतात. शीत कटिबंधात मात्र हिवाळ्यातील कड थंडीपासून बचाव होण्यासाठी बंदिस्त मेंढवाडे उभारतात व तिथेच आधी साठविलेले वाळलेले गवत व मुरघास यांवर त्यांचे पोषण करतात. अगदी अलीकडे कडक हिवाळ्यात भाजीपाला उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या पॉलिथिनाच्या पादपगृहाच्या (तापमान व हवेतील आर्द्रता यांचे नियंत्रण करणाऱ्या रचनेच्या) धर्तीवर बोगद्याच्या आकाराची पॉलिथिनाची घरे मेंढ्यांसाठी बनविण्यात आली आहेत.

    भारतामध्ये मेंढी पालनाचा धंदा बहुतांशी भटक्या जमातींचे धनगर लोक करतात. ते सर्वसाधारणपणे ४० ते ६० मेंढ्यांचे कळप पाळतात. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या थंड व डोंगराळ प्रदेशातील मेंढपाल उन्हाळ्यात आपल्या मेंढ्या हिमालयातील २,५०० ते ४,००० मी. उंचीवरील शिखरपठारावर चराईसाठी नेतात. बर्फ जसजसा वितळतो तसतसा तेथील जमिनीवर चांगला पौष्टिक चारा उगवतो. हिवाळ्यात सपाटीवरील प्रदेशात परतून तेथील चराऊ रानावर मेंढ्यांची उपजीविका करतात. सपाट प्रदेशातील मेंढपाळ शेतामध्ये पिके असतात त्या वेळी जवळपासच्या डोंगरावरील खुरटे गवत व तण यांवर आपल्या मेंढ्या पोसतात. पिके निघाल्यावर शेतातील उरलेसुरले खुंट, तण व गवत खाण्यासाठी शेतातून मेंढ्यांचा मुक्काम करीत फिरत राहतात. शेतात मुक्काम असतो तेव्हा तेथे लेंडीखत आपोआप पडते. यालात शेतात ‘मेंढ्या बसविणे’ असे म्हणतात. महाराष्ट्रात ही प्रथा सर्वत्र आढळते व याबद्दल मेंढपाळांना मोबदला मिळतो. मेंढ्या पाळणाऱ्या भटक्या जमातीच्या धनगर लोकांना या धंद्याच्या विकासासाठी साहाय्य देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने मेष विकास महामंडळ १९७९ मध्ये स्थापन केले आहे.

    प्रजनन

    विदेशी मेंढ्यांच्या बाबतीत त्यांचे वयात येणे त्या त्या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या मेंढ्यांच्या सरासरी वजनाच्या ४० ते ६०% वजन होण्यावर अवलंबून आहे, वयाशी त्याचा संबंध फारसा नसावा; पण सर्वसाधारणपणे या मेंढ्या ५ ते १० महिन्यांच्या झाल्यावर वयात येतात. प्रथम माजावर येतात. तथापि मेंढी २ वर्षांची झाल्यावर व मेंढा १८ ते २० महिन्यांचा झाल्यावरच प्रजननासाठी वापरतात.

    मेंढ्यांचे प्रजनन मोसमी असते. मोसमाच्या सुरुवातीच्या दिवसांत कळपामध्ये वळू मेंढा सोडल्यास व दोन आठवडे आधी मेंढ्यांच्या खाण्यामध्ये खुराक सुरू केल्यास त्या लवकर माजावर येतात. याला इंग्रजीमध्ये ‘फ्लशिंग’ म्हणतात. फ्लशिंगसाठी २०० ते २५० ग्रॅ. मका, जव व ज्वारी यांपैकी एक धान्य दिल्यास चालते. याशिवाय प्रगत देशांमध्ये प्रोजेस्टेरॉनासारख्या स्टेरॉइड औषधांचा वापर करून मेंढ्यांना विशिष्ट वेळी माजावर आणण्यात येते व कृत्रिम वीर्यसेचन पद्धतीने अनेक मेंढ्या एकाच वेळी गाभण राहतील अशी व्यवस्था करतात. यामुळे एकाच वयाच्या कोकरांचे मोठाले कळप तयार झाल्याकारणाने त्यांचे संगोपन व व्यवस्थापन सोईचे आणि किफायतशीर होते. प्रजननासाठी उपयोगात आणावयाच्या माद्यांना भरपूर दूध असणे हे कोकरांचे पोषण होण्याच्या दृष्टीने जरूरीचे असते. भारतामध्ये मेंढ्या माजावर येण्याचे तीन मोसम आहेत. उन्हाळ्याच्या शेवटी पावसाळ्याच्या सुरुवातीस (जून-जुलै) ६० ते ८०%, उन्हाळ्यात (मार्च-एप्रिल) १५ ते २०% आणि हिवाळ्यात (ऑक्टोबर-नोव्हेंबर) उरलेल्या माद्या माजावर येतात. पावसाळ्याच्या सुरुवातीलस माजावर आलेल्या मेंढ्या गाभण राहून ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये वितात. या वेळी माद्यांना चराऊ रानात भरपूर चारा उपलब्ध असल्याने दूध भरपूर येऊन कोकरांचे पोषण चांगले होते.

    मेंढीचा ऋतुकाल २० ते ४० तास (सरासरीने ३० तास) राहतो. ऋतुकालाच्या अखेरीला अंडमोचन (अंडपुटक फुटून त्यातील पक्व अंडे बाहेर पडण्याची क्रिया) होते. ऋतुमान १७ ते १९ दिवसांचे असते व गर्भावधी १४२ ते १५२ दिवसांचा असतो. बहुधा एका वेळी एकच कोकरू जन्मते; परंतु काही जातींत जुळी व क्वचित तिळी होऊ शकतात. पाच ते सहा कोकरे जन्मल्याची नोंद आहे. कॉमनवेल्थ सांयटिफिक अँड इंडिस्ट्रियल रिसर्च या संस्थेमध्ये झालेल्या संशोधनातून ‘फेकंडीन’ नावाचे रसायन शोधून काढण्यात आले आहे. याचे अंतःक्षेपण केल्यास अंडमोचनाच्या वेळी अनेक अंड्यांचे मोचन होऊन जुळी होण्याचे प्रमाण वाढून २०% अधिक कोकरांची पैदास झाल्याचे दिसून आले आहे. विण्याच्या वेळी मेंढ्यांना निवारा व आडोसा देणे जरूरीचे असते. सहसा मेंढपाळाने मदत करण्याची जरूरी पडत नाही. व्याल्यानंतर एक ते दोन दिवसांत मेंढी पुन्हा माजावर येते; पण यावेळी अंडमोचन होत नाही. माजावर आलेली मेंढी मेंढ्याच्या मदतीशिवाय ओळखणे कठीण असते. मेंढा कळपात सोडल्यावर वासामुळे तो ती ओळखू शकतो. कृत्रिम वीर्यसेचन पद्धतीमध्ये मेंढ्याच्या साहाय्यानेच माजावर आलेली मेंढी ओळखून वीर्यसेचन करण्यात येते. ऑस्ट्रेलिया, रशिया, इंग्लंड इ. पुढारलेल्या देशांत कृत्रिम वीर्यसेचन पद्धत मोठ्या प्रमाणावर अवलंबिली जाते. भारतामध्ये मेंढ्यांच्या बाबतीत ही पद्धत अद्याप काही प्रस्थापित प्रजनन केंद्रापुरतीच मर्यादित आहे; तथापि हळूहळू या पद्धतीचा प्रसार होऊ लागला आहे. नैसर्गिक पद्धतीमध्ये एक मेंढा ३० ते ४० माद्यांसाठी पाळण्याची पद्धत आहे. मेंढा प्रजननक्षम आहे किंवा नाही हे ओळखणे सोपे नाही. यासाठी त्याने संयोग केलेल्या माद्यांवर लक्ष ठेवूनच ते समजू शकते. मोठ्या कळपामध्ये कोणत्या मेंढ्याने कोणत्या मेंढीशी संयोग केला हे समजण्यासाठी मेंढ्याच्या छातीच्या पुढील भागास ओला रंग लावतात. मेंढा दर दिवशी ५.५ अब्ज शुक्राणूंचे उत्पादन करू शकतो. त्यांच्या संयोगक्षमतेमध्ये बराच फरक आढळून येतो. काही मेंढे १० तासांहून एकदा संयोग करू शकतात, तर काही प्रत्येक तासाला करू शकतात. चांगल्या प्रतीच्या रेताच्या प्रत्येक मिलि. मध्ये २ अब्ज शुक्राणू असतात.

    अलीकडे बनविलेल्या श्राव्यातील उपकरणाने [→श्राव्यातील ध्वनिकी] मेंढी गाभण आहे किंवा नाही हे तपासाण्याची सोय झाली आहे. या उपकरणाच्या साहाय्याने ६० दिवसांची गाभण मेंढी १००% अचूक ओळखता येते. तसेच ⇨हॉर्मोनांच्यासाहाय्याने गर्भारपणाचे निदान करण्याची पद्धत व्यवहारामध्ये येत आहे आणि यामध्ये १८ दिवसांची गाभण मेंढी ओळखता येते.

    जननिक अभियांत्रिकीतील [→रेणवीय जीवविज्ञान] कौशल्याचा वापर करून अगदी अलीकडे भ्रूण हाताळण्याचे तंत्र साध्य केले गेले आहे. जर्मन प्रजासत्ताक संघ राज्यातील गीसेन विद्यापीठामध्ये माइनेके टिलमन या स्त्री पशुवैद्यांनी अतिसूक्ष्म शस्त्रक्रियेने शेळीच्या निषेचित (फलित) अंड्यामधील कोशिकांची (पेशीची) मेंढीच्या निषेचित अंड्यातील कोशिकांशी जुळणी करून त्या भ्रूणाचे एका मेरिना मेंढीच्या गर्भाशयात प्रतिरोपण केले. गर्भाची पूर्ण वाढ होऊन मेंढीप्रमाणे शिंगे व हनुवटीखाली शेळीप्रमाणे दाढी असलेला चेहरा, तसेच काही भागावर शेळीप्रमाणे दाढी असलेला चेहरा, तसेच काही भागावर शेळीप्रमाणे केस व काही भागावर मेंढीप्रमाणे लोकर असलेले करडू/ कोकरू जन्माला आले. हा प्राणी खऱ्या अर्थाने खेचरासारखा संकरित प्राणी नव्हे. खेचराच्या प्रत्येक कोशिकेमध्ये गाढव व घोडा यांचे जीन (आनुवंशिक लक्षणांची एकके) असतात. या प्राण्याच्या मात्र काही कोशिका मेंढीच्या व काही शेळीच्या असतात. असा हा विचित्रोतकी (एकापेक्षा अधिक निषेचित अंड्यांपासून निर्माण झालेल्या कोशिकांचे मिश्रण असलेला) प्राणी निर्माण करण्याचा जगातील पहिला यशस्वी प्रयत्न आहे. केंब्रिज येथील इन्स्टिटयूट ऑफ ॲनिमल फिजिऑलॉजी या संस्थेतील शास्त्रज्ञांच्या अशाच प्रयोगातून जन्मलेला विचित्रोतकी फेब्रुवारी १९८४ मध्ये १८ महिन्यांचा झालेला होता. एका अर्थाने या प्राण्याला दोन मातापिता असतात, हा विशेष होय. मेंढी आणि शेळी यांच्या नावातील इंग्रजी अक्षरांवरून या प्राण्याला जीप (Geep) असे संबोधले आहे.

    मेंढ्यांपासून मिळणारे उत्पन्न

    मेंढ्यांपासून लोकर, मांस, कातडी व खत हे पदार्थ मुख्यत्वे मिळतात. मेंढ्यांपासून मिळणाऱ्या लोकरीसंबंधीची माहिती ‘लोकर’ या नोंदीत दिलेली आहे. लोकरीच्या जोडीला त्यांच्यापासून मांसही मिळते. साधारणपणे जास्त लोकर देणाऱ्या मेंढ्यांत मांसाचे प्रमाण कमी, तर कमी लोकर देणाऱ्यांमध्ये ते जास्त असते. भारतातील निरनिराळ्या राज्यांतील खाटिकखान्यात सु. पन्नास लाख मेंढ्यांची दर वर्षी कत्तल होते व त्यांपासून सु. १.५८ लाख टन मांस मिळते. [→मांस उद्योग]. भारतातील मेंढ्यांच्या कातड्याचे उत्पादन दर वर्षी सु १.५५ कोटी कातडी इतके आहे. यांपैकी सु. चौदा लाख कातडी राजस्थानातून मिळतात. त्यांपासून पाकिटे, हातपिशव्या, बूट, वाद्ये इ. बनवितात. [→चर्मोद्योग]. शेळ्यांच्या तुलनेत मेंढ्यापासून दूध जवळजवळ मिळत नाही, असे म्हटले तरी चालेल, काश्मीरमधील पूंछ, पंजाबातील लोही आणि उत्तर गुजरातमधील कच्छी मेंढ्यांपासून इतर मेंढ्यांच्या मानाने खूपच जास्त प्रमाणात दूध मिळते. मेंढीपासून लेंडी खत व मूत्र खत मिळते. एक मेंढी वर्षाला सु. ०.२५ टन खत देते. याकरिता शेतामध्ये मेंढ्या बसविण्याची पद्धत भारतभर रूढ आहे [→खत].

    शास्त्रीय पद्धतीने करा मेंढ्यांची पैदास

    प्रथम पैदाशीकरिता वापरात येणाऱ्या मेंढीचे वय एक ते दीड वर्ष असावे. पैदाशीचा मुख्य हंगाम जून-जुलै व दुय्यम हंगाम जानेवारी-फेब्रुवारीमध्ये असतो.

    प्रथम पैदाशीकरिता वापरात येणाऱ्या मेंढीचे वय एक ते दीड वर्ष असावे. पैदाशीचा मुख्य हंगाम जून-जुलै व दुय्यम हंगाम जानेवारी-फेब्रुवारीमध्ये असतो. पैदाशीसाठी वापरल्या जाणाऱ्या नर मेंढ्यास (जावळी) रोज 200 ते 250 ग्रॅम वाढीव खुराक द्यावा.

    हिवाळा हा मेंढ्यांच्या प्रजननाचा प्रमुख काळ आहे. कार्यक्षम व्यवस्थापनाचा भाग म्हणजे दोन वेतातील अंतर कमी ठेवणे. त्यासाठी कोकरे मेंढ्यांपासून वेगळे केल्यानंतर मेंढ्या मोसमानुसार परत माजावर आल्यावर त्या काळजीपूर्वक भराव्यात, जेणेकरून दोन वेतातील अंतर कमी होईल. दोन वर्षांत तीन वेत होऊन जास्त कोकरे मिळतील.

    1. प्रथम पैदासीकरिता वापरात येणाऱ्या मेंढीचे वय एक ते दीड वर्ष असावे. पैदासीचा मुख्य हंगाम जून-जुलै व दुय्यम हंगाम जानेवारी-फेब्रुवारीमध्ये असतो.
    2. मेंढ्यांना पैदासीच्या हंगामापूर्वी एक महिना 100 ते 150 ग्रॅम खाद्य द्यावे.
    3. माजावर असलेली मेंढी ओळखता येणे फारच अवघड बाब आहे. माजावर असलेल्या शेळीप्रमाणे लक्षण मेंढीमध्ये दिसून येत नाही. निरणाचा भाग थोडासा सुजलेला असतो आणि त्यात थोडासा काचेसारखा चिकट द्राव असतो, एवढ्यावरून माजावरील मेंढी ओळखता येऊ शकत नाही. तेव्हा माजावरील मेंढी ओळखण्यास मेंढा असणे आवश्‍यक असते.
    4. मार्चमध्ये जन्मणारे कोकरू सप्टेंबरमध्ये जन्मणाऱ्या कोकराच्या मानाने जन्मासाठी अधिक काळ घेते.
    5. मेंढी माजावर येण्याचे थांबणे हे गर्भधारणेचे पहिले लक्षण आहे. मेंढी गाभण असल्यास पहिले तीन महिने लक्षात येऊ शकत नाही. त्यानंतर मात्र पोटाचा आकार वाढतो. कास व सडांची वाढ पाचव्या महिन्यात लक्षात येते.
    6. माजावर येणे बंद झाल्यावर तीन महिन्यांनी पशुवैद्यकाकडून मेंढीची तपासणी करून घेतल्यास गर्भधारणेची खात्री करता येते. मेंढी विण्याच्या आठ ते दहा दिवस अगोदर सडात चिक अथवा पहिले दूध उतरते.
    7. पोटाचा आकार व गर्भाचे वजन वाढल्याने तिची चाल मंदावते.
    8. विण्याजवळ आलेल्या मेंढ्या कळपाच्या पाठीमागून चालताना आढळतात. आशा मेंढ्यांना वेगळे करावे. त्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे.
    9. मोसमाच्या सुरवातीच्या दिवसात जावळी (मेंढा) सोडल्यास मेंढ्या माजावर येण्यात मदत होते. त्या वेळी दोन आठवडे आधी मेंढ्यांना खुराक सुरू केल्यास त्या लवकर माजावर येतात याला इंग्रजीत "फ्लशिंग' म्हणतात. यासाठी 200 ते 250 ग्रॅम मका, बाजरी किंवा ज्वारी यापैकी कोणतेही एक धान्य दिले तरी चालते.

    मेंढ्यांचे व्यवस्थापन

    1. पैदाशीसाठी वापरल्या जाणाऱ्या नर मेंढ्यास (जावळी) रोज 200 ते 250 ग्रॅम वाढीव खुराक द्यावा. प्रजननाच्या काळात मोड आलेली मटकी 100 ते 120 ग्रॅम दररोज द्यावी. त्यामुळे पैदाशीचा जोम व विर्याची गुणवत्ता टिकविली जाते.
    2. नरांच्या आहारात 4 किलो हिरवा चारा आणि 1 किलो वाळलेला चारा द्यावा. प्रजननासाठी वापरण्यात येणाऱ्या नराचा आहार संतुलित असावा. आहारात 18 टक्के पचनीय प्रथिने व 70 टक्के एकूण पचनीय घटक असावेत.
    3. खाद्यामध्ये जास्तीत जास्त हिरवा चारा असावा. स्फुरदाचे प्रमाण वाढवावे. कॅल्शिअमचे प्रमाण कमी करावे. त्यासाठी खाद्यात गव्हाच्या कणीचा समावेश करावा.

    गाभण काळातील व्यवस्थापन

    1. 1हिवाळा हा मेंढ्यांचा प्रमुख गाभण काळ असल्याने गाभण मेंढ्यांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष करू नये.
    2. गाभण काळात तिसऱ्या महिन्यापासून मेंढ्यांना 200 ते 250 ग्रॅम वाढीव खुराक गर्भरोपणासाठी देणे जरुरीचे आहे.
    3. गर्भधारणेच्या कालावधीत कॅल्शिअम, फॉस्फरस, आयोडिन, तांबे, कोबाल्ट या खनिज द्रव्याची आवश्‍यकता असते. याकरिता खनिजांनीयुक्त चाटण विटा वाडग्यात (गोठ्यात) बांधाव्यात. या विटा मेंढ्या गरजेप्रमाणे चाटतात.
    4. मेंढी व्यायल्यानंतर त्या मेंढीला तिच्या कोकरास चाटू द्यावे. त्यामुळे मेंढीचा मातृभाव वाढतो.
    5. जन्मल्यानंतर कोकराची नाळ कापावी. कोकरू 1 ते 2 तासांत उठून मेंढीला पिऊ लागते. कोकराला चिक पाजणे महत्त्वाचे असते. त्यामुळे कोकराला आईपासून रोगप्रतिकारक शक्ती मिळते. पोटातील घाण बाहेर पडून कोकरू ताजेतवाने दिसते.
    6. व्यायलेल्या मेंढीला 100 ते 150 ग्रॅम उकडलेली बाजरी चार ते पाच दिवस द्यावी.
    7. 10 ते 12 दिवसांच्या वयानंतर कोकरांना हिरवा लुसर्न किंवा इतर चारा द्यावा.
    8. कोकरांना भरपूर दूध मिळावे म्हणून मेंढ्यांना योग्य प्रमाणात संतुलित आहार द्यावा. कोकरांना दूध ठराविक अंतराने पाजावे. अवेळी दूध पाजल्यास कोकरांच्या आतड्यात गाठी तयार होतात, संडास पातळ होते. कोकरू तडकाफडकी मरते. कोकरांचे थंडीपासून संरक्षण करावे.
    9. कोकरू तीन महिने मेंढीला पाजावे. त्या काळात 15 दिवसांत कोकरे कोवळे हिरवे गवत, पाने कुरतडून खाण्याचा प्रयत्न करावयास लागतात. 5 ते 8 आठवडे वयापासून थोडे थोडे खाद्य खाण्याची कोकरांना सवय करावी. बारा आठवड्यांनंतर ते मेंढीपासून वेगळे करावे. त्यानंतर त्यांना खुराक व सकस हिरवा चारा यावर वाढवावे.
    10. 1 संशोधनामध्ये असे दिसून आलेले आहे, की मांसासाठी वाढविली तर कोकरे 130 ते 145 दिवसांत 20 किलो पेक्षा जास्त वजनाची होतात. त्यांना बाजारात चांगली किंमत मिळते.
    11. मांसोत्पादनासाठी पाळलेल्या कोकरांनी मेंढीला पिणे बंद झाल्यापासून भरडा सुरू करावा.

    इमू पालन

    इमू रॅटाइट (ratite) समूहाचे घटक आहेत आणि त्‍यांचे मांस, अंडी, तेल, त्वचा आणि पंख ह्यांचे आर्थिक मूल्य उच्‍च आहे. हे पक्षी विविध हवामान व परिस्थितीशी जुळवून घेतात. इमू आणि शहामृग हे दोन्ही पक्षी भारतात सादर झाले असले तरी इमू संवर्धनास जास्‍त महत्व प्राप्त झाले आहे.

    म्हणजेच उडू न शकणार्‍या पक्ष्‍यांचे पंख विकसित नसतात आणि ह्यांमध्‍ये इमू, शहामृग, रिया, कॅसोवरी आणि किवी समाविष्‍ट आहेत. इमू आणि शहामृग व्यापारी महत्‍वाचे पक्षी असून त्‍यांचे मांस, तेल, त्वचा आणि पंख ह्यांना चांगला बाजारभाव आहे. ह्या पक्ष्‍यांची रचनात्मक आणि शारीरिक वैशिष्‍ट्ये समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधीय हवामान परिस्थितीसाठी उपयुक्त अशी आहेत. शेतावरील मोकळ्या तसेच अर्धबंदिस्त पध्‍दतींद्वारे यथोचित प्रकारे उच्च तंतुमय आहार देऊन ह्या पक्ष्‍यांना वाढवता येते. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि चीन इम्‍यु संवर्धनात आघाडीवर आहेत. इम्‍यु पक्षी भारतीय हवामानाशी चांगल्‍या प्रकारे जुळवून घेतात.

    इमूची वैशिष्ट्ये

    इमूची मान लांब असते, तुलनेने लहान बोडके डोके, पायांना तीन बोटे आणि शरीर पिसांनी झाकलेले असते. सुरूवातीला ह्या पक्ष्‍यांच्‍या अंगावर उभ्या पट्ट्या असतात (वय 0-3 महिने) मग हळू-हळू 4-12 महिन्‍यांत त्या भुर्‍या रंगाच्‍या होतात. प्रौढ पक्ष्‍यांची बोडकी मान निळी तर शरीरावर नक्षीदार पिसे असतात. प्रौढ पक्ष्‍याची उंची सुमारे 6 फूट असून 45-60 किलो वजन असते. खवल्‍यांसारची त्‍वचा असलेले लांबलचक पाय कडक आणि कोरड्या मातीकरिता योग्य आहेत. इम्‍यु चे नैसर्गिक अन्न किटक, वनस्पतींची कोवळी पाने, आणि केरकचरा आहे. हे पक्षी गाजर, काकडी, पपई इत्‍यादींसारख्‍या भाज्‍या आणि फळे खातात. ह्यांमधील मादी आकाराने जास्‍त मोठी तसेच वर्चस्‍व गाजविणारी असते, विशेषत: प्रजनन काळात. इम्‍यु 30 वर्षे जगतात. आणि 16 वर्षांपेक्षा जास्त काळ ते अंडी देतात. पक्ष्‍यांचा कळप किंवा जोड्या बाळगता येतात.

    पिल्लांचे व्यवस्थापन

    इमूची पिल्‍ले सुमारे 370 ते 450 ग्राम वजनाची असतात (अंड्याच्‍या सुमारे 67% वजनाची, अर्थात हे वजन अंड्याच्‍या आकारावर अवलंबून असते. पहि‍ले 48 ते 72 तास, इमूच्‍या पिल्‍लांना पिवळ्या बलकाचे (योक) वेगाने शोषण व्हावे व ती कोरडी राहावी ह्यासाठी इन्क्युबेटरमध्ये म्हणजे गरम पेटीत ठेवतात. पिल्‍लांचा जन्‍म व्‍हायच्‍या आधीच शेड स्वच्छ आणि जंतुसंसर्गरहित करून ठेवा. तांदुळाचा भुसा पसरून तो रिकामी पोती इत्‍यादीने झाका ज्‍यायोगे पिल्‍लांना त्रास होणार नाही. पहिले 3 आठवडे सुमारे 25 ते 40 पिल्‍लांसाठी दर पिल्‍लास 4 चौरस फूट जागा मिळेल या हिशेबाने ब्रूडरचा वापर करा. पहिल्‍या 10 दिवसांत 90 डिग्री फॅ. ब्रूडिंग तपमान पुरवा आणि 3-4 आठवडे 85 डिग्री फॅ. राहू द्या. योग्‍य तापमानावर ब्रूडिंग (वीण) यशस्‍वी होते. एक लीटर क्षमता असलेले पाण्‍याचे मग पुरवा आणि ब्रूडरखाली तितकेच फीडर ट्रफ (हौद) द्या. चिक गार्ड म्हणजे जाळीची उंची 2.5 फूट असली पाहिजे ज्‍यायोगे पिले तीवरून उडी मारून इकडे-तिकडे जाऊ नयेत. ब्रूडर शेडमध्‍ये प्रत्‍येक 100 चौ.फू. क्षेत्रात 40 वॉटचा एक बल्‍ब लावा. 3 आठवड्यांनंतर, हळू-हळू चिक गार्डचे क्षेत्र वाढवा आणि पिल्‍ले 6 आठवड्यांची झाल्‍यावर नंतर ते काढून टाका. पहिल्‍या 14 आठवड्यांत किंवा त्‍यांचे वजन 10 किलोग्राम होईपर्यंत त्‍यांना स्‍टार्टर मॅश खायला द्या. पक्ष्‍यांना हालचाल करण्‍यासाठी योग्‍य तितकी जागा आहे की नाही ह्याची खात्री करून घ्‍या कारण त्‍यांच्‍या आरोग्‍यमय जीवनासाठी हे गरजेचे आहे. 30 फुटांची रन स्‍पेस म्‍हणजे मोकळी जागा पाहिजे, म्‍हणून सुमारे 40 पिल्‍लांसाठी 40 x 30 फुटांची जागा हवी, जर बाहेर जागा असेल तर. फरशी सहज कोरडी होणारी व ओलसरपणा नसलेली हवी.

    हे करा

    • कधीही खुराड्यात गर्दी होऊ देऊ नका.
    • पहिल्‍या काही दिवसांसाठी स्‍वच्‍छ केलेले पाणी व एँटी-स्‍ट्रेस औषधे द्या.
    • दररोज स्वच्छ पाणी ठेवा.
    • पक्ष्‍यांचा आराम, अन्नपाण्याचे सेवन, विष्ठेची स्थिती ह्यांचे रोज निरीक्षण करा. गरजेनुसार लगेच सुधारणा करा.
    • पिल्‍लांच्‍या आरोग्‍यमय वाढीसाठी त्‍यांच्‍या आहारांत योग्‍य ती खनिजे व जीवनसत्‍वे असल्‍याचे सुनिश्चित करा आणि पाय फेंगडे होण्यापासून त्‍यांचा बचाव करा.
    • उत्‍कृष्‍ट संवर्धनासाठी ऑल-इन-ऑल-आउट पध्‍दतींचा वापर करा.

    हे करू नका

    • दिवसातील ऐन गरमीच्या वेळेत पक्ष्‍यांना हाताळू नका.
    • पक्षी सहज उत्तेजित होतात. म्‍हणून, खुराड्यामध्‍ये शांत आणि सौम्‍य वातावरणाची आवश्यकता असते.
    • पक्षी चटकन कोणत्‍याही वस्‍तूवर झडप घालतात, म्‍हणून खिळे, लहान खडे इत्‍यादिंसारख्‍या वस्‍तू पक्ष्‍यांच्‍या झडपेच्‍या सीमेत ठेवू नयेत.
    • फार्ममध्‍ये अपरिचित व्यक्ती, सामग्री आणू नका. योग्‍य ती जैविक सुरक्षितता पाळणे आवश्‍यक आहे.
    • पक्ष्‍यांना कधीही भुशाच्‍या बिछान्‍यावर थेट ठेवू नये कारण लहान पिले धावपळ करीत राहतात आणि ह्यामुळे त्‍यांचा पाय घसरून पडण्‍याची, पाय मोडण्‍याची शक्‍यता आहे.

    ब्रीडर व्यवस्थापन

    इमू पक्ष्‍यांना 18 ते 24 महिन्‍यांत लैंगिकदृष्ट्या जाणते होतात. नर आणि मादी ह्यांचे प्रमाण 1:1 ठेवा. खुराड्यामध्ये वीण वाढवण्याच्‍या बाबतीत, जोड्या अनुरूपतेवर आधारित असायला हव्‍यात. मेटिंग (प्रजननासाठी वीण) दरम्‍यान प्रत्‍येक जोडीला 2500 चौ.फूट जागा पुरवा. विणीसाठी एकांत मिळावा म्हणून झाडे-झुडपे पुरवू शकता. विणीच्या कार्यक्रमाच्‍या 3 ते 4 आठवडे आधीच ब्रीडर आहार द्या. ह्यामधून पक्ष्‍यांच्‍या चांगल्‍या प्रजननासाठी आणि उबविण्‍यासाठी खनिजे व जीवनसत्‍वे ह्यांचा भरपूर पुरवठा होईल. सामान्‍यत: प्रौढ पक्षी 1 किलो/दिवस असा आहार घेतो. पण ब्रीडिंग हंगामात, आहार घेणे अत्‍यंत कमी होते. म्‍हणून आहारात पोषक तत्‍वांचा समावेश असल्‍याची खात्री करून घ्‍या.

    सुमारे अडीच वर्षे वय असतांना पहिले अंडे घातले जाते. ऑक्टोबर ते फेब्रुवारीच्‍या दरम्‍यान अंडी घातली जातील, विशेषत: वर्षाच्‍या थंड दिवसांमध्‍ये. अंडी घालण्‍याची वेळ सुमारे 5.30 ते 7.00 संध्‍याकाळची असते. खुराड्यामध्‍ये दिवसांतून दोनदा अंडी गोळा केली जाऊ शकतात म्हणजे त्यांचे नुकसान होणार नाही. सामान्‍यपणे, पहिल्‍या वर्षचक्राच्‍या दरम्‍यान मादी 15 अंडी घालते, त्‍यानंतरच्‍या वर्षांमध्‍ये, अंड्यांचे उत्‍पादन सुमारे 30-40 अंड्यांपर्यंत वाढत जाते. सरासरी प्रमाणात, दर वर्षी एक मादी 25 अंडी घालते. एका वर्षांत 560 ग्राम वजन असलेल्‍या अंड्यांसह सुमारे 475-650 ग्राम वजनाची अंडी असतात. अंड्यांचा रंग हिरवट असतो आणि हिरवट रंगाच्या टणक काचेच्‍या गोट्यांसारखी ती दिसतात. रंगाचा गडदपणा प्रकाशानुसार बदलतो, मध्‍यम ते गडद हिरवा. पृष्‍ठभाग खडबडीत असतो तो नितळ होतो. बहुतेक अंडी (42%) मध्‍यम हिरवट तसेच खडबडीत पृष्‍ठभाग असलेली असतात.

    इमूची अंडी

    ब्रीडर आहार पुरेशा कॅल्शियमसह (2.7%) द्या ज्‍यायोगे सशक्‍त अंडी प्राप्‍त केली जाऊ शकतात. अंडी घालण्‍याआधी ब्रीडर पक्ष्‍यास अतिरिक्‍त कॅल्शियम दिल्‍याने अंड्यांच्या उत्पादनावर परिणाम होतो आणि नर प्रजननसक्षम राहात नाहीत. अतिरिक्त कॅल्शियमसाठी ग्रिट किंवा कॅलसाइट भुकटीच्‍या स्‍वरूपात, एका वेगळ्या हौदात ठेवून ते पक्ष्‍यांना द्या. खुराड्यामधून वारंवार अंडी गोळा करीत राहा. जर अंडी मातीने खराब झाली, तर ती सँण्‍डपेपरने घासा व कापसाने पुसा. अंड्यांची साठवण 60 डि.फॅ. तपमानाच्‍या थंड जागेवर करा. जास्‍त चांगल्‍या प्रकारे उबविली जावीत म्‍हणून कधी ही अंडी 10 दिवसांपेक्षा जास्‍त दिवस साठवू नयेत. खोलीच्‍या तपमानावर ठेवलेली अंडी चांगल्‍या प्रकारे उबविण्‍यासाठी प्रत्‍येक 3 ते 4 दिवस सेट ठेवली जाऊ शकतात.

    अंडी उबविणे व पिले बाहेर येणे

    प्रजननक्षम अंडी खोलीच्‍या तपमानाशी जुळल्यानंतर मांडा. एका ट्रेमध्‍ये ह्यांना थोडेसे तिरप्‍या किंवा आडव्‍या ओळींमध्‍ये लावून ठेवा. अंडी उबविण्‍याचे यंत्र (इनक्‍यूबेटर) नेहमी स्‍वच्‍छ व निर्जंतुक करून ठेवा. अचूक इनक्‍यूबेटिंग तपमान कायम राखण्‍यासाठी उदा. ड्राय बल्‍ब तपमान सुमारे 96-97 डि.फे. आणि वेट बल्‍ब तपमान सुमारे 78-80‍ डि फे. (सुमारे 30-40 टक्‍के तुलनात्मक आर्द्रता उर्फ आरएच). एका सेटरमध्‍ये अंड्यांचा ट्रे काळजीपूर्वक ठेवा, एकदा इनक्‍यूबेटर सेट तपमानासह संबंधित आर्द्रतेवर तयार झाले की सेट केल्याची तारीख आणि पेडिग्रीसाठी ओळख स्लिप लिहून ठेवा, आवश्‍यक वाटल्‍यास. इनक्‍यूबेटरच्‍या जागेच्‍या प्रत्‍येक 100 घनफुटासाठी 40 एमएल फॉर्मेलिन * 20 ग्राम पोटॅशियमसह इनक्‍यूबेटरला धुरी द्या. इनक्‍यूबेशनच्‍या 48 दिवसांपर्यंत प्रत्‍येक तासाला अंडी फिरवा. 49व्‍या दिवसापासून, अंडी फिरविणे थांबवा आणि ध्‍वनि संकेताची वाट पहा. 52व्‍या दिवशी, इनक्‍यूबेशनचा काळ संपतो. पिलांना कोरडेपणाची गरज असते. पिलांना कमीत कमी 24 ते 72 तास हॅचर कंपार्टमेंटमध्‍ये ठेवा, ज्‍यायोगे लव कमी होवून पिले निरोगी होतील. सामान्‍यपणे, हॅचिंग (अंड्यातून पिले बाहेर येणे) क्षमता 70 टक्‍के किंवा जास्‍त असेल. कमी क्षमतेची अनेक कारणे असू शकतात. योग्‍य तो ब्रीडर आहार आरोग्‍यमय पिलांची खात्री देतो.

    अन्न देणे

    योग्‍य वाढ आणि प्रजोत्‍पादनासाठी इम्‍युंना समतोल आहाराची गरज असते. उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे काही पोषणविषयक गरजांचा सल्‍ला देण्‍यात आला आहे (तक्‍ता 1 आणि 3). पोल्‍ट्रीच्‍या काही सामान्‍य घटकांचा वापर करून आहार तयार करता येतो (तक्‍ता 2). उत्‍पादन मूल्‍याचा 60-70 टक्‍के भाग आहारासाठी खर्च होतो, म्‍हणून कमी किंमतीच्‍या आहाराचा वापर करून नफ्याचे मार्जिन वाढविता येते. व्‍यावसायिक फार्म्समध्‍ये, दर ब्रीडर इम्‍यु जोडीचा वार्षिक आहार खर्च 394-632 किलोग्राम ते साधारण 527 किलोग्राम सरासरी पडतो. ब्रीडिंग व ब्रीडिंग नसलेल्या हंगामात अनुक्रमे आहाराची किंमत रू.6.50 आणि 7.50 होती.

    इमूच्या विविध वयोगटांसाठी सुचवलेली पोषक आहाराची गरज

    मानदंड

    स्‍टार्टर 10-14 आठवडे वय किंवा 10 किलो वजन होईपर्यंत

    ग्रोअर
    15-34 आठवडे वय किंवा 10-25 किलो वजन होईपर्यंत

    ब्रीडर

    कच्ची प्रथिने %

    20

    18

    20

    लायसिन %

    1.0

    0.8

    0.9

    मेथियोनाइन%

    0.45

    0.4

    0.40

    ट्रिप्‍टोफॅन %

    0.17

    0.15

    0.18

    थ्रेओनाइन %

    0.50

    0.48

    0.60

    कॅल्शियम % मिनी

    1.5

    1.5

    2.50

    एकूण फॉस्‍फोरस %

    0.80

    0.7

    0.6

    सोडियम क्‍लोराइड %

    0.40

    0.3

    0.4

    क्रूड फायबर (अधिकतम) %

    9

    10

    10

    जीवनसत्‍व अ(IU/कि.ग्रा.)

    15000

    8800

    15000

    जीवनसत्‍व ड 3 (ICU/कि.ग्रा.)

    4500

    3300

    4500

    जीवनसत्‍व ई (IU/कि.ग्रा.)

    100

    44

    100

    जीवनसत्‍व बी 12(µ ग्रा./कि.ग्रा.)

    45

    22

    45

    कोलाइन (mg/कि.ग्रा.)

    2200

    2200

    2200

    तांबे (mg/कि.ग्रा.)

    30

    33

    30

    जस्‍त (mg/कि.ग्रा.)

    110

    110

    110

    मँगनीज (mg/कि.ग्रा.)

    150

    154

    150

    आयोडिन (mg/कि.ग्रा.)

    1.1

    1.1

    1.1

    इमू उत्पादन

    इमू व शहामृगाचे मांस कमी फॅट (चरबी), कमी कोलेस्‍ट्रॉल व त्‍याचा सुवास ह्या सर्वांमुळे अत्‍यंत उच्‍च प्रतीचे आहे. मांड्या आणि पायाच्‍या खालच्‍या भागाचा मोठा तुकडा जास्‍त महाग असतो. इम्‍युची त्‍वचा नितळ आणि बळकट असते. पायाची त्‍वचा विशेष प्रकारची असल्‍यामुळे फार महाग असते. इम्‍युची चरबी तेल उत्‍पादनासाठी वितळतात, ज्‍याचे पोषण, उपचारात्‍मक (जळजळ-रोधक) आणि सौंदर्यप्रसाधनविषयक मूल्‍य फार उच्‍च आहे.

    अर्थकारण

    इमू फार्मच्‍या आर्थिक पाहणीवरून असे दिसते की ब्रीडिंग कळपाच्‍या खरेदीची किंमत खूपच असते (68%). बाकी इतर गुंतवणूक फार्म (13%) आणि हॅचरी (13%) ह्यांसाठी केली जाते. दर ब्रीडिंग जोडीचा अनुमानित वार्षिक आहार खर्च रू.3600/- आहे. अंडी व एक दिवसाच्‍या पिलाचे हॅचिंग करण्‍याचे मूल्‍य रू.793 आणि 1232 अनुक्रमे आहे. दर जोडीचा वार्षिक आहार खर्च 524 किलोग्राम नोंदण्‍यात आला, ज्‍याचे मूल्‍य रू.3578/- आहे. विक्रीयोग्‍य असलेल्‍या एक दिवसाच्‍या पिलाचे मूल्‍य रू.2500-3000 लावण्‍यात आले. चांगल्‍या प्रकारे हॅचिंग केले असतां इम्‍युकडून फार चांगली परतफेड मिळण्‍याची शक्‍यता आहे (80 टक्‍क्यांपेक्षा ही जास्‍त), कमी फीडिंग मूल्‍य आणि कमी झालेला पिलांचा मृत्‍यु दर 10% पेक्षा ही कमी आहे.

    आरोग्‍य संगोपन व व्यवस्थापन

    उडू न शकणारे पक्षी सामान्‍यपणे बळकट आणि दीर्घायु (80% जीवनक्षमता) असतात. इम्‍युमध्‍ये मृत्‍यु दर आणि आरोग्‍यासंबंधीच्‍या समस्‍या प्रामुख्‍याने लहान पिले व किशोरवयीन पक्ष्‍यांमध्‍ये आढळतात. यांमध्‍ये भूकबळी, कुपोषण, आंत्र अवरोध, पायांतील विकृति, कोलाय् जंतुसंसर्ग आणि क्‍लॉस्ट्रिडायल संसर्ग इत्‍यादि असतात. प्रमुख कारणे अनुचित ब्रूडिंग किंवा पोषण, तणाव, अयोग्‍य हाताळणी किंवा आनुवांशिक दोष असतात. इतर आजारही होऊ शकतात, उदा. रिनिटस, कॅनडिडायसिस, सॅल्‍मोनेला, ऍस्‍परगिलोसिस, कोकियोडायोसिस, लाइस आणि ऍस्‍काराइड किटक उपद्रव. आंतरिक व बाह्य कृमींपासून बचाव करण्‍यासाठी 1 महिन्‍याचे पक्षी असतानादेखील आयव्‍हरमॅक्टिन दिले जाऊ शकते.

    इम्‍यूंना एंटरायटिस आणि व्‍हायरल ईस्‍टर्न इक्‍वाइन ऍनसेफिलोमायलिटिस (EEE) होत असल्याचा अहवाल देण्‍यात आला आहे. भारतामध्‍ये, आतापर्यंत मोठ्या जखमांवर आधारित रानीखेत रोगाचे काही अहवाल मिळाले आहेत पण ते निश्चित नव्‍हते. तरीही, 1, 4 आठवड्यांचा पक्षी (लासोटा व लासोटा बूस्टर), 8,15 आणि 40 आठवडे वयात आर.डी. साठी मुक्‍तेश्‍वरद्वारे लसीकरण केलेले पक्षी जास्त चांगले आरोग्य राखतात.

    इमूपालन

    इमू हा पक्षी शहामृगासारखा दिसणारा ३० ते ४० किलो वजनाचा असून, साडेपाच ते सहा फुट उंचीचा असतो. इमूचे वय ३० ते ४० वर्षं इतक असतं. इमू हा पक्षी साधारणपणे १८ ते २४ महिने वयाचा असताना प्रजननक्षम होतो. मात्र इमू हा पक्षी सप्टेंबर ते फेन्रुवारी अगर ऑक्टोबर ते मार्च या हंगामातच अंडी देतो. मादी पक्षी ३ ते ५ दिवसांनी एक अंडे देते. सुरवातीच्या म्हणजे पहिल्या वर्षी ८ – १० अंडी देतात. पुढे दरवर्षी हे प्रमाण वाढत जावून २० – ३० अंडी प्रत्येक पक्षी दर वर्षाला देतो. एका अंड्याचे वजन ४०० -७०० ग्रॅम पर्यंत भरते.

    नैसर्गिक पैदासिमध्ये इमू – नर पक्ष्याची भूमिका महत्त्वाची असते. इमू - नर पक्षी अंडी उबवतो. यासाठी त्याला किमान ६० दिवस लागतात, तर कृत्रिम पद्धतीनं अंडी उबवणूक केंद्रात किमान ५० – ५२ दिवसांनी अंड्यातून पिल्लू बाहेर पडते. उबवणी समयी पिल्लाचे वजन अंदाजे ४०० ते ४५० ग्रॅम असते.

    ३ महिन्यांनी ८ किलो, ६ महिन्यांनी १२ किलो आणि पूर्ण वाढ १५ ते १६ महिन्यात होवून त्याचे वजन ३५ ते ४० किलो होते. या वेळी मांसासाठी तो उपयुक्त होतो. सांडी – घालण्यासाठी सुद्धा सक्षम होतो.

    इमू हा पक्षी फारच काटक आहे. सहजासहजी कोणत्याही रोगालाही बळी पडत नाही. म्हणजे उत्तम प्रकारे रोगप्रतिकार शक्ती असणारा हा पक्षी आहे. कधी कधी फंगल – इन्फेक्शन, जनताच प्रादुर्भाव अगर जीवनसत्त्व खनिज मिळालं नाही तरच हे पक्षी आजारी पडतात

    अंदाजे दोन किलो वजनाच्या पक्षाला रोज १२० ते १४० ग्रॅम खाद्य लागतं. पूर्ण वाढीच्या पक्षाला दिवसाला ४०० ते ६०० ग्रॅम खाद्य लागतं. खाद्याबरोबरच हिरव्या पालेभाज्या, मेथी, लसून, कोबी, फ्लॉवर, इतर भाज्या आणि धान्यामध्ये सोयाबीन, मका, ज्वारी, गहू यांचा भरडा आणि कंपन्यांनी तयार केलेलं इमू – खाद्यही लागतं. खाद्यासोबत पूर्ण वाढलेला पक्ष्याला रोज स्वच्छ आणि शुद्ध असं ५ ते ६ लिटर पाणी पिण्यासाठी लागतं.

    इमू पक्ष्याकरता माळरान, नापीक, मुरमाड पाण्याचा निचरा होणारी मोकळ्या हवेची निकुडी जागा निवडावी. शेड आणि चेनलिंक फेन्सिंग म्हणजे कंपाउंड असणारी त्याच्या पुढं मोकळी जागा अशा पद्धतीची त्यांची जोपासण्याची सोय करावी. हे पक्षी नेहमी कायमस्वरुपाच्या जोडीनं राहतात. एक जोडप्यासाठी १०० × ५० फुट म्हणजे ५०० चौ. फूट जागा लागते. नव्यानं व्यवसाय सुरु करण्यासाठी किमान १० जोड्या असाव्या लागतात आणि विशेष म्हणजे हा व्यवसाय सुरु करण्याअगोदर पूर्ण माहिती असणं, तसेच दुसऱ्यांनी सुरु केलेला अनुभव जमेला धरून हा व्यवसाय सुरु करावा.

    एकंदरीत शेतीला पूरक व्यवसाय म्हणून हा व्यवसाय भांडवलावर व्यक्तींनी सुरु करावा. कारण पिल्ल विकत घेऊन हा व्यवसाय सुरु करावा लागतो. पिल्लांना खूप पैसे मोजावे लागतात. भांडवलदार तरुण या व्यवसायाकडे थोड्याफार प्रमाणात वाळू लागले आहेत.

    सध्यातरी आर्थिक अपेक्षा जास्त असतात, पण त्या पुऱ्या होत नसल्याचेच चित्र दिसून येतेय. कारण अंडी विक्री अगर मांस विक्रीला म्हणावं तसं मार्केट अजून उपलब्ध नाही. या व्यवसायाच्या व्यवस्थापनात विशेषतः विक्री व्यवस्थेत सुधारणा झाल्यास या व्यवसायाची वाढ निश्चितच होईल.

    बदक पालन

    बदक पालन हा व्यवसाय पु्र्वेकडील राज्यात त्याचप्रमाणे तामीलनाडुमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. ज्या ठिकाणी कुक्कुट पालनास पोषक असे हवामान नाही तेथे हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतात.

    बदक पालन एक उत्कृष्ट जोडधंदा:

    बदक पालन हा व्यवसाय पु्र्वेकडील राज्यात त्याचप्रमाणे तामीलनाडुमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. ज्या ठिकाणी कुक्कुट पालनास पोषक असे हवामान नाही तेथे हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतात त्यांच्याकडे अशणा-या बदकांची संख्या ८ ते १० असुन ती मोकाट सोडलेली असतात व वर्षाकाठी ६० ते ७० अंडी देतात. परंतू हाच व्यवसाय शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करुन केला तर त्यात बराच फायदा होतो.

    बदकांची अडी सकसः बदक पालन हा व्यवसाय अंडी आणि मांस उत्पादनाकरीता केला जातो. बदकांच्या अंड्यंना आजतरी विशेष मागणी नाही, याचे प्रमुख कारण म्हणजे यांचे उत्पादन आपल्याकडे फारच कमी आहे . जी काय अंडी किंवा पक्षी उपलब्ध असतात, ती प्रामुख्याने हॉटेलमध्ये वापरली जातात . दुसरे कारण बदकांच्या अंड्याला एक प्रकाराचा उग्र वास असल्या कारणाने त्यांची मागणी कमी असते. परंतु ज्यांनी ही अंडी खाण्यास सुरुवात केली ते हळूहळू ही अंडी पसंत करतात.


    १०० ग्रॅम खाण्याजोग्या अंड्यात असणारी पोषणमुल्ये

     

    विवरण

    कोंबडी

    बदक

    अंड्याचे सरासरी वजन (ग्रॅम)

    ५०

    ७०

    अंड्यातील पाण्याचे प्रमाण (ग्रॅम)

    ७४.५७

    ७०.८३

    उर्जा (कॅलरीज)

    १५८

    १८५

    प्रथिने (ग्रॅम)

    १२.१४

    १२.८१

    स्निग्ध पदार्थ (ग्रॅम)

    १५.१५

    १३.७७

    पिष्टमय पदार्थ (ग्रॅम)

    १.२०

    १.४५

    खनिज पदार्थ

    ०.९४

    १.१४

    बदकाच्या जातीः

    बदकांच्या जातीचे वर्गिकरण तीन गटात केले जाते.

    १.  मांस उत्पादनाकरीताः यामध्ये  प्रामुख्याने आयलेसबरी , पेकीन यांचा समावेश आहे. या शिवाय राऊन्स , मसतोव्होस किंवा व्हाईट इंडियन रनर्स हे सुद्धा मांस उत्पादनकरिता वापरतात.

    २.  अंडी उत्पादनाकरीताः यात प्रामुख्याने खाकी कॅम्पबेल, मॅगपाईज काळे किंवा निळे ऑरपिंगटस आणि व्हाईट स्टनब्रिज इत्यादीचा समावेश होतो. यासर्व जातीत खाकी कॅम्पबेल ही जात अत्यंत विकसित झाली असून , या जातीची वर्षासाठी २५० ते ३०० अंडे देतात.

    ३.  शोभेची बदकेः यात प्रामुख्याने टील , विडजन , पीनटेल ,पॉकहार्ड , करोलीना आणि शोव्हेलीअर या जातीचा समावेश होतो . ही बदके अत्यंत शोभीवंत असून , त्यांचे रंग सोनेरी , लाल , जांभळा , निळा , पांढरा ,पिवळा इत्यादी रंगाच्या विविध छटा युक्त असतात.

    बदक पालन फायदेशीर होण्यासाठी या गोष्टीकडे द्याः

    १)   बदकांच्या घरावर जास्त खर्च करु नका.

    २)   दिवरभर बदके चरण्यास सोडल्यास त्याचा खाद्यावरील निम्मा खर्च कमी होतो.

    ३)   चांगल्या जातीची बदके ठेवा.

    ४)   दिवसातुन एक वेळा तरी बदकांचे निरक्षण करुन आजारी बदके आढळल्यास अलग करा. या गोष्टी काटेकोरपणे पाळल्या गेल्या तर हा व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो.

    या व्यवसायात एक दिवसाची पीले आणून त्याचे संगोपन करावे आणि नंतर साधारणपणे २० ते २२ आठवड्याचची झाल्यानंतर अंडी उत्पादनास सुरुवात होते. साधारणपणे १ वर्षात २७५ ते २९० अंडी उत्पादन असे एकंदर १८ महीने बदके ठेवावीत. हा व्यवसाय सुरु करतांना खालील बाबींकडे विशेष लक्ष द्यावे.

    १) धंद्याचे प्रमाणः सूरुवातीला हा व्यवसाय लहान प्रमाणावर सुरु करावा. धंद्यातील यश, आणि अनुभव , त्यात येणा-या अडचणी व त्यावर घ्यावयाचे निर्णय , या बाबींचा अभ्यास झाल्यानंतर हा व्यवसाय हळूहळू सहज वाढविता येतो.

     

    २) जागाः शक्य झाल्यास भाड्याने जागा मिळवावी म्हणजे गुंतवणुक कमी राहील. जागा स्वतःची असल्यास उत्तम .जागा शक्य तोवर नदी, नाले, तलाव किंवा सरोवर यांच्या आसपास असावी. यामुळे बदकांना लागणारे पाणी मुबलक मिळते. तसेच बदकांना नैसर्गी़क खाद्य ही उपलद्ध होते त्यामुळे त्याच्या खाद्यावरील खर्च काही प्रमाणात ( शेकडा ५० टक्के पर्यंत ) कमी होऊ शकतो.

    ३) भांडवलः हा व्यवसाय सूरु करतांना इतर धंद्याच्या तुलनेने कमी भांडवल लागते . भांडवल दोन प्रकारचे लागत असून त्यात अ) अनावर्ति खर्चःम्हणजे स्थिर किंवा दीर्घमुदतीचे भांडवल यात प्रामुख्याने बदकांना लागणा-या घरांची बांधणी , त्याच्या संगोपनात लागणारे खाद्य, पाणी यांची भांडी इत्यादीचा समावेश असतो. ब) आवर्ती खर्चः यात प्रामुख्याने खाद्य , मजुरी , औषध , विज देयक ,पशु विमा (बदकांचा वार्षिक विम्याचा हप्ता ), इत्यादीचा समावेश असतो.

    ४)  मजुरीः बदकांच्या युनिटला एक स्वयंरोजगार असल्यास इतर मजुराची आवश्यकता भासत नाही . पुढे व्यवसायाचा व्याप वाढल्यानंतर मजुरीवरील खर्चही वाढतो. साधारणपणे ५०० ते १००० बदकाकरीता एक मजूर ठेवणे जरुर असते.

    ५)  घरेः बदकाची घरे तात्पुरत्या स्वरुपाची असावी साधारणपणे  बास, बल्ली, तुह्राट्य़ा , पर्ह्याट्या ,तट्टे यांच्या साह्याने तयार केलेल्या घरांना खर्च कमी लागतो. बदकाकरीता पाण्याच्या उपलब्धेनूसाल स्थलांतरीत करण्याजोगी घरे बांधावी . ही घरे तयार करीत असतांना ३० ते ४० बदकाकरीता एक घर याप्रमाणे घरे तयार करावी.

    ६)  उपकरणेः बदकांच्या घरात लारणारी उपकरणे म्हणजे खाद्याची व पीण्याची भांडी होय. यातही बदकांच्या घरात जर सिंमेटची नाली तयार करुन त्यात पाणीपुरवठा केल्यास २४ तास स्वच्छ पाणी त्यांना मिळते. साधारणपणे २० बदकाकरीता १ खाद्याचे भांडे लागते. यानुसार खाद्याची भांडे किंवा ट्रे तयार करावीत. या शिवाय अंडी साठवण्याकरीता जाळीचे कपाट लागते.

    ७)  मिळकतः या व्यवसायाला प्रामुख्याने अंडी विक्रीपासुनच मिळकत मिळते . एक दिवसांची पिले आणुन संगोपन केल्यामुळे सुरुवातीला २० ते २२ आठवडे ही पिले पोसणे जरुर असते. एकदा बदकांचे अंडी उत्पादनास सुरवात झाल्यवर मिळकतीस सुरुवात होते. अलीकडे शासन ८ ते१० आठवड्याची पिले जर विकत घेतली तर घरी आणल्यानंतर २ महीन्यात उत्पादनास सुरुवात होते शिवाय पिलांना सुरुवातीच्या ३ ते ४ आठवडे पोसणे अत्यंत जिकरीचे असते त्यात बरीच पीले मृत्युमुखी पडण्याची शक्यता असते. जर ८ ते १० आठवड्यातील पीले विकत घेतली तर ही सुद्धा काळजी  मिटते.

    शंभर बदकांच्या व्यवस्थापनेवर लागणारा खर्च व त्यापासून मिळणारे उत्पन्न

    अ) अनावर्ती खर्च

    बदकाचे घर २४० चौ. फुट २० फुट लांब व १२ रुंद रु. ४० /- प्रति चौ. फुट (कच्चे घर बास, तट्टे ,तु-हाटी व अँसबेसटॉसचे छत)

    ९६००/-

    घराबाहेर तारेचे कुंपन (जाळी) १५०० चौ.फुट

    ४५००/-

    ६ फुट व्यासाचे ११/३ फुट खोल पाण्याचे टाके

    १०००/-

    ब्रुडर , खाद्य , अंड्याचे ट्रे इत्यादी प्रती बदक १० रु. प्रमाणे

    १०००/-

    ११० बदकांच्या पिलांची किंमत १० रु. प्रती पिला प्रमाणे

    ११००/-

    तराजु व वजने

    ४००/-

    इतर अवांतर खर्च

    ४००/-

    एकंदर रुपये

    १८,०००/-

     

    ब) आवर्ती खर्च:

    आवर्ती खर्च हा एकंदर दिड वर्षाकरीता दिला कारण १ दिवसाचे पिले घेतल्यावर ६ महिने अंड्यावर येईपर्यंतचा काळ व नंतर १ वर्ष अंडी उत्पादनाचा काळ

    १.

    खाद्य० ते २० आठवडे १२ कि. प्रती बदक आणि अंडी उत्पादनाचा १ वर्षाचा काळ
    ५० किलो प्रती बदक एकंदर खाद्य ६२ कि. म्हणुन १०० बदकांना ६.२ मेट्रीक टन /५००० प्रति टन

    ३१,०००/-

    प्रति बदक लस औषधी ५ रु. प्रमाणे

    ५००/-

    विद्युत देयके प्रति माह १०० रु. प्रमाणे १८ महिणे

    १८००/-

    बदकांच्या घरावर घसारा १० टक्के

    १०००/-

    भांडी व इतर साहीत्यावर घसारा १५ टक्के

    १५०/-

    १०० बदकांचा विमा १५० रु. प्रती शेकडा

    १५०/-

    बँकेचे व्याज कृषीकरीता १२ टक्के दराने आवर्ति खर्चावर (१८००० रुपयांवर)

    २१६०/-

    एकंदर खर्च

    ३६,६६0/-

     

    क) उत्पन्न

    अंडी विक्री २५,००० अंडी (प्रती पक्षी सरासरी २५० अंडी) रु.१.५० प्रती अंडे प्रमाणे

    ३७,५००/-

    खत विक्री १०००/- रु. प्रति टन खत

    ३,०००/-

    बारदाना ( रिकामे पोती ) प्रती नग १० रु. प्रमाणे १५० पोती

    १,५००/-

    वर्षाच्या शेवटी १०० बदकाच्या प्रती ८० रु. प्रमाणे बिक्री (प्रत्येक बदकाचे सरासरी वजन अडीच किलो) बदकाचे मृत्युचे प्रमाण धरले नाही कारण विमा काढलेला आहे.

    ८,०००/-

    एकूण उत्पन्न५०,०००

    ड)

    एकंदर उत्पन्न रु.

    ५०,०००/-

    - उत्पादन खर्च

    ३६,०००/-

    एकंदर नफा

    १३,३४०/-

    इ)

    बँक परतीचा हप्ता

     

    प्रति वर्ष ३६,०००रु. प्रमाणे

    ३६००/-

    प्रति वर्षीकरीता १०० पिल्लाची खरेदी रु.१० प्रमाणे

    १०००/-

    एकंदर रु.

    ४६००/-

    निव्वळ नफा १३३४०-४६०० = ८७४० /-

    ८७४०/- रु. नफा दिड वर्षाच्या कालावधीत मिळणार आहे. प्रति वर्ष रु. ५८२६/-

    १)  वरील बदक पालन प्रकल्प बांधणी ही नविन व्यवसाय करणा-या पशूपालकांना सुरवातीस फक्त १०० बदका करीता आहे. जर पक्ष्यांची संख्या वाढविली तर नफ्याचे प्रमाण वाढते.

    २)  या प्रकल्पात खाद्यावरील संपूर्ण खर्च दाखविण्यात आलेला आहे. जर बदकाकरीता आसपास नदी, सरोवर, तळे, नाल्या किंवा भाताची शेती असेल तर त्या प्रमाणात खाद्यावरील खर्च ५० % कमी केल्या जाऊ शकतो ज्यामुळे नफ्याचे बरेच प्रमाण वाढते.

    ३)  प्रस्तूत प्रकल्पात पक्षांचा विमा काढलेला असल्यामुळे मृत्युचे प्रमाण धकलेले नाही.


    बदकांची उपलब्धता - साधारण सुधारीत जातींची ६० ते ७५ दिवसांची पिल्ले ही सप्टेंबरपासून एप्रिलपर्यत खालील ठिकामी उपलब्ध असतात.

    १)   सेन्ट्रल डक ब्रिडींग फार्म, हिसार गट्टा, बंगलोर.

    २)   स्टेट पोल्ट्री फार्म, गोबरडंगा, २४ परगाणा जिल्हा ( पश्चिम बंगाल ).

    ३)   दिपोद्य कृषी व्कास केंद्र, रामशी, जलपायगुरी ( दक्षिण बंगाल ).

    ४)   रिझनल डक ब्रिडींग फार्म, अगरताला ( त्रिपूरा )

    ५)   स्टेट पोल्ट्री फार्म, कृषिनगर, नाडीया.

    ६)   डक ब्रिडींग फार्मदेसाईगंज, वडसा जि. गडचिरोली ( महाराष्ट्र ).

    ७)   बदक विस्तार केंद्रकैलारुले, जि. कृष्णा ( आंध्र प्रदेश ).

    ८)   आराम डक फार्म, सिबसागर.

    ९)   हरियाना कृषी विद्यापीठ, हिसार.

    बदकपालन आणि फायदे

    बदके पाळण्यासाठी कायमस्वरूपी पाणीसाठा असावा लागतो. लहान तळी, मोठी तळी, शेततळी, गावतळी, धरणं इ. ठिकाणी बदकपालन करता येऊ शकतं.

    उपलब्ध बारमाही अगर वाहत्या पाण्यात मत्स्यपालन आणि बदकपालन हि संकल्पना अगर प्रयोग माझ्यामते करून पाहायला पाहिजे.  यशस्वी  झाला तर दोन फायदेशीर व्यवसाय एकाच ठिकाणी अतिशय कमी मॅनेजमेंटमध्ये करता येऊ शकतील.

    सध्या बदकपालन समुद्र किनारपट्टीलगत भातशेतीत केलं जाते.  बदके पाळण्यासाठी कायमस्वरूपी पाणीसाठा असावा लागतो.  लहान तळी, मोठी तळी,  शेततळी,  गावतळी, धरणं इ.  ठिकाणी बदकपालन करता येऊ शकतं.  बदकाचं मुख्य खाद्य म्हणजे भातशेतीतल्या गोगलगाई, तसेच अनेक प्रकारच्या किडी, पाण – वनस्पती, शेवाळ, पाण्यातील किडे, जीवजंतू, गांडुळे, कृमी, हिरव्या वनस्पती इ.  बदके ज्वारी – बाजरीचे दाणे, कडधान्यांचे दाणेही खातात.

    बदकाची जी वैशिष्ट्ये आहेत अगर त्यांची जी जीवनप्रणाली आहे ती व्यवसायाच्या दृष्टीने फायद्याचीच आहे.  दक्षिणेत बदक व्यवसाय हा  मेंढपाळीसारखा आहे.

    बदकाची वैशिष्ट्ये

    1. एका गावातून दुसऱ्या गावात जिथे जाण्याची उपलब्धता असते तिथे जातात.
    2. रात्रीच्या वेळी बदके शेतात एका ठिकाणी ठेवतात आणि सकाळी अंडी गोळा करतात.
    3. शिवाय रात्रभर शेतात बसवल्याबद्दल (मूत्र खत यांच्या मोबदल्यात) शेतकऱ्यांकडून पैसेही घेतात.
    4. बदकं कोंबड्यांपेक्षा जास्त काटक असतात.
    5. कोंबड्यांपेक्षा वाढही जलद होते.
    6. अंडी मोठी असून ते देण्याचं प्रमाणही जास्त असते.
    7. खाद्यावरचा खर्च कोंबडीच्या तुलनेत निम्माच असतो.
    8. बदकाच्या घर व्यवस्थापनासाठी जास्त खर्च येत नाही.
    9. कोंबडीच्या तुलनेत बदकांची फारशी काळजी घ्यावी लागत नाही.
    10. बदके रात्रीच्या वेळी अंडी देतात.  श्यक्यतो १००% बदके रात्री ते सकाळी ९ वाजेपर्यंत अंडी घालतात आणि त्यानंतर त्यांना चरायला सोडता येतं.
    अशा अनेक गुणवैशिष्ट्यांमुळे बदक पालनाचे अनेक फायदे आहेत.  ते असे –

    बदक पालनाचे फायदे

    1. बदकामध्ये रोग प्रतिकार शक्ती जास्त असते त्यामुळे रोगराईचं प्रमाण कमी असतं.
    2. बदक कळपात राहत असल्याने त्यांची संरक्षण मॅनेजमेंट सोयीची असते.
    3. १००% बदकं रात्री ते सकाळी ९ पर्यंत अंडी घालतात.  त्यामुळे सर्वच्या सर्व अंडी पदरात पडतात.
    4. बदके चरायला सोडल्यानंतर स्वतःचे अन्न स्वतः शोधतात.  चरणं झाल्यानंतर रात्री मूळ जागेवर येण्याची त्यांना  तंतोतंतपणे सवय लावता येते.
    5. दलदलीच्या रेताड पाणथळ जागेवर बदकपालन करता येते.
    6. देखभालीवराचा खर्च कमी.
    7. अंडी मोठी असून पौष्टिक असतात.  (फक्त आपल्याला बदक अंडी खाण्याची हॅबिट लावून घेणं जरुरीचं आहे.)  बदकांच्या मांस उत्पादनासाठी मस्कोव्ही, पेंकिंग या जाती आहेत.

    बदकांच्या अंडी उत्पादनासाठी ऑरपिंगटन, खाकी कॅम्पेबल, इंडियन रनर, म्यॉग पाईन व्हाईट स्टॅनब्रिज या जाती असून खाकी कॅम्पेबल आणि इंडियन इंडियन रनर या दोन जाती आपल्याकडे जास्त प्रमाणात पाळतात.  त्या वर्षाकाठी ३०० अंडी देतात, इतर जाती वर्षाकाठी १७५ ते २५० अंडी देतात.  शोभेची बदके शोभिवंत, देखणी असून सोनेरी, लाल, जांभळी, निळी, काळी, पांढरी. पिवळी इ.  छटायुक्त असतात.  टील विडजन, पिनटेन, करोलिना शोव्हेलियर या जाती शोभिवंत बदकाच्या आहेत. बदक प्रजोत्पादनासाठी १० महिन्यांनी तयार होते.  ५ – ६ महिन्यांनी झाली म्हणजे अंडी देतात.  एक नर ४ – ५ माद्यांसाठी ठेवावा.

    बदकांना मुबलक पाणी असावेच लागते.  ६’ × ६’ × १.५’ च्या टाक्यात १० बदके पाळता येतात.  पाण्याच्या उपलब्धतेजवळच बांबू, तुराट्या, तट्ट्याच्या साह्याने घर करता येतं.  प्रत्येक बदकास २ चौ. फुट जागा पुरेशी होते.  घराभोवती कंपाउंड करून मोकळी सोडवीत.  कोंबड्यांच्या खाद्याप्रमाणे प्रथिनयुक्त उर्जायतुक्त राजे १२० ते १५० ग्रॅम खाद्य द्यावं.  ७ आठवड्यांत ८ किलो खाद्य खाऊन २.५ किलो वजनाची बदके होतात.  कोंबडीच्या पिलांप्रमाणे पिल्लांची जोपासना करावी.  सुरुवातीला ३० सें. ग्रॅ.  तापमान ठेवावे नंतर दर आठवड्याला ३.४ सें. ग्रॅ. नी तापमान कमी करीत जावे.  सुरुवातीला प्रथिनं आणि उर्जा मिळवण्यासाठी खाद्य द्यावं.  ते वय वाढीनुसार वाढवावे.  चौथ्या आठवड्यांपासून पिल्लांना मोकळं सोडावं.  पाणी सतत पाहिजेत नाही तर डोळ्यांचे विकार होतात.

    टर्की पालन

    भारतामधील टर्कीच्या प्रजाती

    1.बोर्ड ब्रेस् टेड ब्रॉन्झ: 
    पिसांचा मूळ रंग किरमिजी नसून काळा असतो. मादीच्‍या छातीवर पांढरी टोके असलेली काळ्या रंगाची पिसे असतात, ज्‍यायोगे 12 आठवड्यांच्‍या वयातच लिंग निर्धारणात मदत होते.

    2. बोर्ड ब्रेस्टेडव् हाइट:
    ही बोर्ड ब्रेस्‍टेड ब्रॉन्‍झ आणि पांढरी पिसे असलेली व्‍हाइट हॉलंड यांची संकर प्रजाती आहे.पांढरी पिसे असलेली टर्की ही भारतीय शेती-हवामान परिस्थितींना उपयुक्‍त असल्‍याचे आढळते कारण त्‍यांच्‍यात उच्‍च उष्‍णता सहन करण्‍याची क्षमता आहे तसेच स्‍वच्‍छता केल्‍यानंतर त्‍या सुरेख व स्‍वच्‍छ दिसतात.   

    3. बेल्‍ट्सव्हिले स्‍मॉल व्‍हाइट:
    बोर्ड ब्रेस्‍टेड व्‍हाइटशी साम्‍य असलेली ही टर्की आकाराने लहान असते. अंड्यांचे उत्‍पादन, प्रजनन आणि अंडी उबविण्‍याची उच्‍च क्षमता असून वजनी प्रजातींपेक्षा अंडी उबवून फोडण्‍याची क्षमता कमी असते. 

    4. नंदनाम टर्की 1 
    नंदनाम टर्की -1 प्रजाती काळ्या देशी आणि लहान पांढरी परदेशी बेल्‍टसव्हिले जातीची संकर आहे. ही तामिळनाडुच्‍या हवामानाच्‍या परिस्थितींसाठी उपयुक्‍त आहे.

    टर्की संवर्धनाची आर्थिक परिमानके

    नर-मादी प्रमाण

    1:5

    अंड्याचे सरासरी वजन

    65 ग्राम

    एक दिवसाच्‍या लहान पिलाचे सरासरी वजन

    50 ग्राम

    लैंगिक परिपक्‍वतेसमयीचे वय

    30 आठवडे

    अंड्यांची सरासरी संख्या

    80 -100

    उबविले जाण्‍याचा कालावधी

    28 दिवस

    20 आठवड्यांत शारीरिक वजन

    4.5 – 5 (मादी)
    7-8 (नर)

    अंडी उत्‍पादन कालावधी

    24 आठवडे

    विक्रीयोग्‍य वय
    नर
    मादी

     

    14 -15 आठवडे
    17 – 18 आठवडे

    विक्रीयोग्‍य वजन
    नर
    मादी

     

    7.5 किलोग्राम
    5.5 किलोग्राम

    खाद्य योग्‍यता

    2.7 -2.8

    विक्रीयोग्‍य वय होईपर्यंत सरासरी आहार
    नर
    मादी

     

    24 -26 किलोग्राम
    17 – 19 किलोग्राम

    अंडी उबविण्‍याच्‍या काळातील मृत्‍युदर

    3-4%

    टर्की प्रबंधनाच्या पद्धती

    ए) अंडी उबविणार्‍या कोंबड्यांसह नैसर्गिक उष्‍मायन:

    टर्की नैसर्गिकत:च चांगली ब्रूडर (अंडी उबविणारी) असते आणि अशी ब्रूडर कोंबडी 10-15 अंडी उबवू शकते. चांगले कवच आणि स्‍वच्‍छ तसेच चांगला आकार असलेली अंडीच फक्‍त उबविण्‍यासाठी ठेवावी ज्‍यायोगे 60-80% उष्‍मायन क्षमता आणि सुदृढ पिले प्राप्‍त होतील.

    बी) कृत्रिम उष्‍मायन:

    कृत्रिम उष्‍मायनात, इन्क्यूबेटरच्‍या मदतीने अंडी उबवितात. तापमान आणि सेटरमधील सापेक्ष आर्द्रता आणि उष्‍मनकारक खालील प्रमाणे आहेत:

    तपमान (डिग्री फे.)

    सापेक्ष आर्द्रता (%)

    सेटर 99.5

    61-63

    उष्‍मनकारक (हॅचर) 99.5

    85-90

    अंडी दर रोज एका तासाभराच्‍या अंतराने फिरवावीत. अंडी वारंवार एकत्र करावीत म्‍हणजे ती मळणार व फुटणार नाहीत तसेच चांगले उष्‍मायन ही मिळेल.

    उष्मायन (अंडी उबविणे

    टर्कीच्‍या बाबतीत 0-4 आठवड्यांच्‍या काळास उष्‍मायन काळ म्‍हणतात. तथापि, हिवाळ्यात उष्‍मायन काळ 5 ते 6 आठवड्यांपर्यंत वाढतो. मुख्‍यत्‍वे टर्कीच्‍या लहानग्‍यांना कोंबडीच्‍या पिलांच्‍या तुलनेत घिरट्या घालण्‍यासाठी दुप्‍पट जागेची गरज असते. एक दिवस वयाच्‍या पिलांना उबविण्‍यासाठी तांबड्या (लाल) रंगाच्‍या बल्बचा वापर केला जाऊ शकतो किंवा गॅस ब्रूडर आणि परंपरागत उष्‍मायन पध्‍दतीदेखील वापरता येतात.

    ब्रूडिंगच्या काळांत लक्षात ठेवण्यासारख्या बाबी
    • 0-4 आठवडे वयाच्‍या प्रत्येक पक्ष्‍यासाठी 1.5 चौ.फू. जागेची आवश्यकता असते.
    • लहानग्‍या पिलांच्‍या आगमनाच्‍या कमीत कमी दोन दिवस आधी उष्‍मायन गृह तयार ठेवावे.
    • लहानग्‍या पिलांनी उष्‍णतेच्‍या स्‍त्रोतापासून लांब हिंडू नये म्‍हणून, कमीत कमी 1 फूट उंचीचे कुंपण लावावे.
    • 2 मीटर व्यास असलेल्‍या वर्तुळाकृती जागेत केर-कचरा पसरवून ठेवावा.
    • आरंभिक तपमान 95 डिग्री फे. ठेवावे ज्‍यामध्‍ये 4 आठवड्याच्‍या वयापर्यंत दर आठवडा 5 डिग्री फे. कपात करावी.
    • उथळ पाण्‍याचा वापर करावा.

    • जन्‍माच्‍या 4 आठवड्यांच्‍या दरम्‍यान सरासरी मृत्यु दर 6-10 टक्‍के आहे. सुरूवातीच्‍या काही दिवसांत लहानगी पिले, अंधुक दृष्टी आणि गोंधळल्‍यासारखी अवस्‍था असल्‍याने, मुळातच जास्‍त खात-पीत नाहीत. म्‍हणून, त्‍यांना बळेच भरवावे लागते.
    लहान पिलांना खायला घालणे (बळेच भरवणे)

    लहानग्‍या पिलांमध्‍ये उपाशी राहण्‍याची समस्या अकाली मृत्यु दराच्‍या मुख्‍य कारणांपैकी एक आहे. म्‍हणून खायला घालतांना आणि पाणी पाजतांना फार जासत काळजी घ्‍यावी लागते. बळेच भरवितांना, पंधरा दिवसांपर्यत दर 10 पिलांना प्रत्‍येकी 1 ह्या दराने दर 1 लीटर पाण्‍यासह 100 मिली दूध आणि एक उकडलेले अंडे द्यावे. ह्यामुळे पिलांमध्‍ये प्रथिने आणि पोषक आहार यांची भरपाई होईल.

    बोटांनी डब्‍यावर थापटून हलका आवाज केल्‍याने लहानगी पिले खाद्याकडे आकर्षित होतात. खाद्य व पाण्‍यात रंगीत गोट्या किंवा खडे टाकल्‍यासदेखील देखील पिलांना खाण्‍याकडे आकर्षित करता येईल. टर्कीना हिरवा पाला आवडतो त्‍यामुळे चिरलेली हिरवी पाने त्‍यांच्‍या खाद्यात वाढ करण्‍यासाठी घालता येतात. तसेच सुरूवातीच्‍या 2 दिवसांत अंड्यांची रंगीत फिलर्स देखील वापरता येतील.

    केर कचरयाची सामग्री

    उष्‍मायनासाठी वापरण्‍यात येत असलेली सामान्‍य केर-सामग्री म्‍हणजे लाकडी भुसा, तांदुळाचा पेंढा, इत्‍यादी. सुरूवातीस ह्या सामग्रीचा 2 इंच उंचीचा थर घालावा ज्‍यामध्‍ये हळू-हळू भर घालत 3 ते 4 इंच करू शकता. केर सामग्री सडू नये म्‍हणून वारंवार फिरवित राहावे.

    पालन पध्दती

    टर्कीचे पालन मुक्त सीमा किंवा गहन प्रणालीच्‍या अंतर्गत केले जाऊ शकते.

    टर्कीना पकडणे आणि हाताळणे

    टर्कीना पकडणे आणि हाताळणे

    टर्कीसाठी फर्शी/लादीफीडर आणि पाण्याच्याजागेची आवश्यकता

    वय

    फर्शीचीजागा
    (चौ.फू.)

    फीडरची जागा(सें.मी)
    (लीनिअरफीडर)

    पाण्याची जागा(सें.मी.)
    (लीनिअर फीडर)

    0-4 आठवडे

    1.25

    2.5

    1.5

    5-16 आठवडे

    2.5

    5.0

    2.5

    16-29 आठवडे

    4.0

    6.5

    2.5

    टर्की ब्रीडर

    5.0

    7.5

    2.5

     

    टर्कीचा स्‍वभाव साधारणपणे मवाळ असतो; म्‍हणून त्‍या नेहमीच गोंधळलेल्‍या असतात. म्‍हणून टर्कीच्‍या निवासांत पाहुण्यांना प्रवेश प्रतिबंधित असावा.

    चंचुविच्छेदन (चोच मोडणे)

    आपसांतील जीवघेणी भांडणे आणि पिसे उपसून काढणे ह्यावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी लहानग्‍या टर्कींचे चंचुविच्‍छेदन केले पाहिजे. चंचुविच्‍छेदन 3 ते 5 आठवड्याच्‍या वयांत करण्‍यात यावे. नाकपुडीपासून चोचीपर्यंतच्‍या अर्ध्‍या लांबीत चंचुविच्‍छेदन करावे.

    आगवळ काढणे

    आगवळ काढण्‍याचे कारण म्‍हणजे भांडणात डोक्‍याला काही इजा होऊ नये. एक दिवसाचे पिलू असतांना फक्‍त बोटांनी दाबूनच आगवळ काढता येते. 3 आठवडे झाल्‍यानंतर तीक्ष्‍ण कात्रीने डोक्‍याजवळून आगवळ कापावी लागते.

    अंगुली विच्छेदन

    एक दिवसांचे पिलू असतांना संपूर्ण पायाच्‍या बोटांच्‍या नखांच्‍या बाह्यतम पॅडसह अग्रटोक कापून टाकतात.

    आहार/खाद्य

    मॅश फीडिंग आणि पॅलेट फीडिंग ह्या खायला घालण्‍याच्‍या पध्‍दती आहेत.

    • कोंबडीच्‍या पिल्‍लाच्‍या तुलनेत टर्कीच्‍या गरजा उर्जा, प्रथिने, व्हिटॅमिन आणि खनिजे ह्या उच्‍च आहेत.
    • दोन्‍ही लिंगांसाठी प्रथिनांची आवश्यकता भिन्न असल्‍यामुळे चांगले परिणाम मिळविण्‍यासाठी त्‍यांचे पालन वेग-वेगळे करायला पाहिजे.
    • खाद्य फीडरमध्‍ये द्यावे जमिनीवर नाही.
    • खाद्य परिवर्तन केव्हाही केल्‍यास हळू-हळू करावे.
    • टर्कींना नेहमीच एक स्थिर आणि स्वच्छ पाणी पुरवठ्याची गरज असते.
    • उन्‍हाळ्यात तुर्कींना जास्‍त पाणी द्यावे.
    • उन्‍हाळ्यात तुर्कींना दिवसाच्‍या थंड भागांतच खायला द्यावे.
    • प्रत्‍येक पक्ष्‍याला दर रोज 30-40 ग्राम शिंबुक शल्‍व खायला द्यावे म्‍हणजे पायांत बळकटी येईल.

    गहन पध्‍दतीत, एकूण आहाराच्‍या 50 टक्‍के हिरवा पाला वाळवून चुरून खायला द्यावा. सर्व वयोगटातील तुर्कींसाठी ताजे विलायती गवत (अश्‍व तृण) सर्वोत्तम खाद्य आहे. डिस्‍मॅन्‍थस व स्‍टायलोखेरीज हे गवत चिरून तुर्कींना खायला घातल्‍यास लागत मूल्‍यात कपात करता येते.p>

    प्रजनन पध्दती

    नैसर्गिक सहवास:

    प्रजननक्षम नराच्या प्रजनन वर्तनास स्‍ट्रट असे म्‍हणतात, ज्‍या काळाच्‍या दरम्‍यान हा नर पंख पसरून एक विशिष्‍ट प्रकारचा आवाज निरंतर काढत राहतो. नैसर्गिक सहवासाच्‍या दरम्‍यान, मध्‍यम प्रकारच्‍या तुर्कींमध्‍ये नर:मादी सरासरी प्रमाण 1:5 आहे आणि मोठ्या पक्ष्यांमध्‍ये 1:3 आहे. सरासरी प्रमाणात एका मादीकडून 40-50 पिल्‍लांची अपेक्षा केली जाते. प्रौढ नरांचा वापर पहिल्‍या वर्षानंतर प्रजनन क्षमता कमी होण्‍याने क्‍वचितच केला जातो. एकाच विशिष्‍ट मादीकडे आकर्षित होण्‍याचा प्रौढ नराचा कल असतो त्‍यामुळे दर 15 दिवसांनी नर बदलावे लागतात.

    कृत्रिम गर्भाधान:

    टर्की संचाकडून/कळपाकडून संपूर्ण ऋतुभरात उच्‍च प्रजनन क्षमता प्राप्‍त करण्‍यासाठी कृत्रिम गर्भाधान फार लाभदायी ठरते.

    प्रौढ नराकडून वीर्य संग्रह करणे

    • वीर्यदाता नराचे वय 32-36 आठवडे असावे.
    • वीर्यदान करण्‍यापूर्वी नरास कमीत कमी 15 दिवस एकांतात ठेवावे.
    • नरास नियमितपणे हाताळावे आणि वीर्य संग्रह करण्‍याचा काळ 2 मिनिटाचा असावा.
    • नर हाताळण्‍याबाबत अत्‍यंत संवेदनशील असतात त्‍यामुळे प्रत्‍येक वेळी जास्‍तीत जास्‍त वीर्य घेण्‍यासाठी तोच कर्मचारी असावा.
    • वीर्याचे सरासरी प्रमाण 0.15 ते 0.30 एमएल असते.
    • वीर्य प्राप्‍तीनंतर एका तासांत त्‍याचा वापर करण्‍यात यावा.
    • एका आठवड्यांत तीनदा किंवा एक दिवसाआड वीर्य संग्रह करावा.

    कोंबड्यांचे गर्भाधान:

    • जेव्‍हा कळप/संच 8-10 टक्‍के अंडी उत्‍पादनापर्यंत पोहोचतो तेव्‍हा कृत्रिम गर्भाधान करण्‍यात येते.
    • दर तीन आठवड्यांनी 0.025-0.030 मिली अनडायल्‍यूटेड वीर्याने कोंबड्यांचे गर्भाधान करा.
    • ऋतुसमाप्‍तीनंतर 12 आठवड्यांनी पंधरा दिवसांनी एकदा गर्भाधान करावे.
    • कोंबडीचे गर्भाधान सायंकाळी 5-6 वाजता करावे.
    • 16 आठवड्यांच्‍या प्रजनन काळांत सरासरी 80-85 टक्‍के प्रजजन व्‍हायला पाहिजे.

    लाव पक्षी पालन

    लाव पक्षी पालन हा कमी जागेत, कमी खर्चात रोजगारासाठी एक उत्तम पर्याय होऊ शकतो.


    लाव संवर्धनाचे फायदे

    • कमीतकमी जागेची गरज
    • कमी भांडवलाची गरज
    • लाव पक्षी तुलनात्‍मकरीत्‍या बळकट असतात
    • पांच आठवड्यांसारख्‍या लहानशा वयात विक्रीसाठी तयार
    • जलद लैंगिक परिपक्‍वता – वयाच्‍या सहा किंवा सातव्‍या आठवड्यात अंडी देण्‍यास सुरूवात करतात
    • अंडी घालण्‍याचा दर उच्‍च – वर्षाला 280 अंडी
    • लावेचे मांस कमी चरबीयुक्‍त आणि चिकनपेक्षा जास्त चविष्‍ट असते. हे खाल्‍ल्‍याने मुलांचे शरीर आणि मेंदूचा विकास चांगला होतो.
    • पोषणाच्‍या दृष्टीने, लावेची अंडी कोंबडीच्‍या अंड्यांपेक्षा कोठेही कमी नाहीत. शिवाय, त्‍यांच्‍यात कमी कोलेस्‍ट्रॉल असते.
    • लावेचे मांस आणि अंडी ही गरोदर व स्‍तनपान देणार्‍या स्‍त्रीसाठी पोषक आहार आहे.

    पाळणे

    ह्याचे दोन प्रकार आहेत
    डीप लिटर पध्‍दत
    • एक चौरस फूट जागेमध्‍ये 6 लाव पक्षी राहू शकतात.
    • 2 आठवड्यांनतर, लावांना पिंजर्‍यात वाढवता येते. ह्यामुळे वजन चांगले वाढते कारण इथेतिथे निष्कारण हिंडण्यात त्यांची शक्ती खर्च होत नाही.

    पिंजरा पध्‍दत

    वय

    पिंजरयाचा आकार

    पक्ष्यांची संख्या

    पहिले 2 आठवडे

    3 x 2.5 x 1.5 फूट.

    100

    3- 6 आठवडे

    4 x 2 .5 x 1.5 फूट.

    50

    • प्रत्‍येक युनिट सुमारे 6 फूट लांबीचे आणि 1 फूट रूंद असते, आणि 6 सबयुनिटसमध्‍ये विभाजित केलेले असते. जागा वाचविण्‍यासाठी, जास्तीतजास्त 6 पिंजरे एकमेकांवर रचून ठेवता येतात. एका रांगेत 4 ते 5 पिंजरे ठेवता येतात. पिंजर्‍यांचा तळ काढता येण्‍याजोगा व लाकडी असतो जेणे करून पक्ष्‍यांचे मलमूत्र स्‍वच्‍छ करता येते. लांब अरूंद हौद (ज्‍यांमध्‍ये आहार असतो) पिंजर्‍यांच्‍या समोर ठेवतात. पाण्‍याचे हौद पिंजर्‍यांच्‍या मागच्‍या बाजूला ठेवतात. व्‍यावसायिक पातळीवर अंडी देणार्‍या पक्ष्यांना दर पिंजरा 10-12 पक्षी याप्रमाणे वसाहतींमध्‍ये ठेवतात. ब्रीडिंगसाठी, नर लावांना 1 नरास 3 माद्या ह्याप्रमाणे पिंजर्‍यांमध्‍ये पाठवितात.

    आहार व्यवस्थापन

    आहारातील घटक

    चिक मॅश

    ग्रोअर मॅश

     

    0-3 आठवडे

    4-6 आठवडे

    ज्‍वारी

    27

    31

    सोरगम

    15

    14

    तेलरहित तांदुळाचा भुसा

    8

    8

    शेंगदाण्‍याची पेंड

    17

    17

    सूर्यफुलाची पेंड

    12.5

    12.5

    सोया आहार

    8

    -

    मत्‍स्य आहार

    10

    10

    खनिजांचे मिश्रण

    2.5

    2.5

    शंखाची भुकटी

    -

    5

    • आहार सामग्रीचे कण बारीक असावे.
    • एक 5 आठवडे वयाचा लाव पक्षी सुमारे 500 ग्राम आहार घेतो.
    • 6 महिन्‍यांचे लाव पक्षी, दररोज सुमारे 30-35 ग्राम आहार घेतात.
    • लाव पक्ष्‍यांना 12 अंड्यांच्‍या उत्‍पादनासाठी 400 ग्राम आहाराची गरज असते.
    • ब्रॉयलर स्‍टार्टर मॅशचा वापर 75 आहारांमध्‍ये 5 किलोग्राम तेल पेंड मिसळून करतात. आहाराच्‍या कणांचा आकार आहारास परत एकदा दळून घेऊन कमी करता येतो.

    लाव फार्मचे व्यवस्थापन

    lav 1.jpg

    • सहा आठवड्यांचे झाल्‍यावर, मादी लाव पक्ष्‍याचे वजन 175-200 ग्राम असते आणि नरांचे सुमारे 125-150 ग्राम असते.
    • मादी लाव पक्षी 7 आठवड्यांचे झाल्‍यावर अंडी घालण्‍यास सुरूवात करतात आणि वयाच्‍या 22 आठवड्यांपर्यत अंडी घालतात.
    • साधारणपणे, अंडी घालण्‍याची वेळ संध्‍याकाळची असते.
    • लावेच्‍या अंड्याचे वजन 9 ते 10 ग्राम असते.
    • नर लाव पक्ष्‍याची छाती बहुतेक अरूंद आणि भुर्‍या व पांढर्‍या रंगाच्‍या पिसांनी आच्‍छादित असते. पण मादी लावेची छाती रूंद असून त्‍यावर काळे ठिपके असलेली भुरी पिसे असतात.
    • चार आठवड्यांचे झाल्‍यावर नर आणि मादी यांना वेगवेगळे ठेवावे.
    • अंडी उत्‍पादक लावांना दिवसातून सोळा तास प्रकाश मिळायला हवा.

    लाव पिलांचे व्यवस्थापन

    एक दिवसाच्‍या लाव पिलाचे वजन साधारणपणे 8-10 ग्राम असते. म्‍हणून ह्या पिलांना जास्‍त तपमानाची गरज असते. पुरेसे तपमान नसणे आणि वेगवान थंड हवेच्‍या संपर्कात आल्‍यास ही पिले दाटीने एकत्र येतात (क्लस्टरिंग) आणि परिणामी त्यांचा मरण दर वाढतो.

    पुनरुत्पादन

    lav 2.jpg
    लावेची अंडी

    • वयाच्‍या 7व्‍या आठवड्यात लाव पक्षी अंडी घालू लागतात. वयाच्‍या 8व्‍या आठवड्यापर्यंत त्यांनी 50 टक्‍के अंडी उत्‍पादन केलेले असते.
    • प्रजननक्षम अंडी घालण्‍यासाठी, नर लावांना माद्यांबरोबर वयाच्‍या 8 ते 10 आठवडे एकत्र ठेवायला पाहिजे.
    • नर-मादी सरासरी 1:5 आहे. [chk orig text – in ‘cage system’ above it says 1:3 ratio]
    • लावांमध्‍ये उबविण्‍याचा काळ 18 दिवस असतो.
    • 500 मादी लावांपासून आपण दर आठवड्यास 1500 लाव पिले मिळवू शकतो.

    लावांचे रोग

    • मादी ब्रीडर लावेमध्‍ये जीवनसत्‍वे आणि खनिजांची कमतरता झाल्‍यास, त्‍यांच्‍या प्रजननक्षम अंड्यापासून प्राप्‍त झालेली पिले बहुतेक अशक्‍त व कमकुवत पायांची होतात. ह्यापासून बचाव करण्‍यासाठी मादी लावांना पुरेशी खनिजे आणि जीवनसत्‍वयुक्‍त आहार द्यायला पाहिजे.
    • साधारणपणे लाव पक्षी चिकनच्‍या तुलनेत जास्‍त रोगप्रतिरोधक असतात. त्‍यामुळे लावांसाठी लसीकरणाची गरज भासत नाही.
    • लाव पिलांच्‍या योग्‍य व्‍यवस्‍थापनासाठी, फार्मच्‍या जागेला निर्जंतुक करणे, पिण्‍यासाठी स्‍वच्‍छ पाणी पुरविणे आणि उच्‍च गुणवत्तायुक्‍त आहार दिल्‍यास लाव पक्ष्‍यांचा रोगांपासून बचाव होईल.

    लावेचे मांस

    lav 3.jpg
    लावेचे मांस

    ड्रेस्‍ड लावेचे मांस जिवंत लावेच्‍या वजनाच्‍या 70-73% असते. 140 ग्राम वजनाच्‍या लावेपासून 100 ग्राम मांस मिळते.

    लाव संवर्धनातील आव्हाने

    • नर लाव पक्षी मानवाला त्रासदायक वाटणारा आवाज काढतात.
    • नर व मादी लाव पक्ष्‍यांना एकत्र वाढवितांना, नर लाव पक्षी इतर नरांचे डोळे फोडून त्‍यांना आंधळे करतात. क्‍वचित समयी, काही नर मृत देखील आढळतात.

    Comments

    Popular posts from this blog

    महार

    चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला. म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!☝

    मांग