भारताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ १० योद्धे कोण?


InMarathi

भारताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ १० योद्धे कोण?

shivajin mharaj inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुकट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारत देश हा नररत्नांची खाण आहे. अनेक शूर लढवय्यांची नावं भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेली आहेत. प्रत्येक शूरवीर योद्ध्याने युद्धभूमीवर वीरश्री गाजवून पुढील पिढ्यांना गर्व वाटावा आणि प्रेरणा मिळावी असे कार्य केले आहे. ह्या वीरांकडे दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास, संघटनशक्ती, नेतृत्वक्षमता, काळाच्या पुढील प्रशासकीय योजना हे अंगभूत गुण होते.

ह्याशिवाय अपार कष्ट व गुरुजनांची शिकवण ह्यामुळे त्यांनी वेळोवेळी लोकांचे राष्ट्राचे परकीय आक्रमणापासून रक्षण केले व जगासमोर आदर्श निर्माण केले.

आज आपण ह्याच सर्वश्रेष्ठ योद्द्यांपैकी काहींबद्दल जाणून घेणार आहोत.

 १) राजेंद्र चोला

 

rajendra-chola-marathipizza

 

हे तामिळ राजवंशातील एक महान राज्यकर्ते होते. ते त्यांच्या उत्तम प्रशासनासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी त्यांच्या राज्याचा विस्तार लक्षद्वीप, मालदीव, अंदमान, निकोबार, म्यानमार मधील सागरकिनाऱ्यापर्यंत केला होता. त्या काळी त्यांचे साम्राज्य अतिशय शक्तिशाली म्हणून ओळखले जात असे.

२) राजा अकबर

 

akbar-marathipizza
http://www.culturalindia.net

मुघल शासकांच्या तिसऱ्या पिढीत राजा अकबराचा जन्म झाला. तो अतिशय हुषार, पराक्रमी व धोरणी म्हणून ओळखला जात असे. त्याच्या साम्राज्याचा विस्तार संपूर्ण उत्तर व मध्य भारतापर्यंत झाला होता.

राजा अकबर अनेक प्रकारच्या युद्धतील डावपेचांचा जनक म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या डावपेचांचा नंतर अनेक राजांनी उपयोग केला. ह्या डावपेचांविषयी अनेक पुस्तकांत वर्णन केलेले आढळते.

 

३) शेर शाह सूरी

 

sher-shah-suri-marathipizza
thefamouspeople.com

शेर शाह सूरी हा फरीद खान किंवा शेर खान म्हणून सुद्धा ओळखला जात असे. भारतामध्ये सूर राज्याची त्याने स्थापना केली. ह्यानेच मुघलांचा पाडाव करून राज्य मिळवले. भारताच्या इतिहासात सर्वात शूर सेनापती म्हणून शेर शाह सुरीचे नाव घेतले जाते.

असं म्हणतात की बिहार च्या जंगलात ह्याने निशस्त्र असताना एका वाघाला ठार केले होते. ज्यामुळे त्याच्या पराक्रमाची कीर्ती सर्वदूर पसरली.

४) राणा सांगा

 

rana-sanga-marathipizza
en.wikipedia.org

महाराज संग्राम सिंग ह्यांनाच राणा सांगा म्हणून ओळखले जाते. ते अतिशय शूर राजपूत योद्धा व महान राजा म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या खास व वेगळ्या युद्ध कौशल्यामुळे त्यांनी अनेक युद्धांमध्ये विजय प्राप्त केला. रणथंबोर चा किल्ला ह्यांनीच काबीज केला.

 

५) चंद्रगुप्त मौर्य

 

Chandragupt Mory-marathipizza
liveaaryaavart.com

अखंड भारताची स्थापना करणारे चंद्रगुप्त मौर्य ह्यांना चक्रवर्ती सम्राट असेही म्हणतात. मौर्यांच्या राजवटीत संपूर्ण भारत एकछत्री अंमलाखाली होता. त्यांच्यासारखा शूर आणि पराक्रमी राजा आजवर परत भारतात झाला नाही. ग्रीक आणि लॅटिन इतिहासात सुद्धा ह्या राजाच्या विजयाचे वर्णन केले आहे. कारण त्यांनी जगज्जेत्या सिकंदराचा पराभव केला होता.

 

६) चंद्रगुप्त दुसरा – राजा विक्रमादित्य

 

raja-vikramaditya-marathipizza
shankhnad.org

ह्या राजाने उत्तर भारतात बराच काळ राज्य केले. राजा समुद्रगुप्ताचा हा मुलगा मुलगा म्हणजे राजा विक्रमादित्य होय. गुप्त राजवटीचा काळ हा भारतातील सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो.

हा राजा अतिशय शूर, निर्भीड आणि प्रजेसाठी झटणारा होता. त्याने अतिशय कष्टाने व प्रयत्नाने राज्याचा भरपूर विस्तार केला.

 

७) राजा समुद्रगुप्त

 

samudragupta-marathipizza
delhionweb.com

ह्या राजाने त्याच्या राज्यात अनेक चांगल्या गोष्टी घडवल्या. अनेक युद्धांमध्ये विजय मिळवला म्हणून जगात त्याची ओळख चक्रवर्ती सम्राट अशी होती. आक्रमकता आणि युद्धनीती ह्या दोन गोष्टींच्या बळावर त्याने राज्याचा पार दक्षिणेपर्यंत विस्तार केला.

उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पश्चिमेपासून ते बंगालच्या उपसागरापर्यंतचे साम्राज्य त्याने त्याच्या अधिपत्याखाली आणले होते.

 

८) झाशीची राणी लक्ष्मीबाई

 

lakshmibai-marathipizza

झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या वीरतेबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल माहित नसलेला भारतीय माणूस सापडणे अवघड आहे. राणी लक्ष्मीबाईने स्वतःच्या छोट्या पण शूरवीर सैन्यासह अवाढव्य ब्रिटिश सैन्याशी लढा देऊन स्वातंत्र्याच्या उठावात मोलाचे योगदान दिले.

राणी लक्ष्मीबाईंचे नाव इतिहासात अमर आहे. एक स्त्री किती शूर असू शकते आणि प्रसंगी स्वतःच्या लहान बाळाला पाठीशी बांधून युद्धभूमीवर वीरश्री गाजवू शकते हे राणी लक्ष्मीबाईंनी जगाला दाखवून दिले आहे.

 

९) महाराणा प्रताप

 

maharana-pratap-marathipizza
bhaskar.com

महाराणा प्रताप राजस्थानातील अत्यंत निर्भय व पराक्रमी राजे होते. त्यांनी बादशहा अकबराविरुद्ध स्वतःच्या मातृभूमी साठी अत्यंत त्वेषाने व चिकाटीने लढा दिला. त्यांनी मातृभूमीसाठी बलिदान दिले.

त्यांच्या स्वामिनिष्ठ घोड्याचे नाव होते चेतक. त्याने सुद्धा स्वतःच्या धन्यासाठी युद्धभूमीवर बलिदान दिले.

 

१०) छत्रपती शिवाजी महाराज

 

shivaji-maharaj-marathipizza
change.org

मराठी राज्याची, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचे दैवत आहे. त्यांनी मराठी माणसाला मुघल राजवटीच्या अत्याचारातून मुक्त केले. त्यांच्या राज्यात जणू सर्वसामान्यांसाठी रामराज्यच पृथ्वीवर अवतरले असे वाटत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहा, निजामशहा, औरंगजेब ह्यांचा पाडाव करून शून्यातून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी गनिमी कावा साऱ्या जगाला शिकवला ज्याचा आजही जगभरात अभ्यास केला जातो.

ह्याच युद्धनीतीचा आदर्श समोर ठेऊन पुढे संभाजी महाराजांनी पराक्रम गाजवला. त्या पुढे ह्याच दिशेने बाजीराव पेशव्यानीं स्वराज्याची पताका सर्वदूर फडकवली.

आज जगभरात संभाजी महाराज, बाजीराव पेशवे ह्यांचा अभ्यास केला जातो…त्यांची युद्धनीती शिकली-शिकवली जाते. त्यांच्या शौर्याची मुहूर्तमेढ रोवली गेली छत्रपतीं शिवाजी महाराजांकडून!

असा आदर्श राजा परत होणे नाही!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

FacebookTwitterEmailWhatsAppSMS

Comments

Popular posts from this blog

महार

चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला. म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!☝

मांग