महार
महार कोण होते? १. महार समाजाचे वास्तव्य गांवकुसाबाहेर होते. २. महार समाज हा ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हते तर जबाबदारी होती. गावात चोरी झाली तर चोराला शोधणे आणि सापडला नाही तर चोरी गेलेल्या मालाची नुकसान भरपाई महारांनाच द्यावी लागत असे. ३. चोरांचा माग काढणे, गावात येणार्या जाणार्याची नोंद घेणे, संशयित व्यक्तींना वेशीवर चौकशीसाठी रोखणे हे त्यांचे काम होते. ४. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भभवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे. ५. महारांची स्वतंत्र चावडी असे व तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता. ६. व्यापारी जेव्हा आपले तांडे घेऊन निघत तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त करत. ७. महार हे लढवय्ये (मार्शल रेस) आहेत ही नोंद ब्रिटिशांनी करून महार रेजिमेंटच बनवली. पेशवाईच्या अस्ताचा बहुमान महारांच्याच पराक्रमाकडे जातो. ८. पेशव्यांनीही अंगरक्षक/पहारेकरी म्हणून आधी महारांनाच प्राधान्य दिले होते. ९. महार हे ग्राम/नगर/राज्य परिप्रेक्षात गुप्तहेराचे काम करत. काहीही संशयास्पद वाटले तर त्याची खबर पाटलाला वा नगराध्यक्...
Comments
Post a Comment