मौर्य साम्राज्य

मौर्य साम्राज्य

13 Feb 2018 22:10:27

 

 
 
 
 
दुर्दम्य आशावाद, अभूतपूर्व पराक्रम, कुशल राजनीतीच्या बळावर जवळपाससंपूर्ण भारतावर शासन करणार्‍या मौर्यसाम्राज्याने भारताला केवळ पराक्रमाचाइतिहासच दाखवला नाही तर प्रेम आणिकरूणेने सर्व जगाला कसे जिंकता येतेयाचे प्रत्यक्ष उदाहरण घालून दिले. हा मौर्यसाम्राज्य आणि त्याच्या पराक्रमीसम्राटांचा संक्षिप्त पण सुवर्ण इतिहास.
 
 

महाभारत युद्धानंतरचे चौथे साम्राज्य म्हणजेमौर्य अर्थात मगध साम्राज्य होते

चंद्रगुप्तमौर्य हा या साम्राज्याचा संस्थापक होता. भारताच्या इतिहासातले सर्वात मोठे साम्राज्यअसा मौर्य साम्राज्याचा लौकिक आहे. इ.स. पूर्व ३२१ ते इ.स. पूर्व १८५ पर्यंत यांचे शासनहोते. त्यावेळी मगध साम्राज्यावर नंद वंशाचेशासन होते. बलाढ्य असे हे साम्राज्य त्याच्याशेजारील राज्यांच्या डोळ्यात मात्र सलतहोते.जगज्जेता सिकंदर जेव्हा पंजाबवरचढाई करत होता तेव्हा आर्य चाणक्यांनीमगधसम्राट धनानंद याला सावध करण्याचाप्रयत्न केला. मात्र सत्तेचा माज चढलेल्याधनानंदाने त्यांचा अपमान केला. त्याचवेळीचाणक्यने मगधसम्राटाला धडा शिकविण्याचातसेच मगध साम्राज्याला योग्य शासकमिळवून देण्याचा पण केला आणि तिथून सुरूझाला मगध सम्राटाचा शोध.

 
 
भारत त्यावेळी विविध गणांमध्ये विभागलागेला होता. त्यात शाक्य, मौर्य या जातीच्याशासकांचा प्रभाव असे. चंद्रगुप्त हात्यातल्याच एका गणप्रमुखाचा मुलगा होता. एखाद्या योद्ध्याला शोभतील असे सारे गुणत्याच्यात होते. तो साहसी, पराक्रमी तरहोताच पण चांगले नेतृत्वही तो करत असे. त्याचे हे गुण चाणक्याने हेरले आणि त्यालाआपले शिष्य बनवले. चाणक्य अर्थशास्त्र, राजकारण, कूटनीती यात निपुण होतेच पणचंद्रगुप्ताला युद्धनीती शिकवून त्यांनी स्वतंत्रसैन्य तयार केले आणि बघता बघता नंदवंशाचा शेवटचा सम्राट धनानंद याची सत्तासंपुष्टात आणली. यानंतर चंद्रगुप्त मौर्य मगधसम्राट झाला आणि आर्य चाणक्य त्याचेमुख्यमंत्री झाले. चंद्रगुप्त मौर्य याने इ.स.पूर्व३२२ मध्ये या साम्राज्याची स्थापना केलीआणि पश्चिमेकडे आपल्या साम्राज्याचा वेगानेविस्तार केला. सिकंदरच्या आक्रमणानंतरछोट्या-छोट्या राज्यांमध्ये झालेल्यामतभेदांचा फायदा उठवत ते प्रदेश चंद्रगुप्तानेहस्तगत करून आपले साम्राज्य वाढवले. इ.स. पूर्व ३१६ पर्यंत मौर्य वंशाने पूर्ण उत्तर-पश्चिमभारत आपल्या अंमलाखाली आणला.
 
 
मौर्य वंशाचा चक्रवर्ती सम्राट अशोक याच्याकारकिर्दीत मौर्य वंशाचा प्रचंड विस्तार झाला. मात्र युद्ध आणि त्यातील रक्तपात यातीलफोलपणा समजल्यानंतर अशोकाने बुद्धाचाशांतीचा मार्ग अनुसरला. केवळ बौद्धधर्माचीदीक्षा घेऊन तो थांबला नाही तर त्यानेआपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्राहिला श्रीलंकेला बौद्ध धर्माच्या प्रसारासाठीपाठवले. तेथील राजा तिसा यानेही बौद्धधर्माचा स्वीकार केला. पश्चिम आशिया, ग्रीस, नैऋत्य आशिया येथेही सम्राट अशोकानेआपले अनेक धर्मप्रसारक पाठवले. मौर्यवंशाच्या महत्त्वपूर्ण शासकांमध्ये चंद्रगुप्तमौर्य, बिंदुसार आणि सम्राट अशोक यांचासमावेश होतो. चंद्रगुप्त मौर्याने तामिळनाडूआणि वर्तमानकाळातील ओडिशा हे भागवगळता भारतातील सर्व महाद्वीपांवर शासनकेले. चंद्रगुप्ताने सिकंदरचा शक्तीशालीशासक सेल्युकस निकेटरला पराभूत करूनत्यानंतरच्या तहानुसार त्याची मुलगी हेलनाशीविवाह केला. त्यामागे सशक्त साम्राज्य निर्माणकरणे आणि त्याच्या साम्राज्याशी मैत्रीपूर्णसंबंध ठेवणे हा हेतू होता. त्यामुळे भारतीयांनापश्चिमी देशांबरोबर व्यापार करणे सोपे झाले.
 
 
 
भारताला एकसंध केल्यानंतर चंद्रगुप्त आणिचाणक्य यांनी सामाजिक आणि आर्थिकबदल घडवले. त्यामुळे संपन्नता तर आलीचपण पाश्चिमात्त्य व्यापारामुळे देशाचा आंतरिकआणि बाह्य विकास साध्य झाला. मौर्यसाम्राज्य ४ प्रांतात विभागलेले होते. अशोकाच्या शिलालेखानुसार या चार प्रांतांचीनावे तोसली (पूर्व), उज्जैन (पश्चिम), सुवर्णनगरी (दक्षिण), तक्षशिला (उत्तर) अशीहोती. या प्रांतीय प्रशासनाचा प्रमुख राजपुत्रअसे. तो राजाचा प्रतिनिधी म्हणून प्रांताचाकारभार पाहत असे. त्याला सहाय्यक म्हणूनमहाअमात्य व मंत्र्यांची समिती असे. अशीचशासनव्यवस्था साम्राज्याच्या स्तरावर असे. केवळ प्रशासनाचा प्रमुख हा सम्राट तर त्यालासाहाय्य करण्यासाठी मंत्रिपरिषद असे. मौर्यसाम्राज्याचे सैन्य त्याकाळचे सर्वाधिक सैन्यहोते. ६ लाख पायदळ, ३० हजार घोडदळ व९ हजार लढाऊ हत्ती या सैन्यात होते. त्याचप्रमाणे अंतर्गत व बाह्य माहिती गोळाकरणारे हेरगिरी खातेही तैनात होते. सम्राटअशोकाने त्याच्या कालखंडात युद्ध वसाम्राज्यविस्तारास आळा घातला असला तरीअंतर्गत व बाह्य शांततेसाठी आपले सैन्यकायमठेवले होते. चंद्रगुप्ताने भव्य इराणीशहरांशी स्पर्धा करेल, अशी ६४ दरवाजे व५०० मनोरे असलेली मोठी लाकडी भिंतआपली राजधानी पाटलीपुत्रभोवती बांधलीहोती. मौर्य साम्राज्याच्या एकछत्री अंमलामुळेअंतर्गत लढायांना आळा बसला व प्रथमचसंपूर्ण भारताची एकत्र आर्थिक व्यवस्थानिर्माण झाली. वेगवेगळे कर भरण्याऐवजी‘अर्थशास्त्र’ या चाणक्यच्या ग्रंथातील तत्त्वांवरआधारित शिस्तबद्ध व उचित अशी कर आकारणी शासनाद्वारे सुरू झाली. मौर्यकालीन अर्थव्यवस्था ही त्यानंतर अनेकशतकांनी उदयास आलेल्या रोमनसाम्राज्यासारखी होती. दोन्ही साम्राज्यांचेमोठ्या प्रमाणावर व्यापारी संबंध होते. सहकारी संस्थेसारख्या संस्था होत्या.चंद्रगुप्ताने संपूर्ण भारतात एकच चलनप्रस्थापित केले. शेतकर्‍यांना, व्यापार्‍यांनान्याय तसेच सुरक्षा मिळावी याकरिताप्रांतस्तरावर प्रशासक नेमले. गुन्हेगारी टोळ्या, खाजगी, प्रांतिक सैन्य यांना डोके वर काढूदिले नाही. त्यांच्यावर ताबा मिळवला. परिणामी अंतर्गत व्यापार, राजकीयएकात्मता, अंतर्गत सुरक्षा वाढीस लागली.आंतरराष्ट्रीय व्यापारही मौर्य शासनकाळातचमसीमेवर होते. सध्या पाकिस्तान वअफगाणिस्तानच्या सीमेवरील खैबरखिंड हीया व्यापारात अतिशय महत्त्वाची होती. पश्चिम आशियातील ग्रीक राज्ये, मलयद्वीपकल्प भारताबरोबर मोठ्या प्रमाणातव्यापार करीत. भारतातून रेशीम, रेशमीकापड, कपडे, मसाले व विविध खाद्यपदार्थनिर्यात होई. युरोपबरोबर विज्ञान आणितंत्रज्ञानाची देवाणघेवाण झाल्याने साम्राज्यसमृद्ध झाले. मौर्यसम्राट अशोकाच्याकारकिर्दीत हजारो रस्ते, कालवे, जलमार्ग, दवाखाने, धर्मशाळा निर्माण झाले. धान्य वकर गोळा करण्यासंबंधीच्या अनेक कठोरकायद्यांच्या शिथिलीकरणाने साम्राज्याचीउत्पादनक्षमता वाढली. मौर्यकाळात आरंभीहिंदू धर्म प्रमुख धर्म होता. चंद्रगुप्त मौर्ययानेही आपल्या अखेरच्या काळात जैन धर्मस्वीकारला होता.
 
 
श्रवणबेळगोळ येथे सापडलेल्याशिलालेखानुसार चंद्रगुप्त आपल्याअंतिमटप्प्यात जैन मुनी बनले होते. ते शेवटचेमुकुटधारी जैन मुनी होते. त्यांच्यानंतरकोणीही मुकुटधारी म्हणजे प्रशासक असलेलेजैन मुनी झाले नाही. जैन धर्मात चंद्रगुप्तालाविशेष महत्त्व आहे. चंद्रगुप्त स्वामी भद्रबाहूयांच्यासमवेत श्रवणबेळगोळ येथे गेला होता. तेथेच अन्नपाणी वर्ज्य करून, समाधीअवस्थेतत्याने आपले प्राण सोडले. श्रवणबेळगोळ येथेज्या पर्वतावर त्याचे वास्तव्य होते त्यापर्वताला ‘चंद्रगिरि’ असे नाव पडले आणितेथेच त्याने बनविलेले ‘चंद्रगुप्तबस्ति’ नावाचेमंदिरही आहे. सम्राट अशोकाचे ४० अभिलेखआतापर्यंत अवगत झाले आहेत. जेप्रामुख्याने ब्राह्मी लिपीत, खरोष्टी आणि ग्रीकभाषेत लिहिले गेले आहेत. सम्राट अशोकाचाबराचसा इतिहास या अभिलेखांतून प्रतीतहोतो. इराणचा शासक डेरियस याच्याकडूनप्रेरणा घेऊन अशोकाने हे अभिलेख तयारकेल्याचे मानले जाते. सम्राट अशोकानेभगवान बुद्धाच्या मानवतावादी संदेशानेप्रभावत होऊन बौद्ध धर्माचा स्वीकार केला वत्याचा जगभर प्रसार केला. त्याच्या काळातबौद्ध धर्म हा अखंड भारताचा राजधर्म होता. अशोकाने आपला मुलगा महेंद्र व मुलगीसंघमित्रा यांना श्रीलंकेत पाठवून तेथे बौद्धधर्माचा प्रसार केला. तिसा या तेथीलराजानेही बौद्ध धर्माचा स्वीकार केला. पश्चिम आशिया, ग्रीस, आग्नेय आशिया येथेहीअशोकाने आपले अनेक धर्मप्रसारक पाठवले. त्याने बुद्धाच्या स्मरणार्थ अनेक स्तंभ बांधले, जे आजही त्यांच्या जन्मस्थळी नेपाळमधीललुम्बिनीत मायादेवी मंदिराजवळ, सारनाथ, बोधगया, कुशीनगर तसेच श्रीलंका, थायलंड, चीन या देशांत ‘अशोकस्तंभ’ या स्वरूपातपाहायला मिळतात. सम्राट अशोक आपल्यासंपूर्ण कारकिर्दीत एकही युद्ध हरला नाही. इतका यशस्वी सम्राट असूनही युद्धाने, त्यामधील रक्तपाताने होणारी मनुष्यहानीबघून त्याचे मन हेलावले आणि शांतीचा, करुणेचा संदेश देणारा बौद्ध धर्म त्यालाजवळचा वाटला. माणसाला युद्धाने नव्हे तरप्रेमाने जिंकता येते, हे त्याला समजले आणित्याने बौद्ध धर्म केवळ स्वीकारलाच नाही तरजगभर त्याचे अनुयायी घडवले. अशोकानंतर५० वर्षे केवळ दुर्बल राजांनी मौर्य साम्राज्यचालवले. बृहद्रथ हा या साम्राज्याचा शेवटचाराजा होता. चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार, सम्राटअशोक यांनी प्रचंड पराक्रमआणि शिस्तबद्धरितीने आपल्या साम्राज्याचा जेवढ्याझपाट्याने विस्तार केला, जवळपास संपूर्णभारत पादाक्रांत केला, त्याच मौर्यसाम्राज्याचा निम्म्याहूनही कमी भागबृहद्रथाच्या साम्राज्यात होता. आपले सर्वसाम्राज्य या दुर्बल राजांनी गमावले होते.बृहद्रथाची हत्या इ.स. पूर्व १८५ मध्ये लष्करीसंचलनादरम्यान त्याचा मुख्य सेनापतीअसलेल्या पुष्यमित्र शुंग याने केली. त्यानेमौर्य साम्राज्याच्या जागी ‘शुंग’ साम्राज्यस्थापित केले. अशाप्रकारे चाणक्याचीचाणाक्ष बुद्धी आणि चातुर्य, चंद्रगुप्ताचेअतुलनीय साहस यांच्या अभूतपूर्व संयोगानेनिर्माण झालेले, सम्राट अशोकाने बौद्धधर्माच्या प्रसाराने नावलौकीक मिळवून दिलेलेमौर्य साम्राज्य दुर्बल प्रशासकांमुळे अस्तंगतझाले.

रश्मी मर्चंडे

Powered By Sangraha 9.0

Comments

Popular posts from this blog

महार

चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला. म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!☝

मांग