Skip to main content

दलित लोकांना स्वतःला सवर्ण, उच्च जातीचे समजणारे रेडा म्हणत असत.

खरा संत कसा ओळखावा

सत्यम वानखेडे
Thursday, 21 February 2019

1) संतांचा पहिला प्रकार - आपल्या भारत देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात दोन प्रकारचे संत झाले आहे. एक ते संत; ज्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विचार, शिकवणीत, आयुष्यातील घटनांमध्ये  मुद्दाम भेसळ करण्यात आली आणि आजही ते सुरूच आहे. उदाहऱणात- संत ज्ञानेश्वर यांनी संस्कृत भगवद्‌गीता, भावार्थदीपिका किंवा ज्ञानेश्वरी रूपाने सर्व लोकांसाठी मराठीत भाषांतर केली आणि त्या काळात गरीब, दलित लोकांना स्वतःला सवर्ण, उच्च जातीचे समजणारे रेडा म्हणत असत. म्हणून कुणीतरी ज्ञानेश्वरांनी रेडेमुखी वेद बोलविले, असे म्हटले.

example

1) संतांचा पहिला प्रकार - आपल्या भारत देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात दोन प्रकारचे संत झाले आहे. एक ते संत; ज्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विचार, शिकवणीत, आयुष्यातील घटनांमध्ये  मुद्दाम भेसळ करण्यात आली आणि आजही ते सुरूच आहे. उदाहऱणात- संत ज्ञानेश्वर यांनी संस्कृत भगवद्‌गीता, भावार्थदीपिका किंवा ज्ञानेश्वरी रूपाने सर्व लोकांसाठी मराठीत भाषांतर केली आणि त्या काळात गरीब, दलित लोकांना स्वतःला सवर्ण, उच्च जातीचे समजणारे रेडा म्हणत असत. म्हणून कुणीतरी ज्ञानेश्वरांनी रेडेमुखी वेद बोलविले, असे म्हटले.

या धूर्त लोकांनी खरच तिथे ज्ञानेश्वरांनी चमत्कार करत रेडेमुखी, रेड्याच्याच तोंडून वेद बोलविले असे म्हटले, तशा पोथ्या छापल्या आणि आपल्या भोळ्या जनतेला चमत्कार, पौराणिक कथा, व्रतवैकल्ये, सत्यनारायण, श्राद्ध, इत्यादी हजारो कर्मकांडात फसवले आणि शोषण केले जे आजही सुरूच आहे. 

संत तुकाराम महाराजांची हत्या करून वैकुंठगमन झाल्याची अफवा पसरवली. आता तर गाडगेबाबा, तुकडोजी आदी अनेक संतांच्या विचारांशी पण छेडछाड सुरूच आहे. 

2) संतांचा दुसरा प्रकार - यात हे संत, स्वतः एक नंबरचे नालायक, पाखंडी होते. स्वतःला साधू, संन्यासी, महाराज, म्हणवत. चमत्कार, मोक्षप्राप्ती, विविध प्रकारच्या पूजापाठ, कर्मकांड, पौराणिक भाकडकथांत जनतेला भक्ती, आस्थेच्या नादी लावून स्वतः मात्र त्यांचा पैसा, द्रव्य घ्यायचे. वर्तमान काळातील असे संत म्हणजे आसाराम, राम रहीम, निर्मल बाबा, सत्यसाई, राधे मॉं आदी आहेत. आता जरा विचार करून पहा की, आज एकविसावे शकत सुरु आहे. जनता जागरूक आहे, विज्ञानात आपण इतके समोर आलो आहोत, तरी इतक्या मोठया प्रमाणात आपण अशा बुवा, महाराजांच्या नादी लागतो!

तर 100 वर्षांपूर्वी 20 व 19व्या शतकात किती प्रचंड प्रमाणात हे पाखंडी होते हे सहज कळेल. एक आकडा द्यायचा झाल्यास, प्रत्येक गावात 10 ते 15 महाराज सहज सापडत असतील आणि शहरात तर प्रत्येक कॉलनीत 2 ते 3 पाखंडी, कोणाचा धंदा लहान तर कोणाचा कोट्यवधी रुपयांचा. आता प्रश्न हा की, 
आपण हे पाखंडी कसे ओळखायचे?

अगदी सोप्पय, त्या महाराज ने लॉजिकल कर्मयोगी, वास्तववादी बनवणारे काही तरी शिकवले असेलच आणि अगदी सर्वसामान्य लोकांना कळेल इतके साधे उपाय सुचवले असतीलच, तर तो खरा संत. उदाहरणार्थ- मी माझ्या जीवनातील अपयश आणि कौटुंबिक कटकटी घेऊन संता जवळ गेलो तर? 
पहिला संत - हा नामजप 1000 वेळा कर, या-या देवतेची पूजा, अशा पद्धतीने कर, बायकोला अशीच विधी आणि व्रत ठेवायला सांग. हे उपाय सांगेल.
दुसरे संत - ते तुम्हाला कुठल्याही देवाची पूजा कर्मकांड सांगणार नाहीत. ते तुम्हाला सांगतील की कशाप्रकारे आपण वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घेत आणि स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून खुश राहू शकतो. ते तुम्हाला तर्कशुद्ध गोष्टी सांगतील. 
आपल्याकडे काही संत चक्क सिगरेट, गांजा, व्यसने करणारी व भरपूर प्रमाणात चमत्कार करणारीपण होऊन गेलीत. ती संत तर मुळीच नाही. गाडगेबाबा आठवा आणि चमत्कार कर्मकांड करून गेलेल, तेही आठवा. 
 

Comments

Popular posts from this blog

महार

चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला. म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!☝

मांग