१ लाख वारकरी पंढरपुरात धडकणार!
Pandharpur Warkari Protest: भजन-कीर्तन होऊ द्या; ३ ऑगस्टला १ लाख वारकरी पंढरपुरात धडकणार!
Gajanan Zilu Sawant | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 31 Jul 2020, 04:15:00 PM
Pandharpur Warkari Protest वारकरी संप्रदायाने लॉकडाऊनमुळे येत असलेल्या विविध समस्यांवर बोट ठेवत आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारकऱ्यांनी सरकारपुडे सहा प्रमुख मागण्या ठेवल्या असून या मागण्या मान्य न झाल्यास किमान १ लाख वारकरी पंढरपुरात धडक देतील, असा इशारा दिला आहे.
प्रातिनिधिक फोटो
राज्य सरकारला मागण्यांचे निवेदने पाठवूनही वारकरी संप्रदायाच्या भावनांचा विचार होत नसल्याने तात्काळ मागण्या मान्य न झाल्यास ३ ऑगस्ट रोजी राज्यातील २९ जिल्ह्यांतून १ लाख वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होतील, असा इशारा विश्व वारकरी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ महाराज देशमुख यांनी दिला आहे. पंढरपुरात विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरुण महाराज बुरघाटे, तुकाराम महाराज चवरे, जगन्नाथ महाराज देशमुख, गणेश महाराज शेटे आणि तुकाराम भोसले हे गुरुवारपासून उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाला राज्यातील अनेक वारकरी संघटनांसह वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरयांनीही पाठिंबा दिला आहे.
वाचा: ठाकरे सरकार दोन महिन्यांत कोसळेल; आता 'या' मोठ्या नेत्याचा दावा
या आहेत प्रमुख मागण्या...
२) गोकुळ अष्टमी पासून नियम अटी लावून ५० वारकऱ्यांना भजन व कीर्तन करण्यास परवानगी द्यावी.
३) महाराष्ट्रातील देवस्थाने अटी व नियम लावून उघडण्यात यावीत.
४) फू बाई फू या कार्यक्रमात कीर्तन सेवेचा अपमान करणाऱ्या कलाकारांवर गुन्हे दाखल करावेत.
६) इंदोरीकर महाराजांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत.
वाचा: विठुरायालाही करोनाचा विळखा, मंदिर परिसरही 'कंटेन्मेंट झोन'
वारकरी का झाले आक्रमक?
करोना संसर्गामुळे गेल्या चार महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहेत. याचा फटका सर्वांनाच बसला आहे. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले असले तरी धार्मिक स्थळांना आणि सण-उत्सवांना तितकासा दिलासा मिळालेला नाही. यंदा आषाढी वारी प्रतिकात्मकरित्या साजरी करण्यात आली. आषाढी यात्रेदिवशी पंढरपुरात वारकऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. त्याशिवाय राज्यातील सर्व मंदिरे आजही बंद आहेत. भजन कीर्तनासही मनाई करण्यात आलेली आहे. या सगळ्याच मुद्द्यांवरून वारकरी संप्रदाय नाराज असून या नाराजीचा आता स्फोट होण्याची भीती आहे. वारकऱ्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाल्याने त्यांच्या लढ्याला अधिकच धार आली आहे. याबाबत आता सरकार काय भूमिका घेते हे पाहावे लागणार आहे.
वाचा: काहींना वाटतं मंदिर बांधून करोना जाईल; शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा
या बातम्यांबद्दल अधिक वाचा:
Web Title : one lakh warkari from all over the state will arrive in pandharpur on 3rd august says vishwa varkari sena
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Follow Maharashtra Times to get today's Latest Marathi Newsand current Marathi News Headlines from India and around the world. Find all breaking events from Maharashtra, India, business, technology and world.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Follow Maharashtra Times to get today's Latest Marathi Newsand current Marathi News Headlines from India and around the world. Find all breaking events from Maharashtra, India, business, technology and world.
Comments
Post a Comment