propaganda प्रचार

इथेच काय अगदी सगळी कडे, असाच प्रसार केलं जातो की, संस्कृत हीच सर्व भारतीय भाषांची जननी आहे.

अगदी गेल्या वर्षी कराड च्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत एक बोर्ड लागला की हिंदी ही सर्व भारतीय भाषांची जननी आहे.

ह्याला propaganda , प्रचार म्हणतात.

अगदी नावावरून संस्कृत- संस्कारित आणि प्राकृत - नैसर्गिक या वरूनही हे स्पष्ट होते.

अभिजात संस्कृत ला स्वतःची लिपी नाही, पणीनीने प्राकृत वरून संस्कृत चं व्याकरण तयार केले, नागरी लिपी दिली, म्हणून संस्कारित या अर्थाने संस्कृत. पण ह्यांनी नागांची नागरी लिपी स्वतःच्या नावावर खपवून तिचं देवनागरी असं नामकरण केलं. आणि ज्या नागांच्या वसहतीवरून नगर हा शब्द आला, त्या नागां जमातीची निर्भित्सणा जंगली, आदिवासी अशी केली गेली.

एक देश या नावाखाली संघराजिय पद्धत मोडण्याची तयारी जोरात आहे. जी हिंदी (जी साधी बोली देखील) नाही ती राष्ट्रभाषा करण्याचा प्रयत्न आहे.

हिंदी इतरांच्या माथी मारून, हिंदुस्तानातील लोकांचं अनैसर्गिक स्थलांतर घडवलं जातंय. एकूणच भारतीय संघराज्यात, बिगर हिंदी प्रदेशाच हिंदिकरण जोरात सुरू आहे.

तसेच हिंदू धर्मात देखील, वैष्णवी करण तेही चालू आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई आणि तिरुपती बालाजी साडी चोळी प्रकरण.

पेंढारी पेशवाई जी चौथाई साठी दिल्लीचं तख्त राखत होती, ते म्हणजे स्वराज्याचा साम्राज्य विस्तार हा भ्रम जाणीवपूर्वक पसरवला.

५०० महारानी ब्रिटिशांची साथ देवून पेशव्यांचा पराभव केला, हा देशद्रोह, पण पेशव्यांनी इंग्रजांच्या साथीने भोसले, आंग्रे यांचा पडावं केला, ही भारत मातेची सेवा.

एक निजाम संपवता आला नाही, खंडणीच्या हव्यासापोटी मराठ्यांची विश्वास हर्याता इतकी गेली की पानिपतात एकट्याने लढावं लागलं.

आताही २० कोटीचा उत्तरप्रदेश तसाच ठेवून महाराष्ट्र तोडायला निघालेत. हिंदुस्तानातील अवधी, ब्रज, भोजपुरी अशा आठ भाषा बोलीभाषा ठरवून, लिपी आणि ग्रंथ संपदा नसलेली कोकणी मात्र भाषिक दर्जा मिळवून गोवा हे वेगळं राज्य आणि मोठा कोकणी भाग कर्नाटक मध्ये.

हेच गेली कित्येक शतकं चालू आहे. आणि छद्मी भारतीयत्वाचा अंगीकार करून आपण आपल्याच देशात(महाराष्ट्रात) उपरे होत आहोत.

Comments

Popular posts from this blog

महार

चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला. म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!☝

मांग