अयोध्या राम मंदिरः खोदकामात मिळालेल्या वस्तूत काय रहस्य दडलंय? वाचा

 | Maharashtra Times | Updated: 23 May 2020, 03:37:49 PM

अयोध्या येथील प्रसिद्ध श्री रामजन्मभूमी परिसरात पाच फूट शिवलिंग, अनेक स्तंभ आणि देवी-देवतांचे शिल्पावशेष सापडले आहेत. या परिसरात गेल्या दहा दिवसांपासून सपाटीकरणाचे काम सुरू असताना अनेक गोष्टी आढळून आल्या आहेत. हे प्राचीन अवशेषांचा काळ काय असू शकतो? यामागील रहस्ये काय? जाणून घेऊया...


    

अयोध्या येथील प्रसिद्ध श्री रामजन्मभूमी परिसरात पाच फूट शिवलिंग, अनेक स्तंभ आणि देवी-देवतांचे शिल्पावशेष सापडले आहेत. या परिसरात गेल्या दहा दिवसांपासून सपाटीकरणाचे काम सुरू असताना अनेक गोष्टी आढळून आल्या आहेत. त्यात एखाद्या प्राचीन मंदिराचे अवशेष, मूर्तीचे लाल आणि काळ्या पाषाणातील काही अवशेष हाती आले आहेत. एकीकडे करोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून देशभरात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असतानाच अयोध्येतील रामजन्मभूमी परिसरात काही पुरातन अवशेष सापडल्यानंतर देशभरातील वातावरण पुन्हा एकदा राममय झाल्याचे पाहायला मिळाले. या परिसरात प्राचीन मंदिर असण्याचा दावा या अवशेषांमुळे आणखी बळकट होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या बहुचर्चित निकालात ही जागा रामलल्लाला सोपविण्याचे आदेश दिले. तसेच रामजन्मभूमी परिसरात अनेक मंदिरांचे अवशेष असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही वारंवार सांगण्यात आले होते. हे प्राचीन अवशेषांचा काळ काय असू शकतो? यामागील रहस्ये काय? जाणून घेऊया...

​अयोध्या आणि राजा विक्रमादित्य


त्रेतायुगात शरयू नदी किनारी असलेल्या अयोध्या नगरीत श्रीविष्णूंचे सातवा अवतार असलेल्या श्रीरामांचा जन्म झाला होता. तब्बल दोन युगांनंतर कलियुगात राजा विक्रमादित्यांनी अयोध्या नगरीचा पुन्हा एकदा शोध घेतला होता आणि शेकडो वर्षांपूर्वी श्रीरामांचे मंदिर उभारले होते. राजा विक्रमादित्य परम रामभक्त होते. म्हणूनच अयोध्या नगरीचा शोध घेऊन त्यांनी तेथे श्रीरामांचे भव्य मंदिर बांधले. अयोध्येत रामजन्माच्या ठिकाणी मोठे मंदिर असावे, अशी विक्रमादित्यांची इच्छा होती, असे सांगितले जाते.


​तीर्थराज प्रयाग यांचे अमूल्य योगदान


आताच्या घडीला अयोध्या नगरीत राहात असलेल्या आणि अनेक पिढ्या रामजन्मभूमीवर प्रचंड श्रद्धा असलेल्या संत, महंत यांच्या मते, तीर्थराज प्रयाग यांनी राजा विक्रमादित्यांना अयोध्येचा शोध घेण्यास मोलाचे सहकार्य केले होते. प्रयाग यांनी विक्रमादित्यांना एक गाय दिली आणि ही गाय ज्या ठिकाणी जाऊन दूध देईल, तीच जागा श्रीरामांची पवित्र जन्मभूमी असेल, असे सांगितले. विक्रमादित्य गाईला घेऊन निघाले आणि अयोध्येला पोहोचताच गाईने दूध दिले, अशी एक पौराणिक कथा सांगण्यात येते.

​श्रीरामांचे भव्य मंदिर


अयोध्येला पोहोचताच राजा विक्रमादित्यांनी श्रीरामजन्मभूमीचा शोध घेतला. तेथे एक जागा निश्चित केली आणि तिथे ८४ खांबावर उभे असलेले एक भव्य मंदिर बांधले. हे मंदिर खूप उंच होते. राजा विक्रमादित्याने श्रीरामांना शोभेल, इतके भव्य मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. या मंदिराची उंची इतकी मोठी होती की, मुघल शासक बाबर प्रथमच अयोध्येतील पंचक्रोशीत आला, तेव्हा त्याला तेथूनच श्रीराम मंदिराचे दर्शन झाले, असे सांगितले जाते.

​बाबर झाला आश्चर्यचकित

अयोध्येतील भव्य इमारत पाहून मुघल शासक बाबर स्तिमितच झाला. त्याने पूर्व दिशेला पाहिले असता, त्याला दोन चंद्र दिसले. त्याने मीरबाकीला याबाबत विचारले की, आपण दिल्लीत होतो, तेव्हा मला एक चंद्र दिसायचा. मग येथे आल्यावर दोन चंद्र कसे दिसताहेत? यावर मीराबाकींनी सांगितले की, आपण ज्याला दुसरा चंद्र समजत आहात, तो आपला भ्रम आहे. तो खरा चंद्र नसून, अयोध्येतील राम मंदिराच्या कळसावरील चंद्रकांत मणी आहे. मीरबाकीचे हे उत्तर ऐकल्यावर बाबर एकदम गप्प बसला.

​बाबरचा मोह

एका कथेनुसार, चंद्रकांत मणी पाहिल्यावर बाबरला त्याचा मोह झाला. काही करून चंद्रकांत मणी मिळवायचा असे त्याने ठरवले. मीरबाकीला सांगून १० हजार सैन्य मंदिरावर आक्रमण करण्यासाठी पाठवले आणि तो मणी आणण्यास सांगितले. मात्र, अयोध्येच्या लाखों नागरिकांनी ते आक्रमण परतवून लावले. यानंतर स्वतः मीरबाकी आणखी सैन्य घेऊन तेथे दाखल झाला. मंदिर उद्ध्वस्त केले, असे सांगितले जाते. परंतु, रामजन्मभूमी परिसरात अलीकडेच मिळालेले अवशेष राजा विक्रमादित्यने बांधलेल्या मंदिराचे असू शकतात, असे सांगण्यात येत आहे. यामध्ये शिवलिंग, सुदर्शन चक्राच्या कलाकृती, देवी-देवतांच्या मूर्त्या, अमृत कलश, पुष्प कलश आणि भले मोठे खांब आढळून आले आहेत.

Comments

Popular posts from this blog

महार

चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला. म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!☝

मांग