वरच्या जातीचा म्हणजे काय रे भाऊ?

…वरच्या जातीचा म्हणजे काय रे भाऊ? 

…वरच्या जातीचा म्हणजे काय रे भाऊ?
By संजय सोनावणी on September 6, 2020

वरच्या वर्गातील (आपल्याकडे जाती अथवा वर्णातील) संस्कृतीचे अनेकांना अनावर आकर्षण असते. अनेक त्यासाठी आपला कौटुंबिक किंवा जातीचा इतिहासही बदलतात. पुराण काळातील उच्च मानल्या गेलेल्या वंशांशी नाळ/नाते जोडुन घेतात. तेही नाही जमले तर आपली आडनावे संदिग्ध किंवा उच्च पदयुक्त (उदा. पाटील, सुभेदार वगैरे) करुन घेणे तर सर्रास आहे. गोत्रेच बदलुन बनावट ब्राह्मण झाल्याची गुप्तकाळातली अनेक उदाहरणे जी. एस. घुर्येंनी ताम्रपटांचा अभ्यास करुन जशी नोंदवली आहेत. तसेच अनेक जातींनी स्वत:ला राजपूत वगैरे ठरवून घेतल्याची उदाहरणे तर एकोणिसाव्या शतकातीलच आहेत!

तसे वर जाता आले नाही, तर त्या वर्गातील (अथवा जाती/वर्णातील) मुलीशी/मुलाशी विवाह करावा अशी आकांक्षा ठेवतात. मुली अशा मुलांच्या आकांक्षांना अधिक बळी पडतात. अनेकदा त्यामागे मुलींची, अनेकदा अविचारी ठरणारी, बंडखोरीही कारण असते. पण “ज्या वृत्तीने विवाह केला गेलेला असतो तीच मुळात शुद्ध नसल्याने मुलींच्या वाट्याला शोषणच येते.”

असे असले तरीही वरचा वर्ग (किंवा जात/वर्ण) म्हणजे काय? याचीच व्याख्या ही गुढरंजनात्मक आणि म्हणूनच आभासी असते आणि हे न समजणे हे अखिल मानवजातीची शोकांतिका आहे. “लव्ह जिहाद” ही संज्ञा व्यापक बनून जाते आणि ती स्त्री-शोषणाचे कारण बनते ती यामुळेच. प्रस्थापित वर्गाच्या मांडीला मांडी लावून बसण्याचे आकांक्षा बाळगणारे हे कधी समजतच नाहीत की, प्रस्थापितांना प्रस्थापित करणारे तेच होते!

आणि त्यांच्या सोबत जाण्याची धडपड करणारेही हेच. आपले पुर्वज काउंट, डचेस वगैरे वगैरे होते हे सांगणारे आणि यांच्यात फरक काय? हरलेल्या मनोवृत्तीचे लोकच असले उद्योग करत असतात. या मानसिकतेचे सखोल विश्लेषण व्हायला हवे!

Comments

Popular posts from this blog

महार

चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला. म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!☝

मांग